World Cancer Day 2023 : वर्ल्ड कॅन्सर डे, कॅन्सरचे प्रकार आणि त्याची कारणे

World Cancer Day, What Is Cancer? types of cancer and its causes read in marathi : वर्ल्ड कॅन्सर डे अर्थात जागतिक कर्करोग दिन शनिवार 4 फेब्रुवारी 2023 रोजी आहे.

World Cancer Day, What Is Cancer? types of cancer and its causes read in marathi
वर्ल्ड कॅन्सर डे  |  फोटो सौजन्य: Representative Image
थोडं पण कामाचं
  • वर्ल्ड कॅन्सर डे अर्थात जागतिक कर्करोग दिन
  • शनिवार 4 फेब्रुवारी 2023 रोजी वर्ल्ड कॅन्सर डे
  • कॅन्सरविषयी जनजागृती करण्यासाठी वर्ल्ड कॅन्सर डे साजरा केला जातो

World Cancer Day, What Is Cancer? types of cancer and its causes read in marathi : वर्ल्ड कॅन्सर डे अर्थात जागतिक कर्करोग दिन शनिवार 4 फेब्रुवारी 2023 रोजी आहे. कॅन्सरविषयी जनजागृती करण्यासाठी वर्ल्ड कॅन्सर डे साजरा केला जातो. जगात होणाऱ्या प्रत्येकी 6 मृत्यूपैकी किमान 1 मृत्यू हा कॅन्सर अर्थात कर्करोग या आजाराने होतो. याच कारणामुळे जगभर कॅन्सर जनजागृती मोहीम राबविण्यात येत आहे. 

शरीराची निर्मिती पेशींद्वारे होते. पेशींच्या अनियंत्रित वाढीमुळे कॅन्सर होतो. पेशींचे सातत्याने विभाजन होते. काही वेळा विभाजनावेळी पेशींमध्ये गाठ निर्माण होते. बिनाइन आणि मॅलिग्नेंट या दोन पद्धतीची गाठ असू शकते. बिनाइन ही गाठ धोकादायक नसते. मॅलिग्नेंट प्रकाराची गाठ कॅन्सरमध्ये रुपांतरीत होण्याची शक्यता असते. यावर वेळेत उपचार झाले तर कॅन्सर लवकर बरा होऊ शकतो. नाही तर कॅन्सरचा त्रास होऊ शकतो. 

कॅन्सरचे प्रकार :

  1. सौम्य कॅन्सर : ट्युमरच्या पेशी इतर अवयवांमध्ये पसरून नव्या गाठी निर्माण होत नाहीत. गाठ ऑपरेशन करून सहज काढता येते. याला सौम्य कॅन्सर म्हणतात.
  2. घातक कॅन्सर : ज्या ठिकाणी गाठ निर्माण होते तिथे गुंता निर्माण एखादा अवयव अथवा एकपेक्षा जास्त अवयव निकामी होणे. या प्रकारात काही वेळा रुग्णाचा मृत्यू होण्याचा धोका.
  3. महिलांमध्ये आढळणारा कॅन्सर : स्तनाचा कॅन्सर अर्थात ब्रेस्ट कॅन्सर, फुफ्फुसाचा कॅन्सर, मोठ्या आतड्याचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, थायरॉइडचा कॅन्सर
  4. पुरुषांमध्ये आढळणारा कॅन्सर :  प्रोस्टेट कॅन्सर, फुप्फुसे कॅन्सर, मोठे आतडे कॅन्सर आणि मूत्राशयाचा कॅन्सर

कॅन्सरची कारणे

तंबाखू, गुटखा, धूम्रपानाचे व्यसन, दारूचे व्यसन यामुळे कॅन्सर होण्याचा सर्वाधिक धोका आहे. दारूच्या व्यसनामुळे यकृत, तोंड, घसा, स्वरयंत्र आणि अन्ननलिकेच्या (घशाच्या) कॅन्सरची शक्यता जास्त असते. स्तन, बीजांड, प्रोस्टेट आणि मोठ्या आतड्यांचा कॅन्सर हा काही कुटुंबांमध्ये जनुकीय कारणांमुळे आढळून येतो. जीवनशैली आणि पर्यावरणातील बदलांमुळे जनुकीय बदल होऊन कॅन्सर होऊ शकतो. तसेच आहार-अति तेलकट आहारामुळे मोठे आतडे, गर्भाशयाचा कॅन्सर होऊ शकतो.

हापूस आंब्याची पहिली पेटी आली, तुम्ही चव चाखली?
शॉपिंगसाठी ही आहेत पुण्यातील उत्तम ठिकाणे

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी