World Hemophilia Day 2023: हिमोफिलिया आणि इतर रक्तस्त्राव विकारांबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी दरवर्षी 17 एप्रिल रोजी जागतिक हिमोफिलिया दिवस पाळला जातो. हिमोफिलीयाच्या समस्येबद्दल जनजागृती करण्यासाठी आणि या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांच्या कार्याची माहिती जन सामान्यांना कळावी हा या दिवसामागचा उद्देश आहे. (world hemophilia day 2023 theme and importance)
वर्ल्ड हीमोफिलिया फेडरेशन द्वारे जागतिक हिमोफिलिया दिन जागतिक स्तरावर साजरा केला जातो. या वर्षी जागतिक हिमोफिलिया दिनाचा 34 वा वर्धापन दिन आहे. हिमोफिलियामध्ये एखादी दुखापत किंवा शास्त्रक्रिया झाल्यानंतर दीर्घकाळ रक्तस्त्राव होत राहतो. त्यामुळे लाल रंग या दिवसाचा प्रतीक रंग मानला जातो.
अधिक वाचा : मे महिन्याच्या सुट्टीसाठी स्वस्त आणि मस्त टूरिस्ट डेस्टीनेशन
लाइट इट अप रेड ही जागतिक हिमोफिलिया दिन 2023 साठी जागतिक रक्तस्त्राव विकार समुदायाला पाठिंबा दर्शवण्यासाठी एक मोहीम आहे. गेल्या वर्षी, जगभरातील हजारो लोक जगभरातील शहरांमध्ये 70 हून अधिक महत्त्वाच्या खुणा उजळवून त्यांचा पाठिंबा दर्शवण्यासाठी एकत्र आले. गेल्यावर्षी जगभरातून अनेक लोकांनी जगातील विविध शहरांमधील 70 हून अधिक स्थळांना रोशन करून आपले समर्थन दिले होते.
वर्ल्ड फेडरेशन ऑफ हिमोफिलिया दरवर्षी एक थीम सेट करते जी रक्तस्त्राव विकाराबद्दल जागरूकता वाढवते. यावर्षी जागतिक हिमोफिलिया दिवसाची थीम (Access for All: Prevention of bleeds as the global standard of care) ही आहे. गेल्या वर्षीपासून ही थीम लागू करण्यात आली असून, रक्तस्राव विकार असलेल्या सर्व लोकांच्या उपचारासाठी विशेष योजना आखण्याचा आग्रह स्थानीय धोरण निर्माते आणि संबंधित सरकारकडे यामार्फत केले जात आहे.
अधिक वाचा : महाराष्ट्र बोर्ड परीक्षेच्या निकालाची घोषणा...
पहिला जागतिक हिमोफिलिया दिन 1989 मध्ये वर्ल्ड फेडरेशन ऑफ हिमोफिलियाने साजरा केला. हिमोफिलिया आणि इतर रक्तस्त्राव विकारांबद्दल जनजागृती करण्यासाठी 17 एप्रिल हा दिवस हिमोफिलिया दिन म्हणून नियुक्त करण्यात आला. 17 एप्रिल 1941 रोजी जन्मलेल्या डॉक्टर फ्रँक श्नबेल यांच्या सन्मानार्थ जागतिक हिमोफिलीया दिनाची तारीख निवडली गेली, डॉक्टर फ्रँक श्नबेल यांनी रक्तस्त्राव विकार असलेल्या व्यक्तींच्या उपचारासाठी आपले अखंड आयुष्य समर्पित केले आहे. जागतिक हिमोफिलिया दिवस देखील फ्रँक श्नबेलच्या वैद्यकीय कारकिर्दीची आणि त्यांच्या कामाची आठवण करतो.