World Voice Day 2023: निसर्गाची अनमोल देणगी म्हणजे आवाज... जाणून घ्या याचा इतिहास आणि महत्व

तब्येत पाणी
Updated Apr 16, 2023 | 12:23 IST | टाइम्स नाऊ मराठी

World Voice Day 2023: आजकाल बरीच लोकं मद्यपान आणि धूम्रपान करून तसेच आरडाओरड करत आवाजाचा गैर वापर करतात. ज्यामुळे आवाजा संबंधित अनेक समस्या आणि आजार उद्भवतात. काही चांगल्या सवयी आणि व्यायामाद्वारे आपण स्वरावर येणारा ताण आणि त्यासंबंधीत विकरांचे निरसन करू शकतो.  

16 एप्रिल जागतिक आवाज दिवस
World Voice Day 2023: काय आहे या दिवसाचा इतिहास   |  फोटो सौजन्य: Times of India
थोडं पण कामाचं
  • 16 एप्रिल हा दिवस संपूर्ण जगात World Voice Day म्हणून साजरा केला जातो. काय आहे या दिवसाचा इतिहास?
  • आवाजसंबंधीत समस्या आणि जनजागृती करण्याचा उद्देश या दिवशी असतो.
  • आवाज आपल्या आयुष्याचा एक महत्वाचा भाग आहे.

World Voice Day Significance: आवाज ही निसर्गाने दिलेली एक अनमोल देणगी आहे, कारण यामुळे आपण व्यक्त होऊ शकतो. दुसऱ्यांशी संवाद साधू शकतो. आपल्या भावना लोकांसमोर मांडू शकतो. दरवर्षी 16 एप्रिलला म्हणजेच आज संपूर्ण जगात (World Voice Day) जागतिक आवाज दिन साजरा केला जातो. हा दिवस आपल्या रोजच्या आयुष्यातील आवाजाच्या महत्वाबद्दल जनजागृती करण्यासाठी साजरा केला जातो. या द्वारे लोकांना चांगल्या आवाजाच्या सवयी विकसित करण्यास प्रोत्साहित केले जाते, निसर्गाने आवाजाच्या रूपात माणसाला एक अनमोल देणगी दिली असून, याचा योग्य वापर करण्याचे शिकवण दिली जाते. (World Voice Day History and importance of this day )

अधिक वाचा : ​एफडीवर सर्वाधिक व्याज कुठे मिळतो, पोस्ट ऑफिस की एसबीआय?

लोकांच्या रोजच्या जीवनात आवाजाचे स्थान किती महत्वपूर्ण आहे, याची जाणीव जगाला करून देण्याचे उद्दिष्ट या दिवसाचे आहे. आवाज हा आजच्या काळात निरोगी आणि प्रभावी संवादाचा एक महत्त्वाचा भाग आहे. करण, व्यक्तिमत्वाची ओळख ही आवाजाद्वारे होत असते. 

जागतिक आवाज दिन आणि तारीख

मानवी आवाज ही देवाने दिलेली सर्वात मोठी देणगी असल्याचे अनेक लोक मान्य करतात, आजच्या काळात चांगल्या संवादासाठी आवाजाचे आरोग्य अत्यंत आवश्यक आहे. दरवर्षी 16 एप्रिल रोजी संपूर्ण जग आवाजाची समस्या असलेल्या व्यक्तींवर उपचार आणि पुनर्वसन करण्याच्या महत्त्वाबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक आवाज दिन साजरा करतात.  

अधिक वाचा : ​निवडणूक आयोगानं ऐकली राष्ट्रवादी काँग्रेसची ही विनंती

विश्व आवाज दिवस आणि इतिहास (World Voice Day History)

ब्राजील मध्ये स्वर आरोग्यतज्ञाच्या एका गटाने जागतिक आवाज दिन साजरा केला होता. 16 एप्रिल 1999 रोजी, डॉ. नेडिओ स्टीफन यांच्या अध्यक्षतेखालील ब्राझिलियन सोसायटी ऑफ लॅरींगोलॉजी अँड व्हॉईसने हा दिवस ब्राझिलियन व्हॉइस डे म्हणून घोषित केला. युनायटेड स्टेट्स, पोर्तुगाल आणि अर्जेंटिना हे देश देखील या दिवसाचा सन्मान करतात. अमेरिकन ऍकॅडमी ऑफ ऑटोलॅरिन्गोलॉजी-हेड अँड नेक सर्जरीने 2002 मध्ये हा दिवस साजरा करण्यास सुरुवात केली आणि 2003 मध्ये या दिवसाला अधिकृतपणे जागतिक आरोग्याच्या रूपात महत्व देण्यात आले. 

जागतिक आवाज दिनाचे महत्व 

आवाजाच्या आरोग्याचे महत्वाविषयी जनजागृती करण्याचे जागतिक आवाज दिनाचे उद्दिष्ट आहे. आजच्या काळात अनेक लोक दारुण पिऊन, दारू पिऊन, धुम्रपान करून, ओरडून आवाजाचा गैरवापर करतात.काही  काही चांगल्या सवयी आणि आरोग्यदायी व्यायामाने, कोणत्याही प्रकारचा स्वराचा ताण किंवा आजारावर मात करता येते. या दिवशी अनेक डॉक्टर आणि संशोधक पुढे येत असले तरी जे लोक आवाजाशी संबंधित समस्यांवर काम करत आहेत त्यांच्याबद्दल चर्चा करतात.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी