Worlds Aids Day slogan 2022: एचआयव्ही (HIV)एड्स (AIDS) हा एक प्राणघातक आजार (illness) आहे. या आजाराची लागण ज्या माणसाला झाली त्या व्यक्तीचा मृत्यू होत असतो. परंतु लोकांनी घाबरुन जाऊ नका. कारण हा आजार झाल्यानंतरही माणूस दीर्घायुष्य (long life) जगू शकतो. सरासरी वय कमी होईल पण सामान्य जीवन जगता येईल. परंतु एड्सचं नाव ऐकताच आपल्याला घाम सुटत असतो. या आजाराला न घाबरता सामोरे गेले तर आपण एक साधरण आयुष्य जगू शकतो. आता तुम्ही म्हणाल कसं इतका भयंकर आजार ज्याने माणसाचा जीव जातो आणि घाबरण्याची गरज नाही. खरंचं घाबरण्याची गरज नाही. या आजाराविषयी आपल्याला पुरेशी माहिती आणि जागृता नसल्याने आपण या आजाराला घाबरत असतो. आजाराविषयीचा हा जागृती व्हावी यासाठीच जागतिक एड्स दिन साजरा केला जातो. (Worlds AIDS Day Speech 2022: Importance of Worlds Aids Day 2022, know the history)
अधिक वाचा : लग्न सोहळ्याला EMIवर खरेदी करू शकतात सोन्याचे दागिने
जागतिक एड्स दिन दरवर्षी 1 डिसेंबर रोजी साजरा केला जातो. एचआयव्ही आणि एड्सबद्दल लोकांना जागरुक करणे हा यामागचा उद्देश आहे जेणेकरून लोकांना या भयानक आजाराच्या संसर्गापासून वाचवता येईल. जागतिक आरोग्य संघटनेच्या एका अहवालानुसार, जगात 37.9 टक्केल लोक एड्स या आजाराने ग्रस्त आहेत. तर सोसायटी ऑफ इंडियानुसार, भारतात एड्सच्या एकूण रुग्णाची संख्या ही 2.35 मिलियन आहे. एड्सच्या रुग्णांमध्ये प्रत्येक दिवशी वाढ होत आहे. जगातील कोणत्याच देशात एड्सवर उपचार किंवा औषध नाहीये.
दरवर्षी जागतिक एड्स दिनासाठी नवीन थीम ठेवली जाते. या वर्षीची थीम एचआयव्ही समाप्त करण्यासाठी समानतेची चाचणी घेणे ही आहे. या भयंकर आजाराबाबत जागरूकता निर्माण करण्यासाठी WHO द्वारे विशेष कार्यक्रम राबवले जातात. एड्स म्हणजे काय, त्याची लक्षणे आणि ते कसे टाळायचे ते जाणून घेऊया.
अधिक वाचा : किवीच्या गोलंदाजांसमोर भारतीय संघ 219 धावांवर गारद
एचआयव्हीची लागण झाल्यानंतर रोगप्रतिकारक क्षमता खूप कमी होत असते. त्यानंतर या आजाराचे विषाणूने वेगाने शरिरात पसरत असतात. हे सहसा असुरक्षित लैंगिक संबंधांमुळे आणि एचआयव्ही असलेल्या व्यक्तीशी संबंध ठेवल्यामुळे होते. इंजेक्शन किंवा दाढी करताना ब्लेड लागल्यास म्हणजे जर कोणी एचआयव्ही ग्रस्त व्यक्तीने दाढी केली असेल. तेच ब्लेड आपण परत वापरले तर आपल्याला त्याची लागण होत असते. हे लक्षात घेऊन केंद्र सरकार आणि राज्य सरकार जागतिक एड्स दिनानिमित्त लोकांना जागरूक करण्यासाठी अनेक कार्यक्रम राबवतात. याचसाठी 1 डिसेंबर 1988 रोजी जागतिक आरोग्य संघटनेने एड्स दिन साजरा करण्याची घोषणा केली. या दिवसापासून दरवर्षी 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिन साजरा केला जातो.
तज्ज्ञांच्या मते, एचआयव्हीचा इतिहास प्राण्यांपासून सुरू होतो.सर्वप्रथम, 19व्या शतकात, आफ्रिकेतील माकडांच्या एका विशेष प्रजातीमध्ये एड्सचा विषाणू आढळून आला होता.असं म्हटलं जातं की, हा आजार माकडांपासून मनुष्यांमध्ये आला. आफ्रिकेचे काही लोक माकडाचे मांस खात असतं. त्यामुळे त्या माणसांमध्ये आला. सर्वप्रथम, 1920 मध्ये, आफ्रिकेतील काँगोची राजधानी किन्शासा येथे हा धोकादायक रोग पसरला. 1959 मध्ये, कांगोमधील एका आजारी माणसाच्या रक्ताच्या नमुन्यात एचआयव्ही विषाणू पहिल्यांदा आढळला. तो पहिला एचआयव्ही बाधित व्यक्ती असल्याचे मानले जाते. त्यावेळी किन्शासा हे देह व्यापाराचे केंद्र मानले जात होते. अशा रीतीने हा रोग देह व्यापार आणि इतर मार्गाने इतर देशांत पोहोचला.
अधिक वाचा :नवरा-बाययकोच्या नात्याची कमकुवत नाळ घट्ट करायची आहे?
एड्स आजाराची ओळख 1981 मध्ये झाली. लॉस एंजेलिसचे डॉक्टर मायकेल गॉटलीब यांना पाच रुग्णांमध्ये वेगळ्या प्रकारचा न्यूमोनिया आढळून आला.यासर्व रुग्णांमध्ये रोगाशी लढण्याची यंत्रणा अचानक कमकुवत झाली होती. सगळ्यात वेगळी गोष्ट म्हणजे, हे पाचही रुग्ण समलिंगी होते,त्यामुळे सुरुवातीला हा आजार फक्त समलैंगिकांमध्येच होईल, असं डॉक्टरांना वाटत होतं. म्हणूनच एड्सला GRID म्हणजेच गे रिलेटेड इम्यून डेफिशियन्सी असे नाव देण्यात आले होते.
या दरम्यान सुमारे 25 दशलक्ष लोकांना या आजाराने आपला जीव गमवावा लागला होता. हे लक्षात घेऊन डब्ल्यूएचओने या भयंकर आजाराबद्दल लोकांना जागरूक आणि शिक्षित करण्यासाठी दरवर्षी एड्स दिन साजरा करण्याची घोषणा केली. त्याचा परिणाम राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर दिसू लागला आहे. गेल्या काही वर्षांत याच्या रुग्णांच्या संख्येत घट झाली आहे.
एड्सचे पूर्ण नाव एक्क्वायर्ड इम्यून डेफिशियन्सी सिंड्रोम आहे, हा मानवी कमतरता व्हायरसमुळे होतो. हा विषाणू शरीराची प्रतिकारशक्ती कमकुवत करतो, ज्यामुळे संक्रमित व्यक्तीला एकामागून एक आजार होतात. प्राथमिक अवस्थेत उपचार केल्यास दीर्घकाळ जीवन जगता येते.