Weight Loss Exercise: बेली फॅटमुळे चिंतेत आहात? घरीच करा एक्सरसाइज; लगेच कमी होईल पोटाची चरबी

Weight Loss Exercise: शरीराची हलचाल जास्त होत नसल्याने अनेकांच्या शरीराची चरबी वाढते आणि परिणात्मक वजन वाढू लागते. सध्या कोविड-१९ मुळे अनेकजण घरी बसून ऑफिसचे काम करू लागले होते. त्यामुळे शारिरिक हालचालीसाठी पुरेसा वेळ नसल्याने वजन वाढीमुळे बहुतेक जण त्रस्त आहेत.

 Immediately reduce belly fat
बेली फॅटमुळे चिंतेत आहात? घरीच करा 'या' एक्सरसाइज  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • पोटाची चरबी वाढल्याने अनेकजण सार्वजनिक ठिकाणी जाण्यास टाळत असतात.
  • पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही योगा, डान्स आणि जम्प रोप वर्कआउटकरू शकता.
  • पुश-अप केल्याने ब्लड सर्क्यूलेशन चांगले होते.

Weight Loss Exercise: नवी दिल्ली : शरीराची हलचाल जास्त होत नसल्याने अनेकांच्या शरीराची चरबी वाढते आणि परिणात्मक वजन वाढू लागते. सध्या कोविड-१९ मुळे अनेकजण घरी बसून ऑफिसचे काम करू लागले होते. त्यामुळे शारिरिक हालचालीसाठी पुरेसा वेळ नसल्याने वजन वाढीमुळे बहुतेक जण त्रस्त आहेत. कामासाठी जास्त वेळ बसावे लागत असल्याने पोटवरील चरबी वाढण्याचे प्रमाण वाढले आहेत. पोटाची चरबी वाढल्याने अनेकजण सार्वजनिक ठिकाणी जाण्यास टाळत असतात. त्या व्यक्तींचा आत्मविश्वास कमी होत असतो. 

शरीरातील चरबी कमी करण्यासाठी अनेक लोक वेगवेगळे डाएट प्लॅन फॉलो करतात. जर तुम्हाला तुमच्या पोटाची चरबी (Belly Fat ) कमी करायची असेल तर या तीन एक्सरसाइज तुम्ही घरच्या घरी करू शकता. 

बेली फॅट बर्न करण्यासाठी या तीन एक्सरसाइज नक्की करा

पोटाची चरबी कमी करण्यासाठी तुम्ही योगा, डान्स आणि जम्प रोप वर्कआउटकरू शकता तसेच हे तीन एक्सरसाइज केल्याने देखील तुमच्या पोटाची चरबी कमी होऊ शकते. 

push ups

पुश अप्स एक्सरसाइज- 

पुश-अप्स केल्याने पोटाची चरबी झटपट कमी होते. तसेच पुश-अप केल्याने ब्लड सर्क्यूलेशन देखील चांगले होते. पुश-अप केल्याने कॅलरी बर्न होतात त्यामुळे बेली फॅट कमी होते. 

पुल-अप्स एक्सरसाइज

पुल-अप्स हा एक प्रकारचा कार्डियो एक्सरसाइज आहे. ज्यामुळे शरीर लवचिक होते. तसेच पुल-अप्स केल्याने लहान मुलांची उंची देखील वाढते. 

स्कॉट्स एक्सरसाइज- 

जर तुम्हाला घरच्या घरी झटपट वजन कमी करायचे असेल तर रोज सकाळी तुम्ही स्कॉट्स एक्सरसाइज केला पाहिजे. स्कॉट्स एक्सरसाइजमुळे पचन शक्ती चांगली होते. दररोज व्यायाम करणं, योगाभ्यास, चालणं, धावणे हे सर्व केल्यानं वाढतं वजन झटपट कमी होण्यात मदत होते आणि आपले वजनसुद्धा नियंत्रणात राहते. तसेच पाणी देखील भरपूर प्यावे. पाणी जास्त पिल्याने भूक कमी लागते. ज्यामुळे वजन कमी होते. पाणी कमी प्यायल्याने मायग्रेन, अपचन आणि लठ्ठपणा इत्यादी समस्या तुम्हाला होऊ शकतात.  दिवसभरात पाणी पित राहावे. 


(टीप- लेखात दिलेली माहिती फक्त सूचना म्हणून सांगण्यात आलीय. अशा प्रकारचा कोणताही उपचार, औषध किंवा आहार घेण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी