Worst food for kidney: ‘हे’ पाच पदार्थ ठरतात किडणीसाठी विष, आजच करा डाएटमधून हकालपट्टी

चुकीची लाईफस्टाईल, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, कामाच्या अनियमित वेळा, वाढते ताणतणाव, व्यसनाधीनता यासारख्या अनेक घटकांचा परिणाम किडणीच्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे किडणीशी संबंधित वेगवेगळे विकार सुरू होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी आपल्या आहारातून काही विशिष्ट गोष्टींना कायमस्वरुपी सुट्टी देण्याची गरज असते.

Worst food for kidney
‘हे’ पाच पदार्थ ठरतात किडणीसाठी विष  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • किडणीसाठी काही पदार्थ ठरतात विषासमान
  • फ्रोजन मटण आणि पिझ्झा असतात घातक
  • फ्रेंच फ्राईज आणि सोया सॉसमध्ये सोडियमचे प्रचंड प्रमाण

Worst food for kidney: किडणी (Kidney) हा अवयव आपल्या शरीराचा योद्धा (Warrior) मानला जातो. शरीरात येणारे अनावश्यक घटक वेगळे करून रक्तशुद्धीकरण (Blood purification) करण्याचं काम किडणीद्वारे केलं जातं. प्रत्येक दिवशी साधारणपणे दीड लिटर युरिन तयार करण्याचं कामही किडणीद्वारे होत असतं. गेल्या काही वर्षात भारतात उच्च रक्तदाब आणि मधुमेह हे गंभीर आजार वाढू लागले आहेत. या आजारांचा थेट परिणाम किडणीवर होत असतो. चुकीची लाईफस्टाईल, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, कामाच्या अनियमित वेळा, वाढते ताणतणाव, व्यसनाधीनता यासारख्या अनेक घटकांचा परिणाम किडणीच्या आरोग्यावर होत असतो. त्यामुळे किडणीशी संबंधित वेगवेगळे विकार सुरू होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी आपल्या आहारातून काही विशिष्ट गोष्टींना (Foods to avoid) कायमस्वरुपी सुट्टी देण्याची गरज असते. जाणून घेऊया, किडणीसाठी हानीकारक ठरू शकणारे पदार्थ.

१. फ्रोजन पिझ्झा

गेल्या काही वर्षात फ्रोजन पिझ्झा खाण्याचं प्रमाण लक्षणीयरित्या वाढत असल्याचं चित्र आहे. अशा प्रकारच्या पिझ्झामध्ये व्हाईट ब्रेड क्रस्ट आणि टॉमॅटो सॉस यांचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला असतो. या पदार्थांमध्ये सोडियम प्रचंड प्रमाणात असतं. त्याचप्रमाणं यात वापऱण्यात येणाऱ्या हाय फॅट चीजचा किडणीच्या आरोग्यावर विपरित परिणाम होत असतो. त्यामुळे फ्रोजन पिझ्झा हा प्रकार शक्य तितका टाळण्याचा सल्ला दिला जातो. 

२. बटाटायुक्त पदार्थ

बटाटा हा सर्वसामान्यांच्या रोजच्या आहारातील पदार्थ आहे. मात्र हाच पदार्थ जेव्हा फास्ट फूडमध्ये वापरून तळून तुम्हाला दिला जातो, तेव्हा तो तुमच्या शरीरासाठी हानीकारक ठरण्याची शक्यता असते. फ्रेंच फ्राईज, हॅश ब्राऊन, पोटॅटो चिप्स, पोटॅटो पॅनकेक यासारखे पदार्थ किडणीच्या आरोग्यावर विपरित परिणाम करणारे ठरू शकतात. यात मोठ्या प्रमाणात सोडियम असल्यामुळे किडणीवरील तणाव वाढायला सुरुवात होते. 

अधिक वाचा - Air Pollution Remedies: हवेच्या प्रदूषणामुळे श्वास घ्यायला त्रास होतोय? करा हे उपाय

३. प्रोसेस्ड मीट

प्रोसेस केलेले मटण खाण्याकडे अलिकडे अनेकांचा कल वाढला आहे. यात मिठाचं म्हणजे सोडियमचं प्रमाण लक्षणीय असतं. जर रोज 2300 मिलिग्रॅमपेक्षा जास्त सोडियमचं सेवन केलं, तर ब्लड प्रेशर वाढायला सुरुवात होते. त्याचप्रमाणे किडणीवर अतिरिक्त दबाव यायलाही सुरुवात होते. अनेकजण प्रोटिनसाठी मटण खावं लागत असल्याचं सांगतात. मात्र प्रोटिनसाठीच तुम्ही मटण खात असाल, तर ॲनिमल बेस्ड प्रोटिनऐवजी प्लँट बेस्ड प्रोटिन खाण्याचा सल्ला आहारतज्ज्ञांकडून दिला जातो. 

४. पॅकबंद सूप

अनेकांना सूप प्यायला आवडलं. घशातील खवखव कमी करण्यासाठी आणि एक हलका आहार म्हणून सूपला पसंती दिली जाते. हे सूप घरी तयार केलं असेल, तर ते आरोग्यासाठी उत्तम असतं. मात्र पॅक केलेलं सूप हे किडणीच्या आरोग्यासाठी योग्य नसल्याचं सांगितलं जातं. 

अधिक वाचा - तुमच्या हाता-पायाला मुंग्या येतात का? मग वेळीच व्हा सावध, ही आहे धोक्याची घंटा

५. सोया सॉस

सोया सॉसमध्ये सोडियमचं प्रमाण सर्वाधिक असतं. त्यामुळे उच्च रक्तदाबाची समस्या निर्माण होते आणि किडणीच्या कार्यात अडथळे यायला सुरुवात होते. एक चमचा सॉसमध्ये 950 मिलिग्रॅम सोडियम असतं. 

डिस्क्लेमर - सामान्य माहितीच्या आधारे देण्यात आलेल्या या काही टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत गंभीर समस्या असतील, तर तज्ज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेण्याची आवश्यकता आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी