Weight Loss Tips: पोटाची चरबी कमी करण्यासाठी तेल, या ५ तेलांनी मसाज केल्यास होईल बॉडी फॅट कमी

तब्येत पाणी
Updated Dec 06, 2021 | 18:46 IST | टाइम्स नाऊ मराठी

OIl For Weight loss: काही असे तेल आहेत जे शरीरावर लावल्याने वजन कमी होऊ शकते. जाणून घेऊयाा या तेलांबाबत

oils
Wright Loss:या ५ तेलांनी मसाज केल्यास होईल बॉडी फॅट कमी 
थोडं पण कामाचं
  • ग्रेपफ्रुट इन्सेंशियल ऑईलचा वापर केल्याने तुम्ही शरीराची चरबी घटवू शकता.
  • पेपरमिंट ऑईलच्या वापराने एनर्जी बूस्ट होते
  • आल्याचे तेल शरीराची सूज कमी कऱण्याचे काम करते

मुंबई: आजकाल दोनपैकी एकजण वजन वाढल्याच्या(weight gain) समस्येने त्रस्त आहे. अशातच अनेकजण वजन कमी करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न करत असतात. सध्याच्या दिवसांमध्ये वजन कमी करणे एक कठीण टास्क बनला आहे. खासकरून कोरोना काळात हे अधिकच कठीण झाले आहे. कारण कोरोनाच्या भितीने घराच्या बाहेर जाणे भितीदायक ठरले आहे. तसेच फिजीकल अॅक्टिव्हिटीही कमी झाली आहे. अशातच स्थितीत लोांना वजन घटवण्यासाठी घरगुती उपाय(home remedies) आणि डाएटवर(diet) अवलंबून राहावे लागत आहे. जर तुम्हीही वजन कमी करण्यासाठी उपाय शोधून थकला आहात तर आम्ही या लेखात पोटाची चरबी कमी करण्यासाठी काही तेलांबाबत(oils for weight loss) सांगत आहोत. ज्यामुळे सोप्या पद्धतीने पोटाची चरबी कमी होऊ शकेल. Use this oils for weight loss

पेपरमिंट ऑईल(Peppermint oil)

पेपरमिंट ऑईलच्या वापराने एनर्जी बूस्ट होते. तसेच मांसपेशी मजबूत होण्याचे काम होते. शरीरावर पेपरमिंट ऑईल लावल्याने मांसपेशींना होणारा त्रासही दूर होतो. या तेलाचा वास तुम्हाला अनहेल्दी खाण्यापासून रोखतो. तसेच यामुळे सतत खाण्याची इच्छाही कमी होईल. सोबतच तुमचे पोट भरलेले राहील. 

ग्रेपफ्रुट ऑईल(Grapefruit oil)

ग्रेपफ्रुट इन्सेंशियल ऑईलचा वापर केल्याने तुम्ही शरीराची चरबी घटवू शकता. यामुळे शरीराचा मेटाबॉलिज्म बूस्टहोण्यास मदत होते. ग्रेपफ्रुट ऑईलने पोटाची मालीश केल्यास पोटाची चरबी आणि कमरेचा घेर कमी होण्यास मदत होते. पचनक्रिया सुधारण्यास हे तेल फायदेशीर आहे. 

आल्याचे तेल(Ginger oil)

आल्याचे तेल शरीराची सूज कमी कऱण्याचे काम करते. इतकंच नव्हे तरयामुळे स्ट्रेस आणि साखर खाण्याची क्रेव्हिंग कमी होते. पाचनक्रिया सुरळीत राखण्याचे कामही हे तेल करते. यामुळे चयापचय क्रियेचा वेग वाढतो. आंघोळ करताना गरम पाण्यात या तेलाचे काही थेंब टाकल्यास खूप फायदा होतो. 

लॅव्हेंडर ऑईल (Lavender oil)

ताण कमी करण्यासाठी लॅव्हेंडर ऑईल खूप फायदेशीर आहे. रात्री झोपण्याआधी हे तेल शरीरास लावल्याने छान झोप येते. हे तेल शरीरावर लावल्याने वजन कमी होऊ शकते. यामुळे चांगली झोप येते. तसेच खाण्याची क्रेव्हिंग कमी होते. रात्री झोपण्याआधी हे तेल शरीरावर चरबी असलेल्या भागांवर लावा. यामुळे खूप फायदा होईल.

लिंबाचे तेल (Lemon Oil)

लिंबाचे तेल वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे. हे तेल लावल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर टाकण्यास मदत होते. सोबतच एनर्जी बूस्ट होण्यास मदत होते. लेमन ऑईल वापरल्याने मूड चांगला होण्यास मदत होते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी