Coronavirus XE Variant Symptoms । मुंबई : भारतात मगील काही आठवड्यांपासून कोरोना व्हायरसच्या (Coronavirus In India) नवीन प्रकरणांमध्ये घट झाली आहे, परंतु या विषाणूचा धोका अद्याप संपलेला नाही. तसेच तज्ञ मंडळी कोरोनाच्या चौथ्या लाटेबद्दल सावध करत आहेत. दरम्यान सर्वात वेगाने पसरणाऱ्या कोरोना विषाणूच्या XE व्हेरिएंटने (Coronavirus XE Variant) चिंता वाढवली आहे. कारण हा घातक विषाणू कोरोनाच्या इतर व्हेरिएंटच्या तुलनेत १० पट वेगाने पसरतो. (XE variant of Corona launches 10 times faster in India? Know its symptoms).
अधिक वाचा : सुप्रिया सुळे यांच्यासोबत अशा अंदाजात बोलताना दिसले शशी थरूर
बीएमसीकडून (BMC) बुधवारी सांगण्यात आले की कोरोना विषाणूच्या XE व्हेरिएंटचा पहिला रूग्ण मुंबईत आढळून आला आहे. मात्र केंद्र सरकारने या व्हेरिएंट बाबत कोणत्याही प्रकारची माहिती देण्यास नकार दर्शवला आहे. आता महाराष्ट्राचे मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले आहे की XE व्हेरिएंट मधील रूग्णाची प्रकृती ठीक आहे आणि त्याच्या संपर्कात आलेले सर्व लोक कोरोना निगेटिव्ह आहेत.
कोरोना विषाणूचा XE व्हेरिएंट भारतासह जगभरातील अनेक देशांमध्ये चिंतेचा विषय बनला आहे, कारण प्राथमिक अभ्यासात असे दिसून आले आहे की हा व्हेरिएंट आतापर्यंतच्या सर्व व्हेरिएंटपेक्षा जास्त घातक असून तो इतर व्हेरिएंटच्या तुलनेत १० पट जास्त वेगाने पसरतो.
अधिक वाचा : राऊत शिवसेनेसोबत नाहीत; भाजपची टोमणा
जागतिक आरोग्य संघटना (WHO) म्हणते की कोविड-१९ चा XE हा व्हेरिएंट दोन वेगवेगळ्या व्हेरिएंटपासून बनला आहे. तज्ञांचे म्हणणे आहे की कोरोना विषाणूच्या ओमिक्रॉन व्हेरिएंटचे दोन प्रकार आहेत. पहिला ओमिक्रॉन बीए. १ (Omicron BA.1) आणि दुसरा बीए.२ (BA.2) आहे. या दोन व्हेरिएंटच्या कॉम्बिनेशनमुळे XE हा व्हेरिएंट तयार झाला आहे.
कोविड-१९ चा XE व्हेरिएंट (Covid-19 XE Variant) किती घातक आहे आणि यामुळे किती नुकसान होऊ शकते याबाबत अभ्यास चालू आहे. जागतिक आरोग्य संघटनेने म्हटले की याबाबत आताच्या घडीला काहीही सांगता येणार नाही, कारण अद्याप याबाबत पुरेसे पुरावे मिळालेले नाहीत. यासह याच्या लक्षणांबद्दल (XE Variant Symptoms) काहीही स्पष्ट नाही.
मात्र, हा व्हेरिएंट ओमिक्रॉनच्या दोन सबव्हेरिएंट पासून तयार झाला आहे यामुळे याची लक्षणे ओमिक्रॉन सारखीस असू शकतात. ताप, खोकला, श्वास घेण्यास त्रास होणे, अंगदुखी, डोकेदुखी, घसा खवखवणे आणि नाक वाहणे या XE व्हेरिएंटची लक्षणे असू शकतात. याशिवाय XE व्हेरिएंटच्या इतर काही लक्षणांमध्ये थकवा, चक्कर येणे, धडधडणे, वास आणि चवीत कमीपणा येणे यांचा समावेश आहे. जर कोणाला ही लक्षणे जाणवत असतील तर त्यांनी लगेच तपासणी करून घ्यावी.