Turmeric water benefits: यामी गौतमचं फिटनेस सीक्रेट, Glowing Skin साठी अभिनेत्री पिते 'हे' आयुर्वेदिक पाणी; जाणून घ्या त्याचे फायदे

Yami Gautam Fitness Tips: अभिनेत्री यामी गौतमच्या फिटनेसचे रहस्य काय आहे हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहेत. काही दिवसांपूर्वी तिनं स्वतःच्या इंस्टा हँडलवरून याबाबतची माहिती दिली होती.

Yami Gautam
यामी गौतम 
थोडं पण कामाचं
  • यामी स्वतःच्या फिटनेसबाबत खूप जागरूक आहे.
  • ती नेहमीच फिट आणि फाईन दिसते.
  • अभिनेत्री यामी गौतमनं एकदा तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला होता.

मुंबई: Yami Gautam Fitness Secret: बॉलिवूड अभिनेत्री यामी गौतम (Bollywood actress Yami Gautam) ही तिच्या फिटनेसमुळे तसंच तिच्या ग्लोईंग स्किनमुळे (fitness and glowing skin)  नेहमीच चर्चेत असते. यामी स्वतःच्या फिटनेसबाबत खूप जागरूक आहे. ती नेहमीच फिट आणि फाईन दिसते. अशातच यामीचा चेहरा नेहमीच चमकदार आणि ग्लोईंग दिसतो. या चमकदार आणि ग्लोईंग स्किनचं सिक्रेट हे कोणतीही ब्यूटी ट्रिटमेंट (beauty treatment) नसून गरम पाणी आहे. यामी फिट राहण्यासाठी आणि शरीराला हायड्रेट करण्यासाठी गरम पाणी पिते. त्यामुळे याचा फायदा तिला तिच्या स्किनसाठी होतो. यामुळे यामी गौतमचा चेहरा ग्लोईंग दिसून येतो. 

अभिनेत्री यामी गौतमनं एकदा तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरून एक फोटो शेअर केला होता. या फोटोत तिनं सांगितलं होतं की, ती तिच्या दिवसाची सुरुवात एक ग्लास कोमट हळदीच्या पाण्याने करते. आज आम्ही तुम्हाला हळदीसोबत गरम पाणी पिण्याचे फायदे सांगणार आहोत.

अधिक वाचा- रणवीरच्या न्यूड फोटोंमुळे शर्लिन चोप्रानं दीपिकाला सुनावलं 

हळदीसोबत गरम पाणी पिण्याचे असंख्य फायदे

प्रतिकारशक्ती वाढवते

हळदीचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत. हळदीमध्ये अँटीबॅक्टेरियल असण्यासोबतच अनेक गुणधर्म असतात. या गुणधर्मांपैकी एक म्हणजे कर्क्यूमिनचा गुणधर्म, जो रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी आणि धुळीच्या कणांपासून शरीराला होणारे नुकसान रोखण्यासाठी ओळखला जातो. गरम पाण्यात हळद टाकून रोज प्यायल्यास शरीर आजारांपासून दूर राहते.

वजन कमी करण्यासाठी प्रभावी
 
हळदीसह गरम पाणी वजन कमी करण्यासाठी देखील प्रभावी आहे.  गरम पाणी चयापचय सुधारते तसंच हळद देखील त्यात महत्त्वाची भूमिका बजावते. अशा स्थितीत पचनशक्ती चांगली राहून वजन कमी होण्यास मदत होते.

त्वचा चमकदार होते

हळदीमध्ये रक्त शुद्ध करण्याचे गुणधर्म देखील आहेत. हळदीचे सेवन केल्यानं त्वचा चांगली होते असे आयुर्वेदात मानले जातं.  हळदीमध्ये असलेल्या अँटीऑक्सिडंट गुणधर्मांमुळे त्वचा ग्लोईंग होते. 

अधिक वाचा- असा बनवा घरच्या घरी व्हॅनिला मिल्क शेक, सोपी रेसिपी  

इतकंच नाही तर वाढत्या वयाचा त्वचेवर होणारा परिणाम कमी करण्यातही हे गुणकारी आहे. अशा परिस्थितीत हळदीचे पाणी प्यायल्यानं तुम्ही तुमची त्वचा दीर्घकाळ चांगली ठेवू शकता.

(अस्वीकरण: या लेखातील टिपा आणि सल्ले केवळ सामान्य माहितीसाठी आहेत आणि व्यावसायिक वैद्यकीय सल्ला म्हणून त्याचा अर्थ लावला जाऊ नये. कोणत्याही प्रकारचे फिटनेस प्रोग्राम सुरू करण्यापूर्वी किंवा आपल्या आहारात कोणतेही बदल करण्यापूर्वी, कृपया आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी