पिवळ्या दातांमुळे मनमोकळं हसता येत नाही; या 5 घरगुती उपायामुळे प्रत्येकांना दाखवता येईल तुमची बत्तीशी

चेहरा कितीही सुंदर असला तरी तोंड उघडताच दात पिवळे दिसायला लागले तर तुमच्याकडे कोणी बघत सुद्धा नाहीत. दात पिवळे पडणं आणि रक्त पडणं हेही आरोग्यासाठी अनेक प्रकारे हानिकारक असतं. तुम्ही जे काही खाता ते तोंडातूनच पोटात जाते, डर्टी टीथ हे आरोग्याशी तडजोड करण्यासारखेच आहे. यामुळे श्वासाची दुर्गंधी, हिरड्यांमधून रक्त येणे, हे दातांची योग्य काळजी न घेतल्याचे परिणाम आहेत. पण, घरात अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत, ज्यांच्या वापराने दातांवर परिणाम दिसू लागतो आणि दात पांढरे होऊ लागतात.

Yellow teeth
Yellow teeth:या 5 घरगुती उपायामुळे दाखवता येईल बत्तीशी   |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • दातांची योग्य काळजी न घेतल्याने श्वासाची दुर्गंधी, हिरड्यांमधून रक्त येत असते.
  • दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी कडुलिंब पावडरचा वापर केला जाऊ शकतो.

Yellow Teeth Home Remedies: चेहरा कितीही सुंदर असला तरी तोंड उघडताच दात पिवळे दिसायला लागले तर तुमच्याकडे कोणी बघत सुद्धा नाहीत. दात पिवळे पडणं आणि रक्त पडणं हेही आरोग्यासाठी अनेक प्रकारे हानिकारक असतं. तुम्ही जे काही खाता ते तोंडातूनच पोटात जाते, डर्टी टीथ हे आरोग्याशी तडजोड करण्यासारखेच आहे. यामुळे श्वासाची दुर्गंधी, हिरड्यांमधून रक्त येणे, हे दातांची योग्य काळजी न घेतल्याचे परिणाम आहेत. पण, घरात अशा अनेक आश्चर्यकारक गोष्टी आहेत, ज्यांच्या वापराने दातांवर परिणाम दिसू लागतो आणि दात पांढरे होऊ लागतात.

पिवळे दात घालवण्यासाठी घरगुती उपाय | Home Remedies To Get Rid Of Yellow Teeth 

कडुलिंबाचे झाड

दातांचा पिवळेपणा दूर करण्यासाठी कडुलिंब पावडरचा वापर केला जाऊ शकतो. कडुलिंबाची पावडर घ्या आणि ब्रशने दात स्वच्छ करा. कडुनिंबातील बॅक्टेरियाच्या वाढीस प्रतिबंध करणारा पदार्थ दातांतील बॅक्टेरिया काढून टाकतो. दातांच्या आरोग्यासाठी तुम्ही कडुलिंबाच्या दातानेही (काडीने) दात स्वच्छ करू शकता. 

Read Also : महिलांच्या शरीरसौष्ठव स्पर्धेत डॉली सैनीने मिळवलं सुवर्ण पदक

बेकिंग सोडा

बेकिंग सोडा दात पिवळे पडण्यावर ब्लीचसारखे काम करतो. बेकिंग सोड्यामध्ये पाणी मिसळून पेस्ट बनवा आणि ही पेस्ट दातांवर ३ ते ४ मिनिटे ठेवल्यानंतर ब्रशवर टूथपेस्ट घेऊन दात सामान्यपणे स्वच्छ करा.

लिंबाची साल

जेवणानंतर आठवड्यातून २ दिवस लिंबाची साल दातांवर चोळल्यास चांगला परिणाम दिसून येतो. लिंबाची साल देखील दात पांढरे करण्यासाठी चांगली आहे.

Read Also : आधुनिक दानशूर कर्ण, आयुष्यभराची 600 कोटींची कमाई केली दान

मोहरीचे तेल

अर्धा चमचा मीठामध्ये मोहरीच्या तेलाचे काही थेंब मिसळा आणि दात स्वच्छ करा. या पेस्टने दात स्वच्छ करा आणि थोड्या वेळाने दात धुवा. तुमचे दात चमकतील.

Read Also: कॅबिनेट मंत्रीपदासाठी आमदारांकडे शंभर कोटींची मागणी

स्ट्रॉबेरी 

दात नैसर्गिकरीत्या चमकदार करण्यासाठी स्ट्रॉबेरी एका भांड्यात हलक्या हाताने कुस्करून ५ ते ६ मिनिटे दातांना लावून ठेवा. यामुळे तुमच्या तोंडाला कोणत्याही गोष्टीची चव खराब होणार नाही आणि दातही पांढरे होतील. तसेच तोंडाची दुर्गंधी दूर होईल.

(टीप: ही केवळ सामान्य माहिती देण्यात आली आहे. हे कोणत्याही प्रकारे पात्र वैद्यकीय मताचा पर्याय नाही. अधिक तपशिलांसाठी नेहमी तज्ञ किंवा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्या.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी