Weight Loss Tips: जेवणानंतर 15 मिनिटं करा हे आसन, लोण्यासारखी वितळेल पोटाची चरबी

वज्रासनामुळे वाढलेलं वजन कमी करण्यासाठी फायदा होतो. अनेकांना सकाळच्या वेळी दररोज व्यायाम करण्यासाठी वेळ नसतो. काही जणांच्या कामाच्या वेळा विचित्र असल्यामुळे त्यांना दररोज व्यायाम करणे जमत नाही. अशा व्यक्ती जेवणानंतर काही मिनिटं वज्रासन करून आपले वजन नियंत्रणात ठेवू शकतात.

Weight Loss Tips
जेवणानंतर 15 मिनिटं करा हे आसन  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • वज्रासनात बसल्यामुळे चरबी होते पटापट कमी
  • रक्ताभिसरण सुधारून वाढते रोगप्रतिकारक शक्ती
  • पाठीचा कणा ताठ राहण्यासही होते मदत

Weight Loss Tips: चुकीची लाईफस्टाईल, खाण्यापिण्याच्या अयोग्य सवयी, अपुरी झोप, वाढते ताणतणाव आणि त्यातून निर्माण होणारी व्यसनाधीनता यासारखे अनेक कारणांमुळे गेल्या काही वर्षात लठ्ठपणा (Obesity) ही भारतीयांसमोर निर्माण झालेली एक मोठी समस्या आहे. लठ्ठपणा हा कुठलाही आजार नसला तरी सुद्धा त्यामुळे वेगवेगळ्या आजारांना आमंत्रण मिळण्याची शक्यता वाढते. वाईट कोलेस्ट्रॉल, ब्लड प्रेशर, मधुमेह किंवा हार्ट अटॅक यासारख्या अनेक आजारांची सुरुवात ही लठ्ठपणापासून होत असते. शरीरात घेतल्या जाणाऱ्या कॅलरीज पेक्षा जाळल्या जाणाऱ्या कॅलरीचे प्रमाण कमी असेल, तर त्या शरीरात साठत जातात. त्यातूनच पोटाभोवती आणि कमरेभोवती चरबी गोळा व्हायला सुरुवात होते. काही विशिष्ट योगासनांच्या मदतीने ही चरबी कमी करण्यास मदत होते.

वज्रासन ठरेल उत्तम उपाय

वज्रासनामुळे वाढलेलं वजन कमी करण्यासाठी फायदा होतो. अनेकांना सकाळच्या वेळी दररोज व्यायाम करण्यासाठी वेळ नसतो. काही जणांच्या कामाच्या वेळा विचित्र असल्यामुळे त्यांना दररोज व्यायाम करणे जमत नाही. अशा व्यक्ती जेवणानंतर काही मिनिटं वज्रासन करून आपले वजन नियंत्रणात ठेवू शकतात. यामुळे पोटाची चरबी तर कमी होतेच शिवाय रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यासही मदत होते. वज्रासन याचा अर्थ आहे बलवान स्थिती. आपली पचनक्षमता आणि आपले स्नायू यांना ताकद देण्याचे काम हे असं करतं. त्यामुळेच त्याला मच्छरासन असे म्हणतात.

अधिक वाचा - Excessive Thirst: वारंवार पाणी पिऊनही तुमची तहान भागत नसेल तर असू शकतात हे आजार...

काढा फक्त पंधरा मिनिटे

यासाठी दुपारच्या जेवणानंतर केवळ पंधरा मिनिटांचा वेळ काढण्याची गरज असते. घरी किंवा कार्यालयात कुठेही तुम्ही हा वेळ काढू शकता. याचे आपल्या शरीराला अनेक फायदे होतात आणि आरोग्य सुधारण्यास मदत होते. पचनशक्ती सुधारणे, रक्तप्रवाह सुरळीत होण्यासाठी मदत होणे यासारखे इतर काही फायदेही वज्रासन करण्यामुळे होतात. पायांच्या स्नायूंवर यामुळे अधिक प्रेशर पडते आणि तिथला रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते. तुम्ही न चुकता दररोज हे असं केले तर तुमचे शरीर शेपमध्ये येण्यास मदत होईल.

अधिक वाचा - Hearing Loss: तुमचा हेडफोन तुम्हाला करतोय बहिरं, ‘या’ टिप्स करू शकतात बचाव

वज्रासनाचे फायदे

१. वजन कमी करण्यास आणि शरीर फिट ठेवण्यास मदत होते.

२. मन शांत राहते आणि बुद्धी वाढते.

३. डोळ्यांची क्षमता सुधारते

४. अन्न पचायला मदत होते आणि मलावरोधाचा त्रास कमी होतो.

५. कंबर, गुडघा आणि पायांची हाडे मजबूत होतात.

६. शरीरातील रक्ताभिसरण सुधारते आणि अनेक आजारांपासून संरक्षण मिळते.

७. वज्रासनात बसल्यामुळे पाचनशक्ती सुधारते.

८. नियमित वज्रासन केल्यामुळे शरीरातील ऊर्जा वाढते.

९. पोटातील गॅस निघून गेल्यामुळे पोट शांत राहते.

१०. वज्रासन केल्यामुळे पाठीचा कणा ताठ राहतो.

Disclaimer: वज्रासनामुळे होणाऱ्या फायद्यांबाबतच्या या काही सामान्य टिप्स आहेत. तुम्हाला याबाबत काही गंभीर प्रश्न व शंका असतील, तर तज्ञांच्या सल्ल्याने उपचार घेणे आवश्यक आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी