Curd Benefits For Hair: दहीमुळे डोक्यावरील केसं होतात मुलायम, पण केसांवर किती वेळ ठेवणार दही

केसांना (Hair) सुंदर बनवण्याची इच्छा प्रत्येकाला असते. मात्र, खराब जीवनशैली (Lifestyle) आणि बदलत्या पाण्यामुळे बहुतेक लोक केसांबाबत तक्रारी करू लागतात. कोणाचे केस वेळेआधी गळू लागले तर कोणाचे केस कोरडे होतात. अशा स्थितीत, तुम्ही दहीचा (Yogurt) वापर करा, दही खाण्यास जितकी चविष्ट आहे तितकीच ती केसांसाठीही फायदेशीर आहे.

Curd Benefits For Hair
दहीमुळे डोक्यावरील केसं होतात मुलायम, पण हा नियम ठेवा लक्षात  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • तुम्ही दहीचा वापर करा, दही खाण्यास जितकी चविष्ट आहे तितकीच ती केसांसाठीही फायदेशीर आहे.
  • दही दर आठवड्याला केसांना लावल्यास केस चमकदार होण्यास सुरुवात होईल आणि वाढही होईल.

Curd Benefits For Hair: मुंबई :  केसांना (Hair) सुंदर बनवण्याची इच्छा प्रत्येकाला असते. मात्र, खराब जीवनशैली (Lifestyle) आणि बदलत्या पाण्यामुळे बहुतेक लोक केसांबाबत तक्रारी करू लागतात. कोणाचे केस वेळेआधी गळू लागले तर कोणाचे केस कोरडे होतात. अशा स्थितीत, तुम्ही दहीचा (Yogurt) वापर करा, दही खाण्यास जितकी चविष्ट आहे तितकीच ती केसांसाठीही फायदेशीर आहे. वास्तविक, ज्यांचे केस खूप कोरडे आहेत, त्यांनी केसांमध्ये दही नक्कीच लावावे, परंतु केसांना किती वेळ दही लावावे हे फार कमी लोकांना माहिती आहे. योग्य वेळ माहिती असेल तर त्याचा फायदा अधिक होत असतो, म्हणून जाणून घेऊया केसांसाठी दही कसे फायदेशीर ठरू शकते. 

केसांना किती वेळ दही लावायचे?

30 मिनिटे दही लावणे पुरेसे आहे, कारण त्याचे फायदे कमी वेळेत मिळतात. जर तुम्ही ते जास्त वेळ केसांना लावले तर ज्यासाठी तुम्ही केसांना दही लावले आहे ते सर्व फायदे तुम्हाला मिळतीलच असे नाही. अर्ध्या तासानंतर तुम्ही सामान्य पाण्याने केस धुवू शकता. ही पेस्ट तुम्ही दर आठवड्याला केसांना लावल्यास केस चमकदार होण्यास सुरुवात होईल आणि वाढही होईल.

केसांवर दही लावल्याने काय फायदे होतात

  1. ज्यांचे केस खूप कोरडे आहेत, त्यांनी डोक्यांच्या केसांना दही नक्की करून बघावे. यामुळे तुमचे केस खूप छान होतील.
  2. याशिवाय केसांची वाढ मजबूत करण्यासाठीही दही खूप उपयुक्त आहे. आठवड्यातून एकदा ही पेस्ट लावल्यास तुम्हाला चांगले परिणाम मिळतील. 
  3. कोंड्याच्या समस्येवरही दही खूप फायदेशीर आहे. जर तुम्हाला अशा प्रकारच्या केसांची समस्या असेल तर तुम्ही  दही लावून जरूर पहा. 
  4. पांढऱ्या केसांच्या समस्येवरही दही खूप उपयुक्त आहे. म्हणजेच ज्या लोकांचे केस पांढरे होत आहेत ते देखील ही पेस्ट लावू शकतात.

(Disclaimer: येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. टाइम्स नाउ याची जबाबदारी घेत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी