Long Hair Tips: लांब केसांची इच्छा होईल पूर्ण, फक्त या 3 गोष्टींची घ्या काळजी

Hair Tips : मुलायम आणि निरोगी केस हे व्यक्तिमत्त्वात मोठी भर घालतात. चांगले केस असावेत असे प्रत्येकालeच वाटते. शिवाय केस जर लांबसडक (Long hairs) असतील तर प्रत्येकालाच असे लांब केस ठेवायचे असतात. अशा परिस्थितीत काही मुली केस लांब ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. मात्र अनेकवेळा हे शक्य होत नाही. त्यामुळे तुमचे केस लांब होत नसतील तर काळजी करण्याची गरज नाही.

Hair tips
केसांचे आरोग्य 
थोडं पण कामाचं
  • प्रत्येकालाच असे लांब केस ठेवायचे असतात
  • मुलायम आणि निरोगी केस हे व्यक्तिमत्त्वात मोठी भर घालतात
  • लांबसडक केस कसे मिळवाल

Long Hair Tips : नवी दिल्ली : मुलायम आणि निरोगी केस हे व्यक्तिमत्त्वात मोठी भर घालतात. चांगले केस असावेत असे प्रत्येकालeच वाटते. शिवाय केस जर लांबसडक (Long hairs) असतील तर प्रत्येकालाच असे लांब केस ठेवायचे असतात. अशा परिस्थितीत काही मुली केस लांब ठेवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत असतात. मात्र अनेकवेळा हे शक्य होत नाही. त्यामुळे तुमचे केस लांब होत नसतील तर काळजी करण्याची गरज नाही. कारण आम्ही तुमच्यासाठी अशा टिप्स आणल्या आहेत, ज्या तुम्हाला सहज मदत करतील. केस लांब तर होतीलच पण चमकदारही होतील. चला जाणून घेऊया. (You can have long & health hairs, if you take care of these things)

अधिक वाचा : Coconut water : नारळाचे पाणी हानिकारकदेखील ठरू शकते,जाणून घ्या किती आणि कोणत्या वेळी प्यावे

मसालेदार अन्नापासून अंतर ठेवा

मसालेदार अन्न आरोग्यासाठी चांगले नाही हे सर्वांनाच माहीत आहे. यामुळे तुमच्या केसांची वाढही थांबू शकते. जर तुम्ही जेवणात किंवा पेयामध्ये तेलकट मसाल्याच्या गोष्टी जास्त वापरत असाल किंवा जंक फूड जास्त खाल्ले तर त्यापासून अंतर ठेवा.

जास्त पाणी प्या

कधीकधी पाण्याच्या कमतरतेमुळे केसांची वाढही थांबते. अशा परिस्थितीत तुमच्या शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका, अन्यथा तुमचे केस लांब वाढवण्याची तुमची इच्छा अपूर्ण राहू शकते.

अधिक वाचा : Kidney Disease: चोर पावलाने येत आहेत किडनीच्या समस्या, वेळीच व्हा सावध आणि टाळा हे पदार्थ...

तेलाने मालिश करा

केसांना भरपूर पोषण आवश्यक असते. म्हणजेच आठवड्यातून तीनदा केसांना मसाज करा, त्याचा फायदा होईल. यामुळे तुमच्या केसांची वाढ थांबणार नाही, उलट तुमचे केस सहज वाढू लागतील.

आता पावसाळ्याचा सीझन सुरू झाला आहे. पावसाळ्यात आरोग्याच्या विविध समस्या उद्भवतात. यात केसांच्या आरोग्याचाही प्रश्न असतो. पाऊस पडल्यावर जितका आनंद होतो तितकीच भीती केसांची असते कारण अशा परिस्थितीत केस खूप गळायला लागतात. पावसाळा हा आपल्या केसांच्या आरोग्यासाठी सर्वात वाईट मानला जातो. हवामानातील आर्द्रतेमुळे केस तुटण्यास सुरुवात होते, त्यामुळे या ऋतूत केसांची चांगली काळजी घेणे (Hair care) खूप गरजेचे आहे. 

अधिक वाचा : Weight Loss Tips :ही 4 व्हिटॅमिन युक्त फळे वजन कमी करण्यासाठी आहेत खूप फायदेशीर

केस जास्त धुवू नका - पावसाळ्यात केस वारंवार धुणे टाळा कारण टाळूवरील ओलावामुळे ते कोरडे आणि निर्जीव होतात आणि गळू लागतात. याशिवाय पावसात केस ओले झाले तरी आधी ते कोरडे होऊ द्या आणि तेल लावल्यानंतरच केस सौम्य शाम्पूने धुवा.

केसांना पूर्ण पोषण द्या - अशा हवामानात केसांना पूर्ण पोषण मिळणे आवश्यक असते, त्यामुळे केसांमध्ये तेल ठेवा आणि दर 15 दिवसांतून एकदा केसांचे डीप कंडिशनिंग करा. याशिवाय भरपूर पाणी प्या आणि जास्त प्रमाणात कॅफीन पिणे टाळा.

आरोग्यदायी आहार महत्त्वाचा - आरोग्यदायी आहार तुमच्या आरोग्यासाठी तसेच तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठीही महत्त्वाचा आहे. या ऋतूत केसांना पोषण देणारे सुपरफूडच खावेत. अशा हवामानात जंक फूड आणि तेलकट पदार्थ टाळावेत.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी