तुम्हाला अॅसिडिटीा त्रास आहे का? तर खाण्याच्यापिण्याच्या सवयीत करा हे बदल

तब्येत पाणी
Updated Feb 19, 2021 | 12:08 IST | टाइम्स नाऊ मराठी

Acidity Problem health remedies In Hindi: सध्याच्या युगात प्रत्येक दोनपैकी एक व्यक्ती अॅसिडिटीने त्रस्त आहे. यासाठी जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीत बदल करून तुम्ही यापासून सुटका मिळवू शकता. 

acidity
तुम्हाला अॅसिडिटीा त्रास आहे का? हे जाणून घ्या 

थोडं पण कामाचं

  • अॅसिडिटीपासून बचाव करण्यासाठी योग्य वेळेत जेवण करा
  • अॅसिडिटीपासून बचावासाठी जेवण आणि खाणे यात तीन तासांचे अंतर ठेवा
  • अॅसिडिटीपासून दूर राहण्यासाठी डाएटमध्ये गरजेपेक्षा जास्त कॅलरीजचा समावेश करू नका

मुंबई: हल्ली प्रत्येकाला अॅसिडिटीची(acidity) समस्या सतावत असते. अॅसिडिटी हा कोणताही आजार नाही. मात्र सातत्याने अॅसिडिटी होत राहिल्यास हे अनेक आजारांना निमंत्रण ठरू शकते. वारंवार पोट फुगणे, पोटात जळजळ होणे, पोट दुखणे, खाण्याची इच्छा न होणे, मन बैचेन होणे, जीव घाबराघुबरा होणे ही सर्व अॅसिडिटीची लक्षणे आहेत. यासाठी वेळेवर न जेवणे, तणाव, तसेच एकाच वेळेस भरपूर खाणे, धूम्रपान, खाण्यापिण्याच्या सवयी, जीवनशैलीतील बदल यामुळे अॅसिडिटीचा त्रास सतावतो. 

योग्य वेळेत यावर उपचार केले गेले नाही तर गंभीर आजराचा सामना करावा लागू शकतो. जीवनशैली आणि खाण्यापिण्याच्या सवयीत सामान्य बदल करून आपण या समस्येपासून सुटका मिळवू शकतो. अॅसिडिटपासून सुटका मिळवण्यासाठी आम्ही येथे काही उपाय सांगत आहोत. ज्यामुळे तुमचे आरोग्य चांगले राखण्यास मदत होईल.

अॅसिडिटीपासून बचावासाठी तणावमुक्त राहा

अॅसिडिटी आणि तणावाचा संबंध आहे. हे ऐकण्यास तुम्हाला थोडे विचित्र वाटेल. मात्र तणावामुळे केवळ तुमचे वजनच वाढत नाही तर अॅसिडिटीचीही समस्या उत्पन्न होते जर तुम्हाला अॅसिडिटी दूर ठेवायची असेल तर तणावास दूर ठेवा. एका संशोधनानुसार तणावाचा अॅसिडिटीशी गाढ संबंध आहे. सातत्याने तणाव असेल तर पोटासंबंधी विकार उद्भवतात. 

वेळेवर जेवण घेणे

अॅसिडिटीच्या समस्येपासून बचावासाठी वेळेत जेवण घ्या. कारण जेव्हा भूक लागलेली असतानाही तुम्ही जेवत नाही तेव्हा गॅस्ट्रिक रस आणि पोटात जळजळ होते. यानंतर तुम्ही एकदम भरपेट जेवल्यास ते जेवण पचण्यास त्रास होतो. यामुळे अॅसिडिटीपासून वाचण्यााठी योग्य वेळेत जेवा. 

जेवण आणि झोप यांच्यात पुरेसे अंतर

भोजन आणि झोप यांच्यात पुरेसे अंतर राखल्यास अॅसिडिटीचा त्रास उद्भवणार नाही. यासाठी तुम्ही रात्री झोपण्यासाठी कमीत कमी २ ते ३ तास आधी जेवले पाहिजे. जेवल्यानंतर थोडेसे चाला. अनेकजण जेवल्यानतंर लगेचच झोपतात. यामुळे अॅसिडिटीचा त्रास होऊ शकतो. 

पूर्ण झोप घ्या

रात्रीची चांगली झोप नाही मिळाली तरीही अॅसिडिटी तसेच बद्धकोष्ठतेचा त्रास होण्यास कारणीभूत ठरते. झोप पूर्ण झाल्यास अॅसिडिटीची समस्या आपल्यापासून दूर राहते. तसेच थकवा आणि तणावही कमी होतो.

अधिक कॅलरीजचे सेवन नको. 

अॅसिडिटीपासून सुटका मिळवण्यासाठी आपल्या डाएटमध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी ठेवा. अधिक कॅलरीजचे सेवन केल्यास तुम्हाला अस्वस्थ वाटू शकते. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी