कोरोनाची लस घेतल्यानंतर नाही येणार अशक्तपणा, फक्त 'या' गोष्टींचं करा सेवन

देशात कोरोनाबाधितांचा आकडा झापाटाने वाढत आहे. वाढत्या रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी सरकार जोरदार प्रयत्न करत आहे.

You will not feel any weakness after taking corona vaccine
कोरोनाची लस घेतल्यानंतर नाही येणार अशक्तपणा  |  फोटो सौजन्य: Indiatimes

थोडं पण कामाचं

  • लस घेतल्यानंतर अशक्तपणा, ताप येतो का ?
  • हिरव्या भाज्या आहेत उपयोगी
  • कांदा-लसूण खाणं आतड्यांसंबंधी आरोग्यासाठी फायदेशीर

नवी दिल्ली : देशात कोरोनाबाधितांचा आकडा झापाटाने वाढत आहे. वाढत्या रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी सरकार जोरदार प्रयत्न करत आहे. सरकारने राज्यात लॉकडाऊन वाढवला असून त्यातून संसर्गाची साखळी तुटण्यात मदत होईल त्याचबरोबर आरोग्य यंत्रणांनी लसीकरणाचं प्रमाण वाढवलं आहे. आता १८ वर्षावरील व्यक्तींना लस दिली जाणार असून त्याची नोंदणी पण केली जाऊ लागली आहे.

दरम्यान लस घेतल्यानंतर काही लोकांना त्याचा त्रास होत असल्याची बातमी आपण ऐकत आहोत, पण लस घेतल्यानंतर होणाऱ्या त्रासाला नागरिकांनी घाबरू नये असं आरोग्य विभागाकडून वारंवार सांगत येत आहे. माध्यामामध्ये आलेल्या वृतांनुसार, लस घेतल्यानंतर काही लोकांना ताप, अंग दुखी सारखा त्रास होत आहे. यामुळे अनेकजण लस घेण्यास टाळाटाळ करत आहेत. दरम्यान लस घेतल्यानंतर होणारे साईड इफेक्ट्सपासून वाचण्यासाठी काय केलं पाहिजे यावरून हॉवर्ड न्यूट्रीशियनने इंस्ट्राग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. याच्या माध्यमातून त्यांनी सांगितले की, लस घेतल्यानंतर आपल्या आहारात थोडा बदल करावा. कोणत्या घटकांचा आपल्या आहारात समावेश हवा याविषयी आपण जाणून घेऊ..

ताज्या भाज्याचं करा सेवन

आपल्या आहारात हिरवा भाजीपाल्याचे सेवन करावे. हिरव्या भाज्यांमध्ये अनेक पोषक घटक असतात. पालक, केळ आणि ब्रोकली सारख्या भाज्या आपल्या आहारात समाविष्ट करऊ घ्या. या भाज्यांमध्ये अँटीऑक्सिडंट अधिक प्रमाणात असते.

 घरी बनवलेले सूप प्या 

शरिरातील रोग प्रतिकारकशक्ती वाढविण्यासाठी चांगला आहार असणं आवश्यक आहे. यामुळे स्टू आणि सूपचं आपल्या आहारात समावेश करा.  

खा कांदा- लसूण

कांदा- लसूणमध्ये प्रोबियोटिक्स अधिक असतात.कांदा फायबर आणि प्रीबायोटिक्स (चांगले बॅक्टेरिया) चे समृद्ध स्त्रोत आहे, जे आतड्यांसंबंधी आरोग्यासाठी आवश्यक आहे.

हळद वाढवते रोग प्रतिकारशक्ती 

हळद आपल्या शरीराची प्रतिकारशक्ती वाढवते, ज्यामुळे आपलं सर्व प्रकारच्या संसर्गजन्य रोगांपासून संरक्षण होतं. शिवाय लस घेतल्यानंतर हाताला सूज येत असते, त्यापासून हळद तुम्हाला वाचवेल. याबरोबर आपल्या मेंदूला तणावापासून देखील वाचवते.
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी