झिंकच्या कमतरतेने मृत्यू येतो जवळ; दीर्घायुषी व्हायचं असेल तर खा ‘हे’ 10 पदार्थ

शरीराला निरोगी (healthy) आणि चांगले कार्य करण्यासाठी सर्व पोषक तत्वांची (nutrients) आवश्यकता असते. असे अनेकदा दिसून आले आहे की लोक सहसा फक्त प्रोटीन (protein), कॅल्शियम (Calcium) आणि लोह यांसारख्या पोषक तत्वांबद्दल बोलतात. पण तुम्हाला माहिती आहे का झिंक (Zinc) शरीराच्या सर्व अवयवांच्या चांगल्या आरोग्यासाठी महत्वाचे असते.

 Zinc deficiency is near death, what to do for longevity
झिंकच्या कमतरतेने मृत्यू येतो जवळ, दीर्घायुषीसाठी काय कराल  |  फोटो सौजन्य: Indiatimes
थोडं पण कामाचं
  • झिंक हे रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्यासाठी, जखमा भरण्यासाठी आणि गर्भधारणा, बालपण आणि तारुण्यात शरीराच्या विकासासाठी आवश्यक असते.
  • मांस खात नसाल तर एक मोठ्या बटाटा एक मिलीग्राम झिंकची ९% गरज पुरवू शकतो.
  • झिंकची कमतरता असेल तर केस गळणे, नखांमध्ये बदल, जुलाब, संसर्ग, चिडचिड वाटणे, भूक न लागणे, नपुंसकत्व दोष दिसू लागतात.

नवी दिल्ली : शरीराला निरोगी (healthy) आणि चांगले कार्य करण्यासाठी सर्व पोषक तत्वांची (nutrients) आवश्यकता असते. असे अनेकदा दिसून आले आहे की लोक सहसा फक्त प्रोटीन (protein), कॅल्शियम (Calcium) आणि लोह यांसारख्या पोषक तत्वांबद्दल बोलतात. पण तुम्हाला माहिती आहे का झिंक (Zinc) शरीराच्या सर्व अवयवांच्या चांगल्या आरोग्यासाठी महत्वाचे असते. झिंकची कमतरता तेव्हा होते जेव्हा शरीरात खनिजे पुरेशा प्रमाणात नसतात. 

झिंक हे रोगप्रतिकारकशक्ती मजबूत करण्यासाठी, जखमा भरण्यासाठी आणि गर्भधारणा, बालपण आणि तारुण्यात शरीराच्या विकासासाठी आवश्यक असलेले पोषक तत्व आहे. झिंकच्या कमतरतेमुळे त्वचेमध्ये तीव्र बदल होऊ शकतात. सुरुवातीला ते एक्जिमासारखे दिसतात. हे पुरळ सहजासहजी बरे होत नाही. याशिवाय केस गळणे, नखांमध्ये बदल, जुलाब, संसर्ग, चिडचिड वाटणे, भूक न लागणे, नपुंसकत्व, डोळ्यांच्या समस्या, वजन कमी होणे, पटकन बरे न होणारे फोड किंवा चव आणि वास कमी होणे असे अनुभव येऊ शकतात.

Read Also : सनफ्लॉवर ऑइल द्या अन् आमच्याकडून बीअर घ्या; काय आहे ही स्कीम

हेल्थ डायरेक्टच्या अहवालानुसार, जर झिंकच्या कमतरतेवर वेळीच उपचार केले गेले नाहीत तर तुम्हाला अनेक गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जावे लागू शकते. गंभीर लक्षणांमध्ये संसर्ग, हायपोगोनॅडिझम, वजन कमी होणे, तणाव-चिंता, त्वचारोग, चव कमी होणे, रातांधळेपणा, भूक न लागणे, जखम भरण्यास उशीर होणे आणि रक्तातील अमोनियाचे प्रमाण वाढणे यांचा समावेश होतो. 

शरीराला दररोज किती झिंक आवश्यक ?

न्युट्रिशन डेटानुसार, पुरुषांना दररोज ११ मिलीग्रॅम झिंकची आवश्यकता असते तर महिलांना ८ मिलीग्रॅमची आवश्यकता असते. जर तुम्ही गर्भवती असाल, तर तुम्हाला दररोज ११ मिलीग्रॅमची आवश्यकता असते आणि जर तुम्ही स्तनपान करत असाल तर तुम्हाला १२ मिलीग्रॅमची आवश्यकता असते.

मांस चांगला स्रोत आहे

लाल मांस झिंकचा चांगला स्रोत आहे. १०० ग्रॅम (३.५ - औंस) मांसामध्ये ४.८ मिलीग्रॅम झिंक असते, जे दैनंदिन गरजेच्या ४४% आहे. या मांसामध्ये १७६ कॅलरीज, २० ग्रॅम प्रथिने आणि १० ग्रॅम चरबी आढळते.

Read Also : 'भावना' दुखावल्यामुळे गवळी गटही झाला शिंदे गटात सामील

झिंकच्या कमतरतेवर मात करण्यासाठी खा शेंगा

छोले, डाळ आणि बिन्स सारख्या शेंगांमध्ये झिंक पुरेशा प्रमाणात उपलब्ध असते. १०० ग्रॅम शिजवलेल्या डाळीमध्ये दैनंदिन गरजेच्या १२% झिंक असते. या गोष्टी प्रोटीन आणि फायबरचाही चांगला स्रोत आहेत.

दुग्धजन्य पदार्थ आहेत  झिंकचे मजबूत स्रोत

पनीर आणि दूध यांसारखे दुग्धजन्य पदार्थ झिंकसह अनेक पोषक घटक देतात. त्यात दूध आणि पनीरमध्ये झिंकचे प्रमाण जास्त असते. उदाहरणार्थ, १०० ग्रॅम पनीरमध्ये दैनंदिन गरजेच्या २८% झिंक असते तर एक कप दुधात सुमारे ९% असते.

Read Also : सिंगापूर ओपनच्या अंतिम सामन्यात पी. व्ही.सिंधूचा विजय

झिंकच्या कमतरतेवर मात कशी करावी - अंडी खा

अंड्यांमध्ये मध्यम प्रमाणात झिंक असते आणि त्यामुळे तुमचे रोजचे उद्दिष्ट पूर्ण होण्यास मदत होते. उदाहरणार्थ, १ मोठ्या अंड्यामध्ये ५% झिंक आवश्यक असते. हे ७७ कॅलरीज, ६ ग्रॅम प्रथिने, ५ ग्रॅम निरोगी चरबी आणि बी जीवनसत्त्वे आणि सेलेनियमसह इतर अनेक जीवनसत्त्वे आणि खनिज पुरवते.

काही भाज्या आहेत फायदेशीर 

सर्वसाधारणपणे, फळे आणि भाज्या झिंकचे फारसे चांगले स्त्रोत नाहीत. तथापि, काही भाज्यांमध्ये योग्य प्रमाणात झिंक असते आणि ते तुमच्या दैनंदिन गरजांमध्ये योगदान देऊ शकतात, विशेषतः जर तुम्ही मांस खात नाही. एक मोठ्या बटाटा एक मिलीग्राम झिंकची ९% गरज पुरवू शकतो. तुम्ही हिरव्या सोयाबीनपासून सुमारे ३% मिळवू शकता. 

(टीप: हा लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. हा कोणत्याही प्रकारे कोणत्याही औषधाचा किंवा उपचारांचा पर्याय असू शकत नाही.)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी