Benefits Of Eating Corn: चमकदार त्वचेसाठी पावसाळ्यात खा मक्याचे कणीस

Benefits Of Eating Corn: पावसाळा म्हटलं की जिभेचे चोचले वाढतात. या ऋतूत गरमागरम मक्याचे कणीस खाण्याची मज्जा काही वेगळीच असते. चविष्ट असलेले मक्याचे कणीस फक्त जिभेचे चोचलेच पूर्ण करत नाही तर हे आरोग्यसाठीही फायदेशीर ठरतं. फायबर, व्हिटॅमिन ए, कॅरोटीनॉइड्स आदी महत्त्वाचे पोषक तत्त्वांनी समृद्ध मक्याचे कणीस त्वचेच्या आरोग्यासाठी फार उपयुक्त ठरतं. तुम्ही अनेक पद्धतीने मक्याचे कणीस खाऊ शकतात.

Updated Sep 18, 2023 | 09:51 PM IST

Benefits Of Eating Corn

Benefits Of Eating Corn

फोटो साभार : TNN
Benefits Of Eating Corn: पावसाळा म्हटलं की जिभेचे चोचले वाढतात. या ऋतूत गरमागरम मक्याचे कणीस खाण्याची मज्जा काही वेगळीच असते. चविष्ट असलेले मक्याचे कणीस फक्त जिभेचे चोचलेच पूर्ण करत नाही तर हे आरोग्यसाठीही फायदेशीर ठरतं. फायबर, व्हिटॅमिन ए, कॅरोटीनॉइड्स आदी महत्त्वाचे पोषक तत्त्वांनी समृद्ध मक्याचे कणीस त्वचेच्या आरोग्यासाठी फार उपयुक्त ठरतं. तुम्ही अनेक पद्धतीने मक्याचे कणीस खाऊ शकतात. आजचा हा लेख त्याच विषयावर असून आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की, पावसाळ्यात मक्याचे कणीस खाल्ल्याने त्वचेला आणि संपुर्ण आरोग्याला काय लाभ होते.

प्रतिकारशक्ती

पावसाळा हा ऋतू आनंदासह काही आरोग्यविषयक समस्या देखील सोबत घेऊन येतो. या ऋतूत वातावरण बदल झाल्यामुळे व्हायरल इन्फेक्शनसह इतर साथ रोगांचा धोका वाढतो. पावसाळ्यात वातावरणातील बदलामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते. अशा परिस्थितीत रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मक्याच्या कणीसाचे सेवन फायद्याचे ठरते. पावसाळ्यात तुम्ही रोज देखील मक्याचे कणीस खाऊ शकता.

पचन संस्था होते मजबूत

पावसाळ्यात दुषित पाण्यामुळे अनेक आजार निर्माण होतात. याचा सर्वाधिक परिणाम पाचनसंस्थेवर होतो. पाचनक्रिया व्यवस्थित नसेल तर पोटदुखी, अपचनाची समस्या, गॅस आदी त्रास होते. ही समस्या टाळण्यासाठी मक्याच्या कणीसाचे सेवन करणे लाभदायक ठरतं. यामुळे पचनाशी संबंधित तक्रारी दूर होतात. मक्यामध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते, जे आरोग्यला लाभदायक ठरतं.

खोकल्याची समस्या

पावसाळ्यात सर्दी-खोकल्याची समस्या निर्माण होते. या परिस्थितीत मक्याचे कणीस खाल्ल्याने खोकल्याची समस्या दूर होण्यास मदत होते.

त्वचेला होतो लाभ

पावसाळ्यात आरोग्याच्या इतर समस्यांसह त्वचेची समस्या देखील निर्माण होते. यात
त्वचेवर पुरळ आणि लालसरपणाची समस्या वाढते. त्वचेच्या या समस्येमुळे तुमच्या सौंदर्यावर परिणाम होतो. त्वचेची ही समस्या दूर करत चमकदार त्वचेसाठी तुम्ही मक्याचे सेवन करु शकता. मक्याच्या कणीसमध्ये अँटी-ऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे त्वचेचा पोत सुधारत त्वचेचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते.
(टीप - या लेखात दिलेली माहिती ही उपलब्ध स्त्रोतांवर आधारित आहे. Times Now Marathi या माहितीचे समर्थन करत नाही. प्रत्येकाची शारीरिक स्थिती वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करून पाहण्याआधी संबंधित आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited