Fertility Tips: प्रजनन क्षमता सुधारण्यासाठी तुमच्या जीवनशैलीतील या 5 गोष्टींकडे लक्ष द्या

जर पुरुष खूप घट्ट कपडे किंवा अंडरगारमेंट घालत असेल तर त्यांचा अंडकोष शरीराला चिकटतात. शरीराचे तापमान अंडकोषांपेक्षा जास्त गरम असते. त्यामुळे त्यांच्यामध्ये शुक्राणू योग्य प्रकारे तयार होत नाहीत. अंडकोष शरीराला टिकटून नसावे याची खात्री करा. त्यामुळे पुरुषांना सैल अंडरवेअर घालण्याचा सल्ला दिला जातो.

Updated May 25, 2023 | 09:50 AM IST

change these 5 things in your lifestyle to improve fertility.

change these 5 things in your lifestyle to improve fertility

फोटो साभार : BCCL
How To Improve Fertility: बरेच नागरिक जागरूक असूनही लोक महिलांमध्येच आई बनण्यास सक्षम होण्याची कारणे शोधतात. काहीवेळा कोणतीही आरोग्य स्थिती यासाठी जबाबदार नसते. खराब जीवनशैलीमुळे वंध्यत्वाची समस्या स्त्री आणि पुरुष दोघांनाही होऊ शकते. जर तुम्हालाही बेबी प्लॅन करायचा असेल तर तुमच्या जीवनशैलीच्या सवयी आणि त्याचा तुमच्या प्रजनन क्षमतेवर कसा परिणाम होतो हे जाणून घेणे गरजेचे आहे. (change these 5 things in your lifestyle to improve fertility)

इंटरकोर्स (Intercourse)

काही वेळा पुरुषांना प्रवेशाची योग्य जागा कोणती हेच कळत नाही. अनेक वेळा चुकीच्या ठिकाणाहून संभोग केल्यामुळेही महिला गर्भधारणा करू शकत नाहीत. त्यामुळे आधी तुमच्या डॉक्टरांकडून त्याबद्दल माहिती घ्या आणि मग प्रयत्न करा

ताण तणाव (Manage stress)
तणावामुळेही वंध्यत्व येऊ शकते. म्हणूनच तणाव कमी करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही योग, व्यायाम आणि ध्यान करावे. उच्च पातळीचा ताण प्रजननक्षमतेवर परिणाम करू शकतो.

लुब्रिकेंट (Lubricant)

कधीकधी आपण संभोग करताना काही ल्युब्स वापरतो. बाजारात अनेक लुब्रिकेंट उपलब्ध आहेत. काही साध्या असतात, तर काही सुगंधी असतात. त्यापैकी शुक्राणू नष्ट करणारे अनेक लुब्रिकेंट आहेत. म्हणून तज्ञांचा सल्ला घेतल्यानंतरच लुब्रिकेंटची निवड करा.

पुरेशी झोप घ्या (Get enough sleep)

हार्मोनल समतोल राखण्यासाठी आणि एकूणच आरोग्यासाठी पुरेशी झोप घेणे आवश्यक आहे. रात्री 7-9 तासांची झोप घ्या. कधीकधी झोपेच्या कमतरतेमुळे, स्त्रियांची मासिक पाळी अनियमित होते, याचा परिणाम प्रजनन क्षमतेवरही होतो.

दारू आणि धूम्रपान टाळा (Alcohol and Smoking)

कोणत्याही प्रकारचा नशा स्त्रियांच्या गर्भाच्या गुणवत्तेवर परिणाम करतो. तसेच, पुरुषांमधील शुक्राणूंची संख्या आणि मूवमेंटवरही त्याचा परिणाम होतो. म्हणूनच तुमच्या जीवनशैलीतून दारू आणि धूम्रपान पूर्णपणे कमी करणे महत्त्वाचे आहे. किमान तुम्ही बेबी प्लॅन करत असाल त्या वेळेपर्यंत तरी या नियमाचे काटेकोरपणे पालन करा.

पुरुषांनी खूप घट्ट कपडे घालू नये (Tight undergarments)

जर पुरुष खूप घट्ट कपडे किंवा अंडरगारमेंट घालत असेल तर त्यांचा अंडकोष शरीराला चिकटतात. शरीराचे तापमान अंडकोषांपेक्षा जास्त गरम असते. त्यामुळे त्यांच्यामध्ये शुक्राणू योग्य प्रकारे तयार होत नाहीत. अंडकोष शरीराला टिकटून नसावे याची खात्री करा. त्यामुळे पुरुषांना सैल अंडरवेअर घालण्याचा सल्ला दिला जातो.

पौष्टिक आहार घ्या (Balanced diet)

फळे, भाज्या, संपूर्ण धान्य, पातळ प्रथिने यांचा समावेश असलेला संपूर्ण आहार घ्या. बेरी, पालेभाज्या आणि नट यांसारख्या अँटिऑक्सिडंट-समृद्ध पदार्थांचा समावेश करा. यामुळे तुमचे लैंगिक आरोग्यही चांगले राहिल.

वजन मेंटेन ठेवा (Healthy weight)

लठ्ठपणा आणि कमी वजन या दोन्ही गोष्टी प्रजननक्षमतेवर परिणाम करू शकतात. संतुलित आहाराचे पालन करणे आणि नियमित वर्कआउट केल्याने वजन मेंटेन राहते.

बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited