Weightloss Tips : 6 पदार्थ खा आणि झटपट वजन कमी करा

Weightloss Tips In Marathi : लठ्ठपणा, रक्तदाब, मधुमेह अशा अनेक समस्यांपासून स्वतःची सुटका करून घेणे शक्य आहे. यासाठी सोपे आणि प्रभावी असे घरगुती उपाय उपलब्ध आहे. पण गरज आहे ती हे उपाय न कंटाळता सातत्याने करण्याची. यामुळेच वजन कमी होण्यास मदत होईल. लठ्ठपणा तसेच शरीराशी संबंधित इतर समस्या बऱ्या होण्यास मदत होईल.

Updated May 21, 2023 | 09:46 AM IST

eat 6 foods and lose weight fast

eat 6 foods and lose weight fast

Weightloss Tips In Marathi : एकाच ठिकाणी बसून दीर्घकाळ काम करणे, जंकफूड आणि फास्टफूड खाणे, तळलेल्या पदार्थांवर ताव मारणे अशा शरीराला अपायकारक असलेल्या सवयींमुळे अनेकांचे वजन वेगाने वाढते. अपुरी झोप, इतर शरीराला हानीकारक असलेल्या सवयी यांच्यामुळेही वजन वाढते. यातून लठ्ठपणा, रक्तदाब, मधुमेह अशा अनेक समस्या सतावू लागतात. या समस्यांपासून स्वतःची सुटका करून घेणे शक्य आहे. यासाठी सोपे आणि प्रभावी असे घरगुती उपाय उपलब्ध आहे. पण गरज आहे ती हे उपाय न कंटाळता सातत्याने करण्याची. यामुळेच वजन कमी होण्यास मदत होईल. लठ्ठपणा तसेच शरीराशी संबंधित इतर समस्या बऱ्या होण्यास मदत होईल. तज्ज्ञांच्या मते दररोजच्या आहारात मर्यादीत प्रमाणात सहा पदार्थांचे सेवन केले तर वजन झपाट्याने कमी होऊ शकते. आज जाणून घेऊ हे सोपे उपाय....
  1. मूग डाळ : मुगाच्या डाळीतून शरीराला प्रोटिन्स अर्थात प्रथिने आणि फायबर अर्थात अन्न पचनासाठी उपयुक्त असे तंतुमय पदार्थ मोठ्या प्रमाणात मिळतात.यामुळे आहारात मुगाच्या डाळीचे वरण किंवा तांदूळ आणि मुगाची डाळ असे कॉम्बिनेशन वापरून केलेली खिचडी या पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे. यामुळे दिवसभराच्या कामांसाठी ऊर्जा मिळेल. तसेच अन्नाचे पचन व्यवस्थित होण्यास मदत होईल. मुगाची डाळ खाल्ल्याने शरीरातील कोलेसीस्टोकिनिन हार्मोनची पातळी वाढते आणि लवकर पोट भरल्याची जाणीव होते. मुगाच्या डाळीचा समावेश आहारात केल्याने वजन कमी करण्यास मदत होते. डाळीतले प्रोटिन शरीरातील अतिरिक्त मेद (Fats) कमी करण्यासाठी लाभदायी आहे. याच कारणामुळे मुगाच्या डाळीचा समावेश सुपरफूडमध्ये होतो.
  2. ताक : ताक पिण्याने शरीराला प्रोटिन, कॅल्शियम, मर्यादीत कॅलरी मिळतात. ताक पिण्याने अन्न पचनाला मदत होते. ताक हेल्दी प्रोबायोटिक, व्हिटॅमिन्स आणि मिनरल्स अर्थात खनिजाने संपन्न आहे. पाणीदार ताक पिण्याने शरीरातील विषद्रव्ये बाहेर टाकणे सोपे होते. उन्हाळ्यात ताक पिण्याने शरीराला फायदा होतो. ताक पिण्याने वाढलेले वजन कमी होण्यास मदत होते आणि योग्य असलेले वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच शरीरातले पाण्याचे संतुलन जपण्यासाठीही ताक पिणे फायद्याचे ठरते.
  3. चिया सीड्स अर्थात सब्जा : चिया सीड्समधून शरीराला ओमेगा थ्री फॅटी अॅसिड, फायबर आणि प्रोटिन मिळते. यामुळे अन्न पचनास मदत होते. वजन कमी करण्यासाठी चिया सीड्स खाणे लाभदायी आहे.
  4. रागी : रागीमध्ये मेथिओनाइन अमिनो अॅसिड आहे. रागीचा पदार्थ खाल्ल्याने अतिरिक्त वजन कमी करण्यास मदत होते. रागी या पदार्थाचा आहारात समावेश केल्याने वजन कमी करण्यास मदत होते.
  5. राजगिरा : राजगिरा खाल्ल्याने शरीराला प्रोटिन्स आणि फायबर मिळते. राजगिरा या पदार्थाचा आहारात समावेश केल्याने वजन कमी करण्यास मदत होते.
  6. फ्लॉवर : आहारात भाजी म्हणून फ्लॉवरचा समावेश केला तर शरीराला फायबर, प्रोटिन आणि लो कॅलरी मिळतात. याच कारणामुळे या भाजीला वेट लॉस साठी उपयुक्त भाजी म्हणून ओळखले जाते.
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited