ट्रेंडिंग:

Side Effects of Eating Rice at Night : रात्री भात खाण्याची सवय तब्येतीसाठी घातक, देईल 5 गंभीर आजारांना आमंत्रण

Right Time To Eat White Rice : भारतात भात खाणाऱ्यांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. भात खाल्ल्यावर अनेक भारतीयांना जेवण पूर्ण झाल्यासारखे वाटते. याच कारणामुळे दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात भाताचा समावेश करणाऱ्या भारतीयांची संख्या मोठी आहे. पण रात्रीच्या वेळी भात खाणे तब्येतीसाठी घातक आहे, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. रात्री भात खाऊन झोपल्याने अन्न लवकर पचन नाही. यामुळे तब्येतीशी संबंधित समस्या निर्माण होतात. रात्री भात खाण्याची सवय 5 गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकते, असेही तज्ज्ञ सांगतात.

Updated Jun 2, 2023 | 02:10 PM IST

white rice

white rice

Perfect Time To Eat White Rice : भारतात भात खाल्ल्याशिवाय अनेकांना जेवण पूर्ण झाले असे वाटतच नाही. देशात भाताचे अनेक प्रकार तयार केले जातात. यातही पांढऱ्या रंगाचा भात खाणाऱ्यांची संख्या मोठी आहे. देशात भात खाणाऱ्यांची संख्या कोट्यवधींच्या घरात आहे. अनेक भारतीय दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणात असे दोन वेळा भात खाणे पसंत करतात. नोकरी व्यवसायामुळे दुपारी भात खाणे शक्य नसेल तर किमान रात्रीच्या जेवणात भाताचा समावेश करणाऱ्यांची संख्याही मोठी आहे. पण तज्ज्ञांच्या नागरिकांच्या भात खाण्याच्या सवयीविषयी वेगळे मत आहे. तज्ज्ञांच्या मते रात्री भात खाण्याची सवय तब्येतीसाठी घातक आहे. ही सवय 5 गंभीर आजारांना आमंत्रण देऊ शकते, असे तज्ज्ञ सांगतात.
भात खाण्याने शरीराला कर्बोदकांच्या माध्यमातून ऊर्जा मिळते. भातातील फायबर अन्न पचनाच्या प्रक्रियेस मदत करते. पण भातात फायबर मर्यादीत स्वरुपात असते. या उलट भातामध्ये कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. याच कारणामुळे व्यायाम करून स्नायू बळकट करणाऱ्यांना मर्यादीत प्रमाणात भात खाण्याचा सल्ला दिला जातो. भातातून शरीराला थोड्या प्रमाणात प्रोटिन्स अर्थात प्रथिने पण मिळतात. अनेक तज्ज्ञ दुपारच्या जेवणाच्या वेळी मर्यादीत प्रमाणात पांढरा भात खाण्याचा सल्ला देतात. पण रात्री कोणत्याही प्रकारचा भात खाण्याने नुकसान होऊ शकते, असे अनेक तज्ज्ञ सांगतात.
भात या पदार्थात कर्बोदकांचे प्रमाण जास्त असते. भात पचण्यासाठी वेळ लागतो. याच कारणामुळे मधुमेहाच्या रुग्णांना भात खाऊ नका अथवा अगदी मर्यादीत प्रमाणातच भात खा, असा सल्ला तज्ज्ञ देतात. रात्रीच्या वेळी भात खाण्याची सवय मधुमेहाच्या रुग्णांसाठी हानीकारक आहे. याच कारणामुळे तज्ज्ञ मधुमेहींना रात्री भात खाऊ नका असा सल्ला अनेकदा देतात.
भात खाण्याने शरीरातील साखरेचे प्रमाण लगेच वाढते. रात्री भात खाल्ला तर शरीरातील साखरेचे प्रमाण वेगाने वाढते. ही बाब लक्षात घेऊन तज्ज्ञ रात्री भात खाणे टाळा असा सल्ला मधुमेहाच्या रुग्णांना हमखास देतात.
भाताचा अतिरेक केला, रात्री भात खाल्ला तर पोटाचे विकार बळावण्याचा तसेच उच्च रक्तदाबाचा त्रास होण्याचा धोका असतो. तसेच रात्री भात खाल्ल्याने हृदयाची कार्यक्षमता मंदावण्याचाही धोका असते. रात्री भात खाण्याची सवय वजन वाढवण्यासही कारणीभूत ठरू शकते.
हल्ली तांदूळ पिकवताना त्यावर अनेक प्रकारच्या रसायनांची फवारणी केली जाते. भाताच्या मुळांजवळ अनेक कृत्रिम खते टाकली जातात. यातील रसायने भातामुळे शरीरात जाऊन अपाय करण्याचा धोका असतो. ही बाब लक्षात घेऊन रात्री भात खाणे टाळावे. दुपारी तांदूळ किमान 3 ते 4 वेळा व्यवस्थित धुऊन नंतर शिजवावा आणि मर्यादीत प्रमाणात गरम भात खावा, असा सल्ला तज्ज्ञ देतात.
रात्री भात खाण्याने होऊ शकणारे 5 गंभीर आजार
 1. मधुमेह
 2. हृदयविकार
 3. वजन वाढणे / लठ्ठपणा
 4. उच्च रक्तदाबाची समस्या
 5. कॅन्सर
ताज्या बातम्या

Vivo Price Drop: महिन्याभरात दुसऱ्यांदा स्वस्त झाले Vivo चे हे 2 स्मार्टफोन, जाणून घ्या नवीन किंमत

Vivo Price Drop   Vivo  2

Rahu Ketu Gochar 2023: दिवाळीपूर्वी राहू-केतूचे मोठे संक्रमण, या 5 राशी होणार मालमाल

Rahu Ketu Gochar 2023 -  5

IIT Bombay: मुंबई IIT मध्ये शाकाहार-मांसाहारावरून पुन्हा वाद! मांसाहार करणाऱ्या विद्यार्थ्याला 10 हजारांचा दंड

IIT Bombay IIT -   10

Nanded Government Hospital Deaths: नांदेडमध्ये मृत्यूचं थैमान! आणखी 7 जणांचा मृत्यू, 4 बालकांचा समावेश; अशोक चव्हाण यांचं ट्वीट

Nanded Government Hospital Deaths   7  4

Asian Games 2023: यशस्वी जैस्वालने इतिहास रचला! आशियाई क्रीडा स्पर्धेत शतक झळकावणारा पहिला भारतीय

Asian Games 2023

इक्सिगोची 'इक्सिगो अशुअर्ड' सेवा, निवडक आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट बुकिंग्‍जवर मिळणार Complete Refund Facility

     Complete Refund Facility

Lok Sabha Election 2024: काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवणार?

Lok Sabha Election 2024

Nanded News: नांदेडच्या शासकीय रुग्णालयात नेमकं काय घडलं? रुग्णालय प्रशासनानं सांगितलं कारण

Nanded News
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited