4 Side Effects Of Using Mobile Phone: अर्ध्या तासाहून अधिक मोबाईलचा वापर ठरू शकते घातक

Side Effect Of Smart Phone: मोबाईलच्या वापरामुळे होणाऱ्या आरोग्याच्या धोक्यांबाबत मुंबईत एक अभ्यास करण्यात आला आहे. या अभ्यासात सहभागी डॉक्टरांचे म्हणणे आहे की जे लोक दररोज 30 मिनिटांपेक्षा जास्त काळ मोबाईल फोन वापरतात, त्यांना उच्च रक्तदाबाचा धोका जास्त असतो. मोबाइल फोनमधून निघणारी रेडिओ फ्रिक्वेन्सी हे उच्च रक्तदाबाचे सर्वात मोठे कारण असल्याचेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.

Updated May 22, 2023 | 11:16 AM IST

Using Mobile Phones

Using Mobile Phones मोबाईलच्या अतिवापराचे हे आहेत साईड इफेक्ट

Side Effects Of Using Mobile Phone: मोबाईल फोन सध्याच्या काळात अविभाज्य घटक बनला आहे. कारण आजच्या तंत्रज्ञानाच्या काळात तुम्हाला अपडेट राहण्यासाठी मोबाईल गरजेचा आहे. मात्र, विज्ञानाचा हा आविष्कार कुठेतरी शाप देखील बनत चालला आहे. कारण मोबाईलच्या अतिवापरामुळे तुमच्या आरोग्यावर त्याचा वाईट परिणाम होत असल्याचे निदर्शनास आले आहे. मोबाईल फोन तासनतास वापरल्याने तुम्हाला आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. अनेकदा असे अनेक अहवाल समोर येतात ज्यात मोबाईलचा अतिवापर हा एकंदरीत आरोग्यासाठी अत्यंत घातक मानला गेला आहे.
मोबाईलच्या अतिरिक्त वापरामुळे होणाऱ्या आरोग्याच्या धोक्यांबाबत मुंबईत एक अभ्यास वर्ग भरवण्यात आला होता. या अभ्यासात सहभागी डॉक्टरांचे म्हणणे आहे की जे लोक दररोज 30 मिनिटांपेक्षा जास्त काळ मोबाईल फोन वापरतात, त्यांना उच्च रक्तदाबाचा धोका जास्त असतो. मोबाइल फोनमधून निघणारी रेडिओ फ्रिक्वेन्सी हे उच्च रक्तदाबाचे सर्वात मोठे कारण असल्याचेही डॉक्टरांचे म्हणणे आहे.
मुंबईत राहणाऱ्या लोकांमध्ये ही समस्या मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मुंबईच्या धावपळीच्या जीवनात मोबाईल ही लोकांची सर्वात मोठी गरज बनल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. परंतु यामुळे त्यांच्या आरोग्यावर खूप वाईट परिणाम होत आहेत हे लोकांना जाणून घेणे फार महत्वाचे आहे. चला तर मग जाणून घेऊया मोबाईल फोनच्या अतिवापरामुळे कोणत्या प्रकारच्या समस्यांना सामोरे जावे लागते.

डोळ्यांचा त्रास

सातत्याने मोबाईल वापरल्यामुळे डोळ्यांवर ताण येतो. आपले डोळे शरीराच्या सर्वात संवेदनशील भागांपैकी एक आहेत. मोबाईलच्या निळ्या स्क्रीनमुळे तुमच्या डोळ्यांना खूप नुकसान होऊ शकते.

कार्पल टनल सिंड्रमची समस्या

कोणत्याही गोष्टीचा जास्त वापर करणे खास करून इलेक्ट्रॉनिक्सचा वस्तूचा अतिरिक्त वापर हानिकारक ठरू शकतो. फोनच्या अतिवापरामुळे मनगटात सुन्नपणा आणि वेदना होऊ शकतात. कार्पल टनल सारखी समस्या उद्भवते.

अर्धवट झोप

झोप हा आपल्या जीवनशैलीचा सर्वात आवश्यक भाग आहे आणि प्रत्येक व्यक्तीसाठी चांगली झोप आवश्यक आहे. रात्री उशिरापर्यंत मोबाईल वापरल्याने झोपेचे तास कमी होतात. यामुळे तुम्हाला सकाळी ताजेतवाने वाटत नाही आणि दिवसा झोप लागते. मोबाईलच्या अतिवापरामुळेही कधी कधी निद्रानाश होतो.

तणाव वाढतो

मोबाईल फोनच्या वापरामुळे तणाव वाढण्याची शक्यता अधिक असते, इंटरनेटवर काहीतरी वाचल्यामुळे तणाव वाढतो, मनात विविध विचार येऊ लागतात, याचा परिणाम झोपेवर होतो. कधी कधी तासन्तास मोबाईल पाहिल्यामुळे रात्री पुरेशी झोप मिळत नाही. ज्यामुळे पुढे याचे गंभीर परिणाम होतात.
ताज्या बातम्या

मुंबईत एनसीबीची 2 शतकातील सर्वात मोठी कारवाई, LSD ड्रग्जचे 15000 ब्लॉट्स जप्त

  2     LSD  15000

Bal Shivaji : 'मैं अटल हूं' च्या दिग्दर्शकाच्या नव्या सिनेमाची घोषणा, 'बाल शिवाजी' सिनेमात मुख्य भूमिकेत असणार हा कलाकार

Bal Shivaji

संजय राऊत हा बावळट, आमच्या मतांवर निवडून आलेला चोर; गुलाबराव पाटलांची जीभ घसरली

शिवसेना वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार? 2 कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद मिळणार

      2

Sankashti Chaturthi Date and Time : कधी आहे जून महिन्यातील संकष्ट चतुर्थी, काय करावे त्या दिवशी?

Sankashti Chaturthi Date and Time

Hair Oil: आता टक्कल लपवण्याची गरज नाही, हे तेल वापरा आणि केसगळतीपासून सुटका मिळवा

Hair Oil

Mumbai News : बर्थ डे बॉयला मिळाले भयानक गिफ्ट, मित्रांच्या कृत्यांनी मैत्रीला फासला काळीमा

Mumbai News

Hyundai Offers : पावसाळ्याआधी कार खरेदी करा आणि मिळवा मोठा डिस्काउंट

Hyundai Offers
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited