Oral Health : दररोज दात घासल्यानंतर जीभ घासून स्वच्छ करणे किती फायद्याचे

cleaning tongue is important : दात आणि हिरड्यांसोबतच संपूर्ण तोंड आणि जीभ स्वच्छ करणे हिताचे आहे. तुमच्या तोंडाचा एक तृतीयांश भाग हा स्नायूंनी बनलेला असतो. म्हणूनच तुम्ही काही खा किंवा प्या पण नंतर दात स्वच्छ करणे आणि जीभ स्वच्छ करणे आवश्यक आहे. यासाठी दिवसातून दोन वेळा म्हणजे सकाळी आणि रात्री दात घासणे तसेच काही खाल्ल्यानंतर चुळा भरणे आणि तोंडाचे आरोग्य जपणे आवश्यक आहे.

Updated May 26, 2023 | 07:31 PM IST

Toung Cleaning

Toung Cleaning

Why Cleaning Tongue is Important : तोंडाचे आणि पोटाचे आरोग्य जपले तर बहुसंख्य आजार माणसापासून लांब राहतात असे तज्ज्ञ सांगतात. याच कारणामुळे तोंडाचे आरोग्य जपणे आवश्यक आहे. तोंडाला दुर्गंधी येणे हे आजारी असल्याचे पहिले लक्षण आहे.
दातांच्या अस्वच्छतेमुळे अथवा तोंडाला झालेल्या विकारामुळे वा पोटाशी संबंधित समस्येमुळे तोंडाला दुर्गंधी येते. तर काही वेळा उग्र वासाचे पदार्थ खाल्ल्यामुळे तोंडाला दुर्गंधी येते. यावर सोपा उपाय म्हणजे सकाळी आणि रात्री दात घासणे तसेच काही खाल्ल्यानंतर चुळा भरणे आणि तोंडाचे आरोग्य जपणे. हे केले नाही तर तोंडाला येणारी दुर्गंधी कायम राहते. या दुर्गंधीमुळे आपल्याविषयी इतरांचे प्रतिकूल मत होण्याची शक्यता असते. हे टाळण्यासाठी तोंडाला दुर्गंधी येणार नाही याची काळजी घेणे आवश्यक आहे.
तोंडाला दुर्गंधी येऊ नये यासाठी जितके दिवसातून दोन वेळा दात घासणे आवश्यक आहे तेवढेच काही खाल्ल्यानंतर चुळा भरणे, दात आणि जीभ वेळोवेळी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे. अनेकजण दात स्वच्छ करताना जिभेच्या स्वच्छतेविषयी विसरून जातात. पण जिभेची स्वच्छता करणे आवश्यक आहे.
जाणून घ्या जीभ स्वच्छ करण्याचे फायदे
  1. दात आणि जीभ यांच्या स्वच्छतेची काळजी घेतली तर तोंडाला येणारी दुर्गंधी टाळता येते. तोंडाचे आरोग्य जपता येते. यासाठी कोणताही पदार्थ खाल्ल्यानंतर चुळा भरा. जीभ पाण्याने ओली करा आणि एक किंवा दोन बोटांनी घासून स्वच्छ करा. टंग क्लीनर उपकरण वापरून जीभ स्वच्छ करणेही शक्य आहे. पण हे उपकरण वापरणार असाल तर त्याच्या स्वच्छतेचीही काळजी घ्या.
  2. जीभेच्या स्वच्छतेची काळजी घेतली तर नव्याने कोणताही पदार्थ खाल त्यावेळी त्या पदार्थाची चव व्यवस्थित लक्षात येईल. पदार्थ रुचकर असेल तर तो आनंदाने खाल्ला जाईल. व्यवस्थित पचेल. तो पदार्थ खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळेल. पदार्थ खाल्ल्याचा आनंद मिळेल.
  3. जीभेची स्वच्छता जपल्यामुळे तोंड वारंवार कोरडे पडण्याचा प्रकार कमी होण्यास मदत होईल. कोणताही पदार्थ खाल त्यावेळी तोंडात पुरेशी लाळ निर्माण होईल आणि अन्नाचे पचन होण्यास मदत होईल.
  4. जीभ स्वच्छ राखल्यामुळे अन्नाचे पचन व्यवस्थित होईल. खाण्याने शरीराचे पोषण होण्यास मदत होईल.
  5. जीभेची स्वच्छता जपल्यामुळे तोंडाचे आणि पोटाचे आरोग्य जपण्यास मदत होईल. शरीर निरोगी राहण्यास मदत होईल. तोंडात चांगले बॅक्टेरिया राहतील. यामुळे अन्नाचे पचन होण्यास मदत होईल.
ताज्या बातम्या

मुंबईत एनसीबीची 2 शतकातील सर्वात मोठी कारवाई, LSD ड्रग्जचे 15000 ब्लॉट्स जप्त

  2     LSD  15000

Bal Shivaji : 'मैं अटल हूं' च्या दिग्दर्शकाच्या नव्या सिनेमाची घोषणा, 'बाल शिवाजी' सिनेमात मुख्य भूमिकेत असणार हा कलाकार

Bal Shivaji

संजय राऊत हा बावळट, आमच्या मतांवर निवडून आलेला चोर; गुलाबराव पाटलांची जीभ घसरली

शिवसेना वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार? 2 कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद मिळणार

      2

Sankashti Chaturthi Date and Time : कधी आहे जून महिन्यातील संकष्ट चतुर्थी, काय करावे त्या दिवशी?

Sankashti Chaturthi Date and Time

Hair Oil: आता टक्कल लपवण्याची गरज नाही, हे तेल वापरा आणि केसगळतीपासून सुटका मिळवा

Hair Oil

Mumbai News : बर्थ डे बॉयला मिळाले भयानक गिफ्ट, मित्रांच्या कृत्यांनी मैत्रीला फासला काळीमा

Mumbai News

Hyundai Offers : पावसाळ्याआधी कार खरेदी करा आणि मिळवा मोठा डिस्काउंट

Hyundai Offers
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited