Health Tips: पांढरे स्त्राव आणि मूळव्याध दूर करते आंब्याची कोय

Mango Seed Benefits: आंबा खाऊन झाल्यानंतर त्याची कोय आपण फेकून देतो. पण जर या कोयरीचे फायदे जाणून घेतल्यानंतर तुम्ही ती चूक पुन्हा कधीच करणार नाही. तज्ज्ञांनी सांगितल्याप्रमाणे कोयरीचे अनेक फायदे आहेत, जाणून घेऊ-

Updated May 24, 2023 | 01:44 PM IST

Benefits Of Mango Seeds

Benefits Of Mango Seeds

Mango Kernel Powder: उन्हाळ्याच्या हंगामात आंबा खाणे एक मोठी परंपराच झाली आहे. फळांचा राजा आंबा जितका रसाळ आणि चवीला गोड असतो तितके त्याचे औषधी फायदे देखील बरेच आहेत. भारतात आंब्यापासून विविध पदार्थ बनवले जातात. काही लोकांना ते फळ म्हणून खायला आवडते, तर काही त्याचा शेक बनवतात. आंबाप्रेमींना आंब्यापासून बनवलेली प्रत्येक गोष्ट आवडते. आंबा योग्य प्रमाणात खाल्ल्यास हे फळ चांगले फायदे मिळून देते. आंब्याचे गुणधर्म कर्करोग, उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा यापासून तुमचे संरक्षण करू शकतात आणि पचनसंस्था निरोगी ठेवू शकतात. मात्र, आपण आंबा खातो आणि त्याची बी फेकून देतो. पण तुम्हाला माहिती आहे का? की ही बी खूप फायदेशीर आहे. आंब्याचे कोयमध्ये आवश्यक पोषक घटक असतात. आयुर्वेद शास्त्रामध्येआंब्याची कोय औषधी मानली जाते. जाणून घ्या, त्याचे फायदे आणि खाण्याची पद्धत-

अतिसारात फायदेशीर

तज्ज्ञांच्या मते, आंब्याची कोय एखाद्या चमत्कारिक औषधी वनस्पतीपेक्षा कमी नाही. अनेक समस्यांना तोंड देण्यासाठी आंब्याचा वापर केला जाऊ शकतो. जर तुम्हाला अतिसाराचा त्रास होत असेल तर आंब्याची कोय तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. यासाठी एक चमचा आंब्याच्या कोयची पावडर घ्यावी.

पांढरा स्त्राव (White Discharge) महिलांमध्ये पांढरा स्त्राव ही एक सामान्य समस्या आहे. याला सामोरे जाण्यासाठी, आंब्याची कर्नेल पावडर गुणकारी औषध आहे. यासाठी एक चमचा आंब्याच्या कोयची पूड दोन आठवडे खावी. अति रक्तस्त्राव किंवा पांढरा स्त्रावाची समस्या असल्यास 5 ग्रॅम पूड दिवसातून दोन वेळा घ्यावी. प्रथम सकाळी रिकाम्या पोटी आणि दुसरे संध्याकाळी जेवणापूर्वी घ्या.

मूळव्याध समस्येवर फायदेशीर

मूळव्याधीच्या समस्येवर आंब्याच्या कोयरीची पूड उपयोगी आहे. मूळव्याधीसाठी तुम्हाला आयुर्वेदिक उपचारांचा अवलंब करायचा असल्यास दररोज एक चमचा ही पूड पाण्यासोबत घ्या.

मँगो कर्नल पावडर कशी बनवायची?

ही पावडर बनवण्यासाठी आंब्याची कोय उन्हात चांगली वाळवावी. नंतर ही कोय फोडा, आणि त्यातील बी सुद्धा ५ दिवस उन्हात वाळवा. जेव्हा हे बियाणे आकुंचन पावते आणि रंग बदलू लागते तेव्हा त्याची बारीक पूड बनवा.
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited