Natural Cold Drink : आता घरातच तयार करा शक्तीवर्धक आयुर्वेदिक कोल्ड ड्रिंक

Home Made Cold Drink : मान्सूनचे दक्षिण भारत मार्गे संपूर्ण देशात लवकरच आगमन होईल, असे हवामान खात्याचे म्हणणे आहे. पण अद्याप देशाच्या अनेक भागांमध्ये असह्य उकाडा जाणवत आहे. या वातावरणात निसर्गाने उपलब्ध करून दिलेल्या स्रोतांचा सुयोग्य वापर करून आयुर्वेदिक कोल्डड्रिंक अर्थात शीतपेय तयार करून ते पिण्याने आरोग्याला लाभ होऊ शकतो. आयुर्वेदिक कोल्ड ड्रिंक हे शक्तीवर्धक आहे. शिवाय ते शरीराच्या तापमानाचे संतुलन राखू शकते. याच कारणामुळे तज्ज्ञ उकाड्याचा त्रास कमी करण्यासाठी तसेच सामर्थ्य वाढावे म्हणून प्रत्येक महिलेला आणि पुरुषाला आयुर्वेदिक कोल्ड ड्रिंक पिण्याचा सल्ला देतात.

Updated Jun 4, 2023 | 01:18 PM IST

Natural Cold Drink : आता घरातच तयार करा शक्तीवर्धक आयुर्वेदिक कोल्ड ड्रिंक
Rejuvenating ayurvedic cold drink : मान्सूनचे दक्षिण भारत मार्गे देशात लवकरच आगमन होईल, असे हवामान खाते सांगत आहे. पण अजूनही देशाच्या अनेक भागांमध्ये असह्य उकाडा आहे. या वातावरणात नैसर्गिक स्रोतांच्या मदतीने आयुर्वेदिक कोल्ड ड्रिंक तयार करून ते पिण्याने आरोग्याला लाभ होऊ शकतो. आयुर्वेदिक कोल्ड ड्रिंक हे शक्तीवर्धक आहे. शिवाय ते शरीराच्या तापमानाचे संतुलन राखू शकते.उकाड्याचा त्रास कमी होते. महिला आणि पुरुषांचे सामर्थ्य वाढते. याच कारणामुळे तज्ज्ञ महिला आणि पुरुषांनाही आयुर्वेदिक कोल्ड ड्रिंक पिण्याचा सल्ला देतात.
उकाड्यामुळे अथवा इतर कोणत्याही कारणाने शरीरातील पाण्याची पातळी कमी झाल्यास थकवा जाणवू शकतो. यावर उपाय म्हणून आयुर्वेदिक कोल्ड ड्रिंक पिणे हिताचे आहे असे तज्ज्ञ सांगतात. या कोल्ड ड्रिंकमुळे शरीरातील पाण्याचे संतुलन जपण्यास मदत होते. शरीराचे तापमान नियंत्रणात राखण्यासही मदत होते. आयुर्वेदिक कोल्ड ड्रिंक प्यायल्याने शक्ती वाढते. सामर्थ्य वाढल्याची जाणीव होते आणि उत्साह वाढतो.
कसे तयार करावे आयुर्वेदिक कोल्ड ड्रिंक?
आयुर्वेदिक कोल्ड ड्रिंक तयार करण्यासाठी लागणारे साहित्य
 1. 100 ग्रॅम बी नसलेले खजूर
 2. 100 ग्रॅम मनुका किंवा बेदाणे
 3. 100 ग्रॅम सुके अंजीर
 4. 500 मिलि. थंड पाणी
 5. 1 चमचा गुळ किंवा नारळाची साखर
आयुर्वेदिक कोल्ड ड्रिंक तयार करण्याची कृती
 1. मिक्सरमध्ये खजूर, मनुका / बेदाणे, अंजीर, थंड पाणी , गुळ वा नारळाची पूड हे सर्व एकत्र टाकून ब्लेंड करा.
 2. व्यवस्थित ब्लेडिंग झाल्यावर तयार झालेला पातळ पदार्थ ग्लासमध्ये ओतून फ्रीजमध्ये ठेवा.
 3. थंड झाल्यावर आयुर्वेदिक कोल्ड ड्रिंक प्या.शक्यतो दुपारी पिणे हिताचे आहे.
आयुर्वेदिक कोल्ड ड्रिंक पिण्याचे फायदे
 1. शारीरिक सामर्थ्य वाढते.
 2. शरीरातील रक्त शुद्ध होते आणि रक्ताभिसरण सुरळीत सुरू राहते.
 3. हृदयाचे आरोप जर
 4. शरीरातील पाण्याची पातळी जपली जाते. शरीराच्या तापमानाचे संतुलन राखण्यास मदत होते.
 5. आयुर्वेदिक कोल्ड ड्रिंक शक्तीवर्धक, उत्साहवर्धक आहे. ते पिण्याने फायदा होतो. महिला आणि पुरुषांचे सामर्थ्य वाढते.
आयुर्वेदिक कोल्ड ड्रिंक 'यांनी' पिऊ नये
सर्दी, खोकला, मधुमेह, सायनसचा त्रास, अॅलर्जी आणि ताप यापैकी कोणताही त्रास असल्यास आयुर्वेदिक कोल्ड ड्रिंक पिणे टाळावे.
ताज्या बातम्या

Vivo Price Drop: महिन्याभरात दुसऱ्यांदा स्वस्त झाले Vivo चे हे 2 स्मार्टफोन, जाणून घ्या नवीन किंमत

Vivo Price Drop   Vivo  2

Rahu Ketu Gochar 2023: दिवाळीपूर्वी राहू-केतूचे मोठे संक्रमण, या 5 राशी होणार मालमाल

Rahu Ketu Gochar 2023 -  5

IIT Bombay: मुंबई IIT मध्ये शाकाहार-मांसाहारावरून पुन्हा वाद! मांसाहार करणाऱ्या विद्यार्थ्याला 10 हजारांचा दंड

IIT Bombay IIT -   10

Nanded Government Hospital Deaths: नांदेडमध्ये मृत्यूचं थैमान! आणखी 7 जणांचा मृत्यू, 4 बालकांचा समावेश; अशोक चव्हाण यांचं ट्वीट

Nanded Government Hospital Deaths   7  4

Asian Games 2023: यशस्वी जैस्वालने इतिहास रचला! आशियाई क्रीडा स्पर्धेत शतक झळकावणारा पहिला भारतीय

Asian Games 2023

इक्सिगोची 'इक्सिगो अशुअर्ड' सेवा, निवडक आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट बुकिंग्‍जवर मिळणार Complete Refund Facility

     Complete Refund Facility

Lok Sabha Election 2024: काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवणार?

Lok Sabha Election 2024

Nanded News: नांदेडच्या शासकीय रुग्णालयात नेमकं काय घडलं? रुग्णालय प्रशासनानं सांगितलं कारण

Nanded News
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited