Low Sperm Count: लठ्ठपणाकडे दुर्लक्ष करु नका, अन्यथा स्पर्म काऊंट होईल कमी

Low Sperm Count: सध्याच धावपळीच युग तसेच चुकीची जीवनशैली आणि आहारशैलीमुळे आरोग्यासंबंधी अनेक समस्या निर्माण होत आहे. त्यापैकी एक समस्या म्हणजे शुक्राणूंची संख्या कमी होणे. जगभरात पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचे अनेक अहवालांमध्ये समोर आले आहे. यामुळे जोडप्यांना नैसर्गिकरित्या गर्भधारणा कठीण होत त्यांना पालक होण्यास अडचणी येत आहेत. पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होण्यामागे वाढत्या वजनासह काही सवयी आणि आजार देखील कारणीभूत असू शकतात.

Updated Sep 30, 2023 | 08:24 AM IST

Low Sperm Count

Low Sperm Count

फोटो साभार : TNN
Low Sperm Count: सध्याच धावपळीच युग तसेच चुकीची जीवनशैली आणि आहारशैलीमुळे आरोग्यासंबंधी अनेक समस्या निर्माण होत आहे. त्यापैकी एक समस्या म्हणजे शुक्राणूंची संख्या कमी होणे. जगभरात पुरुषांच्या शुक्राणूंची संख्या झपाट्याने कमी होत असल्याचे अनेक अहवालांमध्ये समोर आले आहे. यामुळे जोडप्यांना नैसर्गिकरित्या गर्भधारणा कठीण होत त्यांना पालक होण्यास अडचणी येत आहेत. पुरुषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होण्यामागे वाढत्या वजनासह काही सवयी आणि आजार देखील कारणीभूत असू शकतात. त्यानुसार शुक्राणूंची संख्या कमी होण्यास लठ्ठपणासह कोणकोणत्या गोष्टी कारणीभूत ठरतात जाणून घेऊया.

लठ्ठपणा

लठ्ठपणा देखील शुक्राणूंची संख्या कमी होण्यास कारणीभूत ठरतं. शरीरात चरबी जमा आणि उच्च BMI वाढल्याने टेस्टोस्टेरॉन स्तर कमी होतो. परिणामी शुक्राणूंची निर्मितीवर परिणाम होतो. त्यामुळे ज्यांचे वजन जास्त आहे त्यांनी त्यांचे वजन कमी केले पाहिजे.

मधुमेह

टाइप 2 मधुमेहामुळे शुक्राणूंची संख्या कमी होऊ शकते असे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे मधुमेहाच्या रुग्णांनी रक्तातील साखरेचे प्रमाण नियंत्रित ठेवावे. यामुळे टेस्टोस्टेरॉनची पातळी सुधारू शकते आणि शुक्राणूंची संख्या देखील वाढण्यास मदत होऊ शकते.

धूम्रपान

धुम्रपान हे शुक्राणूंची संख्या कमी करण्यासह संपुर्ण आरोग्यासाठी घातक आहे. धुम्रपान शुक्राणूंची संख्या आणि गतिशीलता प्रभावित करते. जे पुरुष धुम्रपान करतात त्यांची प्रजनन क्षमता कमी होते. इतकेच नाही तर धुम्रपानामुळे वीर्य गुणवत्तेवरही परिणाम होतो. त्यामुळे पुरुषांनी धूम्रपान करणे टाळावे.

मद्यपान

टेस्टोस्टेरॉन हे पुरुषांमधील सर्वात महत्त्वाचे हार्मोन्स आहे. यामुळे पुरुषांमध्ये चांगल्या दर्जाचे शुक्राणू निर्मितीसह हाडे आणि स्नायूंची वाढ, स्नायू शरीर इत्यादी कार्ये होतात. परंतु, अल्कोहोलमुळे यकृतावर वाईट परिणाम होतो, ज्यामुळे एंड्रोजन हार्मोन इस्ट्रोजेनमध्ये बदलतो आणि यामुळे वंध्यत्वाची समस्या वाढते.

प्रदूषण

स्पर्म काऊंट कमी होण्यास प्रदुषण देखील कारणीभूत ठरतं. जेव्हा आपण श्वास घेतो तेव्हा हवेतील कणासोबत अनेक विषारी घटक आपल्या शरीरात प्रवेश करतात, हे घटक पुरुषांच्या शुक्राणूंसाठी हानिकारक ठरतात.
(टीप- या लेखात दिलेली माहिती ही उपलब्ध स्त्रोतांवर आधारित आहे. Times Now Marathi या माहितीचे समर्थन करत नाही. प्रत्येकाची शारीरिक स्थिती वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करून पाहण्याआधी संबंधित आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
ताज्या बातम्या

Nashik City Link Bus : सिटी लिंक बस सेवा फसवी, शंभर टक्के सेवा देण्याचा दावा फोल

Nashik City Link Bus

Maharashtra Politics: एकनाथ खडसेंच्या कार्यकाळात 6.60 कोटींचे नुकसान - मंगेश चव्हाण

Maharashtra Politics    660   -

Mahaparinirvan Din 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी मराठी संदेश, Whatsapp Messages द्वारे महापुरुषाला करा विनम्र अभिवादन

Mahaparinirvan Din 2023         Whatsapp Messages

सनरुफ, क्लासिक लुकसह Yakuza Karishmaची इलेक्ट्रिक कार लॉन्च, किंमत 1.70 लाख रुपये!

   Yakuza Karishma     170

Nagpur Crime : नाश्ता मिळाला नाही, रागाच्या भरात सोडलं घर; रेल्वे स्थानकाजवळ झाडाला...

Nagpur Crime

Lion Attack: बोट दाखवणाऱ्याला सिंहाने शिकवला धडा, Video पाहून तुम्हालाही वाटेल भीती

Lion Attack      Video

Pune Crime : विद्येच्या माहेरघरात धक्कादायक प्रकार, पैशांचा पाऊस पाडण्यासाठी घातला लाखोंचा गंडा

Pune Crime

Airoli-Katai Naka Freeway: डोंबिवली-नवी मुंबई प्रवास होणार सुसाट; ऐरोली-काटई बोगद्यामुळे 45 मिनिटांचा प्रवास 10 मिनिटांत पूर्ण होणार

Airoli-Katai Naka Freeway -     -  45   10
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited