ट्रेंडिंग:

Squats Vs Lungs: पायांचे स्नायू बळकट करण्यासाठी कोणता व्यायाम योग्य?

Weight Loss Exercise: वाढलेले वजन कमी करण्यासाठी अनेक उपययोजना केल्या जातात. कठोर पथ्यपाणी ते शारीरिक श्रम देणारे व्यायामांचा यात समावेश असतो. या एकंदरीत प्रक्रियेमध्ये वजन कमी करण्याची पद्धत थोडी कठीण होऊन बसते. अशावेळी, उचित सल्ला आणि योग्य व्यायामाचा प्रकार माहीत असणे गरजेचे आहे. कारण त्यामुळेच वजन कमी करणे अधिक सोपे होऊन जाईल.

Updated Jun 5, 2023 | 04:03 PM IST

What's better for your legs?

What's better for your legs?

Squats Vs Lungs:वजन झटपट कमी करण्यासाठी वा नियंत्रित ठेवण्यासाठी प्रत्येकजण जिममध्ये जाऊन वेगवेगळे वर्कआऊटचे मुव्हज शिकत असतात, आणि त्याचे अनुकरण करत असतात. त्यात स्क्वॅट्स आणि लंग्ज हे दोन सर्वसामान्य वर्कआऊटचे प्रकार आवर्जून असतात, जे पायाचे स्नायू बळकट करण्यासाठी गरजेचे असतात.
स्क्वॅट्स आणि लंग्ज ते विविध कार्यात्मक प्रशिक्षण व्यायाम शैलींचा भाग असून सामान्यतः पुरुष आणि स्त्रिया दोघेही हे प्रकार करू शकतात. स्क्वॅट्स आणि लंग्ज दोन्ही कॅलरी बर्न करण्यासाठी मदत करतात, वजन कमी करण्याच्या व्यायाम प्रकारामध्ये हे दोघेही अनेक फायदे देतात. असे असले तरी या दोघांपैकी कोणता प्रकार पायासाठी अधिक सरस आहे, हे जाणून घेऊयात.

स्क्वॅट्स आणि लंग्जपैकी पायांचे स्नायू बळकट करण्यासाठी कोणता प्रकार अधिक योग्य आहे? What's better for your legs?

फिटनेस क्षेत्रात बॉडी टोन करण्यासाठी स्क्वॅट्स आणि लंग्ज पैकी कोणता व्यायाम प्रकार सर्वाधिक चांगला, असे प्रश्न अनेकदा विचारले जातात. मूळतः शरीराचे वजन कमी करण्यासाठी, आणि बॉडी टोन करण्यासतही स्पॉट ट्रेनिंग किंवा शरीराच्या काही आवयवांच्या व्यायाम प्रकारांवर लक्षकेंद्रित करून चालत नाही, तर संपूर्ण शारीरिक दृष्टीकोन पाहिला जातो, ज्यात लांबी आणि टोनिंग तसेच शारीरिक लवचिकतेचा देखील समावेश असतो, कारण यामुळेच इच्छित वजन कमी होऊ शकते.

स्क्वॅट्सचे फायदे (Benefits of Squats)
स्क्वॅट्स व्यायाम प्रकार तुमच्या क्वाड्रिसेप्स, ग्लूट्स आणि हॅमस्ट्रिंग्सना लक्ष्य करतो, ज्यामुळे तुमच्या खालच्या शरीरात अधिक लवचिकता आणि संतुलन निर्माण होते. ते कोर आणि पायांचे स्नायू देखील मजबूत करतात, जे गुडघ्याची दुखापती टाळण्यास आणि आपल्या गुडघ्यांवरील थोडे वजन कमी करण्यास मदत करतात. स्क्वॅट्स नवीन व्यायाम करणाऱ्यांसाठी अधिक चांगले आहे असे मानले जाते. कारण हा एक संतुलित व्यायाम आहे.

लंग्जचे फायदे (Benefits of Lungs)

लंग्ज मारल्याने स्नायू मजबूत होतात. लंग्ज एका वेळी एका पायाने मारली जाते. ज्यामुळे तूमचे दुबळे स्नायू सक्षम बनतात, जर तुम्ही यात चांगलेच पारंगत असाल, आणि तूमचे शरीरीक संतुलन चांगले असेल तर मध्यवर्ती ते प्रगत व्यायाम पद्धतीमध्ये ते अधिक फायदेशीर ठरू शकते. धावपटू लंग्जना अधिक प्राधान्य देतात, लंग्जमुळे पाय आणि ग्लूट मजबूत होतात. ज्यामुळे तुम्ही जास्त वेळ आणि सर्वाधिक वेगाने धावू शकता.

पायांसाठी कोणता प्रकार अधिक चांगला आहे?

स्क्वॅट्स आपण दैनंदिन काम करताना देखील मारू शकतो. जसे की चालताना, किंवा खुर्चीवर बसून तुम्ही स्क्वॅट्स मारू शकतात. मात्र लंग्ज हा प्रकार त्यापेक्षा अवघड असतो, कारण त्यासाठी संतुलन आवश्यक असते आणि ते योग्यरित्या काम न केल्यास दुखापत होऊ शकते.
वजन कमी करण्यासाठी या दोघांपैकी केवळ एकच व्यायाम प्रकार पुरेसा नसतो. तुमच्या वर्कआउट रूटीनमध्ये दोन्ही व्यायामांचा समावेश करण्याचा सल्ला दिला जातो. स्क्वॅट्समुळे तूमचे लक्ष्य स्नायू गट अधिक चांगले काम करतात कारण तुम्ही स्क्वॅट जास्त काळ धरून ठेवता, तर लंग्जला जलद हालचाल आवश्यक असते. या दोघांच्या मिश्रणाचा परिणाम कॅलरी बर्न करतात.

हे लक्षात ठेवा

आपण व्यायाम योग्यरित्या करत असल्याची खात्री करा. स्क्वॅट किंवा लंज करताना योग्य फॉर्म राखणे अत्यावश्यक आहे. कोणताही व्यायामप्रकार करताना, सुरुवातीला हळूहळू सुरू करणे योग्य ठरेल. सुरुवातीला स्‍क्‍वॅटमध्‍ये प्राविण्य मिळवा त्यानंतर तुम्‍ही तुमच्‍या वर्कआउटमध्‍ये लंग्जचा समावेश करा.
ताज्या बातम्या

Vivo Price Drop: महिन्याभरात दुसऱ्यांदा स्वस्त झाले Vivo चे हे 2 स्मार्टफोन, जाणून घ्या नवीन किंमत

Vivo Price Drop     Vivo   2

Rahu Ketu Gochar 2023: दिवाळीपूर्वी राहू-केतूचे मोठे संक्रमण, या 5 राशी होणार मालमाल

Rahu Ketu Gochar 2023  -    5

IIT Bombay: मुंबई IIT मध्ये शाकाहार-मांसाहारावरून पुन्हा वाद! मांसाहार करणाऱ्या विद्यार्थ्याला 10 हजारांचा दंड

IIT Bombay  IIT  -      10

Nanded Government Hospital Deaths: नांदेडमध्ये मृत्यूचं थैमान! आणखी 7 जणांचा मृत्यू, 4 बालकांचा समावेश; अशोक चव्हाण यांचं ट्वीट

Nanded Government Hospital Deaths     7   4

Asian Games 2023: यशस्वी जैस्वालने इतिहास रचला! आशियाई क्रीडा स्पर्धेत शतक झळकावणारा पहिला भारतीय

Asian Games 2023

इक्सिगोची 'इक्सिगो अशुअर्ड' सेवा, निवडक आंतरराष्‍ट्रीय फ्लाइट बुकिंग्‍जवर मिळणार Complete Refund Facility

         Complete Refund Facility

Lok Sabha Election 2024: काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी महाराष्ट्रातून लोकसभा निवडणूक लढवणार?

Lok Sabha Election 2024

Nanded News: नांदेडच्या शासकीय रुग्णालयात नेमकं काय घडलं? रुग्णालय प्रशासनानं सांगितलं कारण

Nanded News
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited