चेहऱ्यावर दिसतात यकृत खराब होण्याची ही 5 लक्षणे, दुर्लक्ष करू नका

Liver Symptoms On Face : यकृत निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे, कारण जर आपण आपले यकृत निरोगी ठेवण्यात यशस्वी झालो नाही तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचा धोका वाढतो. यकृत आपल्या शरीरात अनेक महत्त्वाची कार्ये करते आणि जर एखाद्या समस्येमुळे ते काम करणे थांबवते तर इतर अनेक रोग होण्याचा धोका वाढतो.

Updated Sep 19, 2023 | 08:53 AM IST

These 5 symptoms of liver damage are seen on the face

These 5 symptoms of liver damage are seen on the face

फोटो साभार : Times Now
Liver Symptoms On Face : यकृत निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे, कारण जर आपण आपले यकृत निरोगी ठेवण्यात यशस्वी झालो नाही तर आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचा धोका वाढतो. यकृत आपल्या शरीरात अनेक महत्त्वाची कार्ये करते आणि जर एखाद्या समस्येमुळे ते काम करणे थांबवते तर इतर अनेक रोग होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे यकृताच्या आरोग्याची विशेष काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे आणि यकृताच्या आरोग्याशी संबंधित कोणत्याही प्रकारची लक्षणे तुम्हाला दिसत असतील तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नये. आज आम्ही तुमच्या चेहऱ्यावर दिसणार्‍या काही लक्षणांबद्दल सांगणार आहोत, जे यकृताशी संबंधित काही आजारांचे लक्षण असू शकतात. (these 5 symptoms of liver damage are seen on the face)

चेहऱ्यावर सूज येणे

यकृताशी संबंधित काही आजारांची लक्षणेही चेहऱ्यावर दिसू शकतात. यकृतामध्ये कोणत्याही प्रकारचा आजार झाल्यास त्याची प्रथिने बनवण्याच्या क्षमतेवरही परिणाम होतो, त्यामुळे रक्तप्रवाह आणि द्रव पातळी सामान्य राहात नाही. या सर्व बदलांमुळे कधी कधी चेहरा सुजायला लागतो.

डोळे पिवळे होणे
यकृताशी संबंधित आजार असल्यास ते योग्य प्रकारे कार्य करू शकत नाही आणि त्यामुळे बिलीरुबिनची पातळी वाढू लागते. बिलीरुबिन हा एक पदार्थ आहे ज्यामुळे डोळ्यांमध्ये पिवळसरपणा येतो. त्यामुळे त्वचाही पिवळी पडते आणि या स्थितीला कावीळ म्हणतात.

पापण्यांखाली सूज येणे
यकृताशी संबंधित आजारांमुळे पापण्यांखाली सूज येण्यासारखी लक्षणेही दिसून येतात. या लक्षणाला इंग्रजीत आय बॅग्स असेही म्हणतात, जे सहसा इतर अनेक रोगांचे लक्षण असू शकते. म्हणून, खात्री करण्यासाठी एकदा चाचणी केली पाहिजे.

चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे

यकृत योग्यरित्या कार्य करू शकत नसल्यामुळे देखील चेहऱ्यावर सुरकुत्या पडू शकतात आणि म्हणूनच ही लक्षणे वृद्धत्व मानून दुर्लक्ष करू नये. विशेषतः जर तुम्हाला यकृताशी संबंधित कोणताही आजार असेल किंवा अचानक सुरकुत्या दिसू लागल्या असतील तर तुम्ही डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

काळी वर्तुळे तयार होऊ लागतात

यकृताचे काम शरीरातील विषारी द्रव्ये काढून टाकणे आहे आणि जेव्हा ते त्याचे कार्य योग्यरित्या करू शकत नाही, तेव्हा विषारी पदार्थ शरीरात जमा होऊ लागतात. यामुळे काळी वर्तुळे तयार होऊ लागतात आणि त्यामुळे अचानक ही लक्षणे दिसू लागली तर त्याकडे दुर्लक्ष करू नये.
ताज्या बातम्या

Viral Video: बापरे..! मुलीने चक्क मगरीची शेपूट शिजवून खाल्ली

Viral Video

Daily Horoscope 29 September: 12 राशींसाठी आजचा दिवस कसा? वाचा...

Daily Horoscope 29 September 12

Viral Dance Video: भोजपुरी गाण्यावर महिलेने लावले असे ठुमके, की यूजर्स म्हणाले ' भाभीने वेड लावले'

Viral Dance Video

कोकणात मोठी दुर्घटना; गणपती विसर्जन मिरवणुकीत टेम्पो शिरला, दोघांचा मृत्यू तर 15 जखमी

           15

Gandhi Jayanti 2023: राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या संबंधित सामान्य ज्ञानाचे प्रश्न आणि त्यांची उत्तरे

Gandhi Jayanti 2023

Maharashtra Weather Forecast: पुढील 48 तास जोरदार पावसाचे; अनेक जिल्ह्यांना Yellow Alert, वाचा हवामानाचा अंदाज

Maharashtra Weather Forecast  48      Yellow Alert

Earthquake Alert Feature: भूकंप येण्यापूर्वीच आता मोबाईल करणार अलर्ट, जाणून घ्या नवीन फीचर

Earthquake Alert Feature

Viral Video: भररस्त्यात वृद्ध महिलेने धरला ठेका, व्हिडिओ पाहून होतय कौतूक

Viral Video
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited