पतंजलीला मोठा धक्का, कोरोना औषधाच्या जाहिरातीवर बंदी; पाहा काय म्हणाले आयुष मंत्री!  

Coronil: योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेद कंपनीने कोरोना व्हायरसच्या उपचारासाठी औषध सुरू केले आहे. पण या औषधाच्या जाहिरातीवर आयुष मंत्रालयाने बंदी घातली आहे. 

shripad naik
आयुष मंत्री श्रीपाद नाईक  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने कोरोना विषाणूवर उपचार करण्यासाठी औषध केलंय लाँच
  • आचार्य बालकृष्ण म्हणाले की, आम्ही क्लिनिकल चाचणीचे सर्व निकष 100 टक्के पूर्ण केले आहेत
  • आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी पतंजलीच्या औषधाबाबत दिली प्रतिक्रिया

नवी दिल्ली: Patanjali's corona virus medicine Coronil: योगगुरु बाबा रामदेव यांच्या पतंजली कंपनीने कोरोना व्हायरसच्या रूग्णांच्या उपचारांसाठी लाँच केलेलं आयुर्वेदिक औषध कोरोनिल व श्वासारि (Coronil and Swasari)बाबात आता केंद्रीय आयुष मंत्रालय आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. अशं केंद्रीय आयुष मंत्री श्रीपाद नाईक यांनी सांगितलं. यावेळी श्रीपाद नाईक असंही म्हणाले की, बाबा रामदेव यांनी देशाला एक नवीन औषध दिले आहे. हे चांगले आहे. 

दरम्यान, योगगुरू बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने मंगळवारी कोविड -१९ च्या उपचारासाठी औषध लाँच केलेलं होतं. हे औषध  शंभर टक्के प्रभावी असल्याचा दावा देखील पतंजलीने केला होता. यात असाही दावा केला गेला आहे की, या औषधामुळे कोरोना विषाणूचा संसर्ग सात दिवसात बरा होऊ शकतो.

नाईक म्हणाले की, ;बाबा रामदेव यांनी देशाला एक नवीन औषध दिले हे चांगले आहे, परंतु नियमानुसार औषधाच्या मान्यतेसाठी त्यांना प्रथम आयुष मंत्रालयात यावे लागेल. आम्ही या औषधाबाबत लक्ष देऊ आणि अहवाल पाहिल्यानंतर त्याला परवानगी देण्यात येईल.'

आयुष मंत्रालयाने मंगळवारी सांगितले की, त्यांनी पतंजली आयुर्वेद लिमिटेडने विकसित केलेल्या कोव्हिड-१९ या आजारावरील आयुर्वेदिक औषधाविषयी वृत्ताची दखल मीडियाच्या माध्यमातून घेतली. दरम्यान, याबाबत सर्व चौकशी आणि तपासणी होईपर्यंत कंपनीला या औषधाची जाहिरात थांबविण्याचे आदेश दिले आहेत. या औषधामध्ये वापरण्यात  आलेल्या विविध औषधी वनस्पतींचे प्रमाण आणि इतर तपशील लवकरात लवकर आयुष मंत्रालयाला देण्यास सांगितले आहे.

पतंजलीचे व्यवस्थापकीय संचालक आचार्य बालकृष्ण म्हणाले की, 'आम्ही क्लिनिकल चाचणीचे सर्व निकष शंभर टक्के पूर्ण केले आहेत आणि कंपनीने औषधांच्या रचनांचा सविस्तर तपशील आयुष मंत्रालयाला पाठविला आहे. कंपनीने मंत्रालयाला पाठवलेल्या ११ पानांच्या पत्रामध्ये औषध आणि चाचणी मंजुरीबाबत संपूर्ण तपशील उपलब्ध करुन देण्यात आला आहे.'

बाबा रामदेव म्हणाले की, ;या औषधाच्या संशोधनात पतंजली आणि जयपूरच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या डॉक्टरांनी संयुक्तपणे चाचण्या व क्लिनिकल चाचण्या घेतल्या. पंतजलीने सर्वप्रथम निदानाचा अभ्यास केला आणि औषधाच्या शोधासाठी दिलेल्या सर्व नियमांचे पालन करून क्लिनिकल कंट्रोल चाचणी केली.' 
 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी