VIDEO : कोरोना टाळण्यासाठी हात धुण्याची योग्य पद्धत 

कोरोना हा हवेतून पसरणारा व्हायरस नाही आहे. तो जमीनीवर पडणारा किंवा एका व्यक्तीच्या शरीरावरून दुसऱ्या व्यक्तीच्या शरिरावर वाहून जाणारा व्हायरस आहे. कोरोना होऊ नये म्हणून हात साधारणतः एक मिनिट धुतले पाहिजे

coronavirus hand washing really the best thing we can do to stop the spread of covid
VIDEO : कोरोना टाळण्यासाठी हात धुण्याची योग्य पद्धत  
थोडं पण कामाचं
 • पुढील प्रत्येक स्टेप करताना टाइमर लावा किंवा एक ते १० असे मनात अंक मोजा. 
 • - सुरूवातीला हात पाण्याने ओले करा. त्यामुळे हाताच्या सर्व भागाला साबण समान पद्धतीने लागू शकेल. 
 • - पुन्हा तुम्हांला नळाला हात लावावा लागू नये. म्हणून पाण्याची धार संथपणे सुरू ठेवा.

मुंबई :  कोरोना हा हवेतून पसरणारा व्हायरस नाही आहे. तो जमीनीवर पडणारा किंवा एका व्यक्तीच्या शरीरावरून दुसऱ्या व्यक्तीच्या शरिरावर वाहून जाणारा व्हायरस आहे. त्यामुळे या व्हायरसचा प्रसार होऊन नये म्हणून  साधारण १ मिनिट हात धुतले पाहिजे.  ते कसे धुतले पाहिजे याचा एका व्हिडिओ टाइम्स नाऊ मराठीने तयार केला आहे. तो नक्की पाहा. आणि तुमच्या नातेवाईकांना ही लिंक पाठवा.

 1. - पुढील प्रत्येक स्टेप करताना टाइमर लावा किंवा एक ते १० असे मनात अंक मोजा. 
 2. - सुरूवातीला हात पाण्याने ओले करा. त्यामुळे हाताच्या सर्व भागाला साबण समान पद्धतीने लागू शकेल. 
 3. - पुन्हा तुम्हांला नळाला हात लावावा लागू नये. म्हणून पाण्याची धार संथपणे सुरू ठेवा.
 4. - त्यानंतर साबण घ्या आणि हातांचे तळवे साबणाने चांगल्या पद्धतीने रब करा, त्यामुळे साबणाचा भरपूर फेस तयार होईल. 
 5. त्यानंतर उजव्या हाताने डाव्या हाताच्या मागील बाजू चांगली रब करा.  असे करताना दोन बोटांच्यामध्ये चांगल्या प्रकारे रब करा. 
 6. असे डाव्या हाताने उजव्या हाताला रब करा. त्यानंतर दोन्ही तळवे समोरासमोर करून पुन्हा बोटांमध्ये रब करा. 
 7. - दोन्ही हातांनी मूठ वळवल्यासारखे करून बोटांना पुन्हा रब करा.  असे दोन्ही हातांना रब करा. 
 8. - त्यानंतर डाव्या हाताचा अंगठा उजव्या हाताच्या मुठीत घेऊन रब करा. नंतर उजव्या हाताचा अंगठा अशा पद्धतीने रब करा. 
 9. -बोटांचा पुढील भाग स्वच्छ करण्यासाठी दुसऱ्या हाताच्या तळव्यावर वर्तुळाकार गोल फिरवा. असे दोन्ही हातांच्या बोटांना करा. 
 10. त्यानंतर वाहत्या पाहण्यात स्वच्छ हात धुवा. 
 11. - त्यानंतर एकदाच वापरण्यात येणाऱ्या टीशू पेपरने हात कोरडे करा.  त्यानंतर त्याच टीशूने नळं बंद करा. त्याला पुन्हा हात लावू नका. 

आता तुमचे हात स्वच्छ आणि सुरक्षित झाले...

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी