Five effective remedies for cold cough : साधारणपणे ऑक्टोबर महिन्यात थंडी सुरू होते. नोव्हेंबर आणि डिसेंबर महिन्यात थंडीची तीव्रता वाढते. उत्तरेकडच्या भागांमध्ये बर्फ पडते आणि थंडीची तीव्रता वाढते. थंडी वाढू लागते. वातावरण बदलते. या बदलाचा शरीरावर परिणाम होतो. सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी अशा स्वरुपाचे त्रास होऊ लागतात. भारतात कोरोना नियंत्रणात आला असला तरी सर्दी खोकल्याचा त्रास सुरू झाल्यावर काळजी घेणे आवश्यक आहे.
थंडीत आवश्यक ती खबरदारी घेतली तर सर्दी खोकल्याचा त्रास टाळणे शक्य आहे. जर सर्दी खोकला झाला नसेल तर खबरदारी घेऊन त्रास टाळू शकता. सर्दी खोकला झाला असेल तर खबरदारी घेऊन लवकर बरे होऊ शकता. यामुळे पाच प्रभावी उपाय करून तब्येतीची काळजी घ्या. यामुळे सर्दी खोकल्यावर मात करणे शक्य होईल. तसेच रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ होईल. तब्येत उत्तम स्थितीत असल्यास कामाचा उत्साह वाढेल.
रोगप्रतिकारक क्षमता वाढविण्यासाठी थंडीच्या दिवसांत ताजी फळे, ताज्या भाज्या खा. मटार, हिरव्या भाज्या खाण्यावर भर द्या. संत्री-मोसंबी, आवळा, मुळा खाणे फायद्याचे ठरेल. संत्री-मोसंबी सारख्या लिंबू गटातील फळांमुळे शरीराल क जीवनसत्व अर्थात व्हिटॅमिन सी मिळाल्यास रोगप्रतिकारक क्षमतेत वाढ होईल.
झोपेच्या कमतरतेमुळे पुरूषांमध्ये येते नपुंसकत्व
तीन आजारांमध्ये तुपाचे सेवन असते विषासमान
वातावरण बदललं की अनेकांना सर्दी खोकल्याचा त्रास होतो. साधा वाटणारा हा त्रास आपल्या रोजच्या कामावर परिणाम करतो. अस्वस्थ वाटत राहतं. पण थोडी काळजी घेतली तर सर्दी खोकला बरा होऊ शकतो.
शरीरात सी व्हिटॅमिन अर्थात क जीवनसत्वाची कमतरता असेल तर सर्दी खोकल्याचा त्रास हमखास होतो. घसा खवखवणं, श्वास घेण्यास त्रास होणं, खोकला ही या त्रासाची प्रमुख लक्षणे आहेत. यावर पाच अतिशय प्रभावी उपाय आहेत.
1 उन, धूळ, गर्दीपासून लांब राहा
2 साखरेपासून आणि मैद्यापासून तयार केलेले पदार्थ टाळा
3 तळलेले पदार्थ टाळा
4 कोमट पाणी प्या, हळदीचे दूध प्या
5 शरीर स्वच्छतेवर भर द्या, हात धुवा