Vitamin Deficiency: या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे येतात हातापायाला मुंग्या

Vitamin B 12 Deficiency: शरीरात बी 12 ची कमी झाल्यास अनेक प्रकारच्या समस्या उद्भवतात. म्हणूनच तुमच्या आहारात व्हिटॅमिन बी12 ची कमतरता भरून काढणाऱ्य पदार्थांचा समावेश करा. बी 12 या व्हिटॅमिनच्या कमतरतेची लक्षणे काय आहेत, हे आम्ही तुम्हाला या लेखात सांगणार आहोत, तर जाणून घेऊया.

Updated May 23, 2023 | 08:21 PM IST

b 12 Vitamin Deficiency Symptoms

हातापायला मुंग्या येत आहेत तर या जीवनसत्वाची कमतरता झाली आहे.

Vitamin B 12 Deficiency Symptoms: व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेमुळे, अनेक समस्या उद्भवतात. ज्यात मानसिक, बौद्धिक आणि शारीरिक अशा अनेक पैलुवर त्याचा प्रभाव पडत असतो. बी 12 युक्त पदार्थांचा आहारात समावेश करणे खूप गरजेचे आहे, कारण बी 12 शरीर तयार करत नाही, ते आहारामार्फत शरीराला मिळत असते.

व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेची लक्षणे

 • जर तुम्हाला नेहमी पाठदुखीचा त्रास होत असेल, आणि सतत थकल्यासारखे जाणवत असेल तर त्याकडे दुर्लक्ष करू नका, कारण ते व्हिटॅमिन बी 12 च्या कमतरतेचे लक्षण आहे.
 • व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे हातापायला मुंग्या, नैराश्य, चिडचिड यासारख्या समस्यांना सामोरे जावे लागते.
 • त्वचेवर पिवळेपणा दिसू लागतो.
 • अतिसार, बद्धकोष्ठता (आम्लता), गॅस, मळमळ यासारख्या समस्यांनाही सामोरे जावे लागते.
 • व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे शरीरात लाल रक्तपेशींची निर्मिती कमी होऊ लागते. यामुळे थकवा जाणवू लागतो.
व्हिटॅमिन बी 12 ची कमतरता भरून काढण्यासाठी अंडी, मांस, मासे, तसेच फोर्टिफाइड तृणधान्ये खाण्याचा सल्ला डॉक्टर देतात.

व्हिटॅमिन बी 12 साठी काय खावे

 • लाल मांस, मासे, पोल्ट्री, अंडी, दूध आणि इतर दुग्धजन्य पदार्थांमध्ये व्हिटॅमिन बी 12 भरपूर प्रमाणात असतात. त्याचे सेवन सुरू करा.
 • सकाळच्या नाश्त्यामध्ये फोर्टिफाइड खाद्यपदार्थांचा समावेश करा. जसे की, सिरियल फुड्स, यीस्ट, वनस्पतींचे दूध आणि ब्रेड ई..
 • मशरूम व्हिटॅमिन बी 12 चा चांगला स्रोत मानला जातो. जर तुम्ही 50 ग्रॅम मशरूम नियमितपणे खाल्ले तर बी 12 ची कमी सहजपणे भरून निघेल. 4 ते 8 वर्षे वयोगटातील लोक - 1.2 एमसीजी., 9 ते 13 वर्षे - 1.8 mcg, 14 ते 18 वर्षे - 2.4 mcg (प्रौढांनी व्हिटॅमिन B12 समान प्रमाणात वापरावे), गर्भवती महिला - 2.6 mcg तसेच स्तनपान करणाऱ्या महिला - 2.8 mcg व्हिटॅमिन B12 चा पूरक आहार घ्यावा.
ताज्या बातम्या

मुंबईत एनसीबीची 2 शतकातील सर्वात मोठी कारवाई, LSD ड्रग्जचे 15000 ब्लॉट्स जप्त

 2   LSD 15000

Bal Shivaji : 'मैं अटल हूं' च्या दिग्दर्शकाच्या नव्या सिनेमाची घोषणा, 'बाल शिवाजी' सिनेमात मुख्य भूमिकेत असणार हा कलाकार

Bal Shivaji

संजय राऊत हा बावळट, आमच्या मतांवर निवडून आलेला चोर; गुलाबराव पाटलांची जीभ घसरली

शिवसेना वर्धापन दिनाआधी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार? 2 कॅबिनेट आणि राज्यमंत्रिपद मिळणार

   2

Sankashti Chaturthi Date and Time : कधी आहे जून महिन्यातील संकष्ट चतुर्थी, काय करावे त्या दिवशी?

Sankashti Chaturthi Date and Time

Hair Oil: आता टक्कल लपवण्याची गरज नाही, हे तेल वापरा आणि केसगळतीपासून सुटका मिळवा

Hair Oil

Mumbai News : बर्थ डे बॉयला मिळाले भयानक गिफ्ट, मित्रांच्या कृत्यांनी मैत्रीला फासला काळीमा

Mumbai News

Hyundai Offers : पावसाळ्याआधी कार खरेदी करा आणि मिळवा मोठा डिस्काउंट

Hyundai Offers
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited