Weight Loss Tips: चाळीशीमध्ये झटपट वजन कमी करण्याचे काही टिप्स

Weight Loss in 40s: ​वयाच्या 40 व्या वर्षी वजन कमी करायचे असेल तर या 7 जीवनशैलीच्या सवयी अंगिकारायला हवीत. तुम्ही चाळीशी मध्ये ही तरुण आणि फिट दिसाल. जाणून घ्या त्याबद्दल

Updated May 24, 2023 | 05:10 PM IST

Weight Loss Tips in 40s

चाळीशी मध्ये वजन कमी करण्यासाठी फॉलो करा हे TIPS

Weight Loss: वय कितीही असो शरीर निरोगी असणे महत्वाचे आहे. आपल्या दैनंदिन जीवनात आपण स्वतःच्या शरीरकडे लक्ष देत नाही, ज्याचा परिणाम पुढे चाळीशी नंतर दिसून येतो. अनावश्यक अशी पोटाची ढेर बाहेर येते, आणि शरीराचा आकार बिघडलेला दिसू लागतो. शिवाय वजन वाढल्यामुळे इतर समस्या देखील उद्भवतात त्या वेगळ्याच. त्यामुळे अशा काही छोट्या सवयी आहेत ज्या अंगीकारल्यावर तुम्ही चाळीशी मध्ये देखील तुमची तरुण आणि फिट दिसाल.

चाळीशीमध्ये वजन कमी करण्यासाठी करा या गोष्टी:

1. भरपूर पाणी प्या:

वजन कमी करण्यासाठी शरीराला हायड्रेट ठेवणे खूप महत्वाचे आहे. तुम्ही जितके जास्त पाणी प्याल तितके चयापचय वाढेल. पाणी शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यास मदत करते ज्यामुळे शरीराचे अवयव सुरळीतपणे कार्य करू शकतात. दिवसभरात ८ ते ९ ग्लास पाणी पिणे आवश्यक आहे.

2. व्यायामाची सवय लावा

व्यायामाला तुमच्या जीवनशैलीचा अविभाज्य घटक बनवा. वयाच्या 40 व्या वर्षी शरीराला जास्त हालचाल करण्याची गरज नसते असे समजू नका. हलका व्यायाम करत राहणे आवश्यक आहे. याशिवाय स्नायू मजबूत करण्यासाठी आणि कॅलरी बर्न करण्यासाठी कार्डिओ करत राहा.

3. प्रोसेस्ड पदार्थांपासून दूर रहाबाहेरून डबाबंद प्रक्रिया केलेले अन्न खाणे टाळा. या पदार्थांऐवजी ताज्या पदार्थांचा आहारात समावेश करा.

4. पुरेशी झोप घ्या

पुरेशी झोप न मिळणे हे वजन वाढीचे मुख्य कारण बनू शकते. झोपेची कमतरता चयापचय आणि खाण्याची इच्छा देखील प्रभावित करते. म्हणूनच रात्री किमान ७ तासांची झोप घ्या.

5. पोषक आहारतुमच्या आहारात अशा गोष्टींचा अधिकाधिक समावेश करा, ज्या खाल्ल्यानंतर शरीराला आवश्यक पोषक द्रव्ये मिळू शकतात. ज्यामध्ये तुम्ही प्रथिने, हिरव्या भाज्या, धान्य आणि ताजी फळे यांचा समावेश करू शकता.

6. भूक मारू नकाचाळीशीमध्ये व्यक्ती कामात खूप व्यस्त असतो. ज्यामुळे त्याचे जेवणाकडे लक्ष जात नाही. अशावेळी अनेकदा लोक आपली भूक मारतात. नाश्ता तसेच रात्रीचे जेवण न करता झोपी जातात. ही चूक कधीच करू नका.

7. तणावापासून दूर राहा

तणावाचा चयापचयावर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे तणावमुक्त आयुष्य जगण्याचा प्रयत्न करा. त्यासाठी तुम्ही ध्यान, योग आणि श्वासोच्छवासाच्या व्यायामाच्या मदतीने तणाव कमी करू शकता.
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited