Lemon Water: या वेळेत प्या लिंबू पाणी, होईल जबरदस्त फायदा

Lemon Water Benefits: लिंबू पाण्याचे सेवन केल्याने शरीराची रोग प्रतिकारकशक्ती वाढते. यासह लिंबू पाणी प्यायल्यामुळे पचनासंबंधी समस्या देखील दूर होतात. यात प्रमुख्याने अपचन, गॅस, अॅसिडीटी आणि बद्धकोष्ठतेचा समावेश होतो. लठ्ठपणा दूर करण्यासाठी देखील लिंबू पाणी फायदेशीर ठरते. लिंबू पाणी प्यायल्यामुळे बॉडी डिटॉक्स होत आपण अनेक आजारांपासून दूर राहतो. लिंबू पाणी पिण्याची योग्या वेळ कोणती जाणून घेऊया.

Updated Oct 1, 2023 | 08:16 PM IST

lemon water

lemon water

फोटो साभार : TNN
Lemon Water: आयुर्वेदात लिंबू पाण्याचे अनेक प्रकारचे आरोग्यदायी फायदे सांगितले आहे. लिंबू पाणी अँटीऑक्सीडेंटने समृद्ध आहे. लिंबू पाण्याचे सेवन केल्याने शरीराची रोग प्रतिकारकशक्ती वाढते. यासह लिंबू पाणी प्यायल्यामुळे पचनासंबंधी समस्या देखील दूर होतात. यात प्रमुख्याने अपचन, गॅस, अॅसिडीटी आणि बद्धकोष्ठतेचा समावेश होतो. लठ्ठपणा दूर करण्यासाठी देखील लिंबू पाणी फायदेशीर ठरते. लिंबू पाणी प्यायल्यामुळे बॉडी डिटॉक्स होत आपण अनेक आजारांपासून दूर राहतो. कोरोना काळात तर लिंबू पाणी पिणाऱ्यांची संख्या आणखी वाढला. चहा-कॉफीने दिवसाची सुरुवात करणारे बहूतांश लोक सकाळी लिंबूपाणी पिऊ लागले. तुम्हीही लिंबू पाणी पिण्यास सुरुवात करणार असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फायद्याची ठरु शकते. या लेखात आपण लिंबू पाणी पिण्याची योग्या वेळ कोणती आणि आरोग्याला त्याचा काय लाभ होतो जाणून घेऊया.

लिंबू पाण्याचे सेवन करण्याची योग्य वेळ

आरोग्यावर्धक लिंबू पाण्याचे कोणत्याही वेळी सेवन केले तरी हरकत नाही. मात्र सकाळी रिकाम्या पोटी लिंबू पाणी प्यायल्याने आरोग्याला अधिक लाभ होतो. लिंबू पाण्यामुळे मेटाबॉलिज्म बूस्ट होत वजन कमी होण्यास मदत होते. या पेयाने दिवसाची सुरूवात करणे अतिशय चांगले असते.

पचनशक्ती वाढते

लिंबाच्या रसामध्ये भरपूर प्रमाणात जीवनसत्त्वे आणि खनिजे आढळतात. हे घटक पचनक्रिया व्यवस्थित ठेवतात. रिकाम्या पोटी कोमट पाण्यात लिंबाचा रस मिसळून पिल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. यामुळे अपचनाची समस्या दूर होते.

अॅनिमियाच्या समस्येवर गुणकारी

लिंबू पाण्यात अँटिऑक्सिडंट्स, पोटॅशियम, फोलेट, व्हिटॅमिन बी सारखे पोषक घटक आढळतात. यामध्ये असलेले व्हिटॅमिन सी अन्नातून लोह शोषण्यास मदत करते. त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिनची पातळी सुधारते.

त्वचेला होतो लाभ

लिंबाच्या पाण्यात अँटिऑक्सिडंट गुणधर्म आढळतात. यामुळे शरीर डिटॉक्स होत याचा लाभ त्वचेला होत त्वचेचा पोत सुधारतो.

रक्तदाब नियंत्रित करा

लिंबू पाण्याच्या सेवनाने रक्तदाबाची समस्या कमी होते. लिंबू पाण्यात कॅल्शियम आणि पोटॅशियम दोन्ही मुबलक प्रमाणात आढळतात. जे उच्च रक्तदाबाच्या समस्येल लाभदायक ठरतात.

..तर होतो आरोग्यावर दुष्परिणाम

लिंबू पाणी शरीरासाठी लाभदायक असले तरी त्याचे अतिसेवन घातक ठरु शकते. लिंबू पाणी जास्त प्रमाणात प्यायल्याने दातांचे नुकसान होते. लिंबू किंवा लिंबूवर्णीय फळांमध्ये सायट्रिक अॅसिडचे प्रमाण जास्त असते, जे दातांसाठी घातक असते. तसेच लिंबू पाणी कोमट असावे. यासह लिंबूचा रस थेट न पिता तो पाण्यात मिसळूनच प्यावा.
(टीप- या लेखात दिलेली माहिती ही उपलब्ध स्त्रोतांवर आधारित आहे. Times Now Marathi या माहितीचे समर्थन करत नाही. प्रत्येकाची शारीरिक स्थिती वेगवेगळी असते. त्यामुळे कोणताही उपाय करून पाहण्याआधी संबंधित आरोग्य तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)
ताज्या बातम्या

Maharashtra Politics: एकनाथ खडसेंच्या कार्यकाळात 6.60 कोटींचे नुकसान - मंगेश चव्हाण

Maharashtra Politics    660   -

Mahaparinirvan Din 2023 : डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनी मराठी संदेश, Whatsapp Messages द्वारे महापुरुषाला करा विनम्र अभिवादन

Mahaparinirvan Din 2023         Whatsapp Messages

सनरुफ, क्लासिक लुकसह Yakuza Karishmaची इलेक्ट्रिक कार लॉन्च, किंमत 1.70 लाख रुपये!

   Yakuza Karishma     170

Nagpur Crime : नाश्ता मिळाला नाही, रागाच्या भरात सोडलं घर; रेल्वे स्थानकाजवळ झाडाला...

Nagpur Crime

Lion Attack: बोट दाखवणाऱ्याला सिंहाने शिकवला धडा, Video पाहून तुम्हालाही वाटेल भीती

Lion Attack      Video

Pune Crime : विद्येच्या माहेरघरात धक्कादायक प्रकार, पैशांचा पाऊस पाडण्यासाठी घातला लाखोंचा गंडा

Pune Crime

Airoli-Katai Naka Freeway: डोंबिवली-नवी मुंबई प्रवास होणार सुसाट; ऐरोली-काटई बोगद्यामुळे 45 मिनिटांचा प्रवास 10 मिनिटांत पूर्ण होणार

Airoli-Katai Naka Freeway -     -  45   10

Kashmir Tourism: हिवाळ्यात काश्मीरला फिरायला जाताय? या चुका अजिबात करू नका

Kashmir Tourism
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited