4 White Hair Solution: या जीवनसत्वाच्या कामतरतेमुळे होतात केस पांढरे, करा हे घरगुती उपाय

White Hair: बदलती जीवनपद्धती आणि खाण्यापिण्याच्या वाईट सवयीमुळे लहान वायमध्येच केसं सफेद होण्याच्या समस्या वाढत चालल्या आहेत. आपल्या शरीरातील एका खास जीवन सत्वाच्या कमतरतेमुळे अकाली केस पांढरे होतात. काही घरगुती उपायांद्वारे तुम्ही तुमच्या केसांचा नैसर्गिक रंग परत आणू शकता. जाणून घेऊ त्याबद्दल-

Updated May 22, 2023 | 10:45 AM IST

White Hair Problem, Home Remedies for White Hair

4 White hair home made solution: बदलती जीवनपद्धती आणि खाण्यापिण्याच्या वाईट सवयीमुळे लहान वायमध्येच केसं सफेद होण्याच्या समस्या वाढत चालल्या आहेत. आपल्या शरीरातील एका खास जीवन सत्वाच्या कमतरतेमुळे अकाली केस पांढरे होतात. काही घरगुती उपायांद्वारे तुम्ही तुमच्या केसांचा नैसर्गिक रंग परत आणू शकता. जाणून घेऊ त्याबद्दल-

फोटो साभार : iStock
4 Tips for White Hair: केस पांढरे होणे हे केवळ बाह्य घटकांवर अवलंबून नसते, तर शरीरातील कोणत्याही पोषक घटकांच्या कमतरतेमुळेही केस अकाली पांढरे होऊ शकतात. व्हिटॅमिन बी12 हे असेच एक जीवनसत्व आहे ज्याच्या कमतरतेमुळे केस अकाली पांढरे होतात. केसांचे कूप निरोगी ठेवण्यासाठी व्हिटॅमिन बी 12 आवश्यक आहे. केसांच्या मुळांमध्ये हेअर फॉलिकल्स असतात जे त्यांना मजबूत ठेवतात आणि केस काळे करतात. शरीरात व्हिटॅमिन बी12 च्या कमतरतेमुळे केस पांढरे होण्याचे प्रमाण झपाट्याने वाढते. अशा परिस्थितीत या जीवनसत्त्वाचा आहारात समावेश केल्यास केस काही प्रमाणात काळे होऊ शकतात.
याशिवाय असे काही घरगुती उपाय तुमच्यासाठी आहेत जे पांढर्‍या केसांची समस्या दूर करण्यास मदत करतील आणि तुमचे केस नैसर्गिकरित्या काळे होतील.

पांढऱ्या केसांसाठी घरगुती उपाय (Home Remedies for White Hair) पांढरे केस पुन्हा एकदा काळे करण्यासाठी घरातील काही गोष्टी उपयोगी पडू शकतात. घरगुती नैसर्गिक उपचाराने केसांच्या एक नाही तर अनेक समस्या दूर होण्यास मदत होते.

कढीपत्ता

केस काळे करण्यासाठी कढीपत्ता अनेक प्रकारे वापरता येतो. कढीपत्त्याचा हेअर मास्क बनवण्यासाठी 2 चमचे आवळा पावडरमध्ये 2 चमचे ब्राह्मी पावडर मिसळा आणि त्यात मूठभर कढीपत्ता चांगला बारीक करून टाका. या मिश्रणात आवश्यकतेनुसार पाणी घालून त्याची पेस्ट तयार करा. हा हेअर मास्क केसांवर अर्धा तास ठेवल्यानंतर तो चांगला धुवून टाका, दर आठवड्यातून एकदा याचा वापर केल्यानंतर पांढर्‍या केसांवर त्याचा परिणाम दिसू लागतो.

खोबरेल तेल आणि लिंबू रस

एक वाटी खोबरेल तेल गरम करून त्यात २ ते ३ चमचे लिंबाचा रस घाला. हे मिश्रण हलके कोमट करून केसांच्या मुळापासून टोकापर्यंत लावा आणि अर्धा तास ठेवल्यानंतर धुवा. हे तेल काही दिवसांच्या अंतराने लावल्याने केस नैसर्गिकरित्या काळे होऊ लागतात.

काळा चहा

काळ्या चहाचा पांढऱ्या केसांवर आश्चर्यकारक प्रभाव दिसून येतो. केस काळे करण्याचा हा खूप जुना आणि प्रभावी उपाय आहे. हा चहा वापरण्यासाठी एका भांड्यात काळा चहा चांगला रंग येईपर्यंत ठेवा. हे पाणी केसांना लावा आणि किमान 2 तासांनी डोके धुवा. त्यात लिंबाचा रस मिसळून केसांवर 40 ते 50 मिनिटे ठेवता येते.
बातमी समाप्त

© 2023 Bennett, Coleman & Company Limited