राशी भविष्य 20 जून: 'या' राशीच्या व्यक्तींना होईल धनलाभ

राशी भविष्य: मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

20 June Rashifal in Marathi aajche rashi bhavishya
राशी भविष्य 20 जून: 'या' राशीच्या व्यक्तींना होईल धनलाभ  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

 • मेष राशीच्या व्यक्तींच्या बऱ्याच योजना आपल्या  मनावर परिणाम करतील. लव्ह लाइफमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे.
 • कर्क राशीच्या व्यक्तींना पैसे मिळण्याची शक्यता आहे
 • कन्या राशीच्या व्यक्तींचे बेरोजगारी दूर करण्याचे प्रयत्न यशस्वी होतील.

राशी भविष्य 20 June 2020: हा दिवस कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी कसा असेल आणि कुठल्या राशीच्या व्यक्तिंसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? 

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: बऱ्याच योजना आपल्या  मनावर परिणाम करतील. लव्ह लाइफमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचा स्रोत देखील वाढण्याची शक्यता आहे. व्यापारात नफा होईल. आजचा शुभ रंग - लाल.
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: कोणत्याही नव्या कार्यचा शुभारंभ होण्याची शक्यता आहे. अविवाहीत लोकांना विवाहाचे मार्गात येणाऱ्या समस्या समाप्त होतील. आजचा शुभ रंग - लाल
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: कौटुंबिक जबाबदारी पार पाडण्यात आज व्यस्त राहाल. राजकारणात नवी संधी मिळण्याची दाट शक्यता आहे. आरोग्याची काळजी घ्या. आजचा शुभ रंग - निळा.
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: पैसे मिळण्याची शक्यता आहे. यश मिळण्यासाठी मेहनत आणि प्रयत्न करा. सामाजिक कार्यात भाग घ्याल. मान-सन्मान मिळेल. इन्कमचे स्त्रोत वाढतील. भाग्याची साथ मिळेल. सगळीकडून सहकार्य मिळेल. थकवा जाणवेल. आजचा शुभ रंग - पिवळा.
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: अनावश्यक खर्च टाळा. आर्थिक समीकरणे बिघडू शकतात. कर्ज घ्यावे लागू शकते. दुसऱ्यांकडून अपेक्षा करू नका. कामे विलंबाने होतील. चिंता तसेच तणावाचे वातावरण राहील. देण्या-घेण्याच्या व्यवहारात सावधानता बाळगा. आजचा शुभ रंग - पांढरा. 
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: बेरोजगारी दूर करण्याचे प्रयत्न सफल होतील. आर्थिक स्थिती योग्य राहील. भेटवस्तू मिळण्याची शक्यता आहे. आरोग्य चांगले राहील. चिंतेचे तसेच तणावाचे वातावरण नसेल. प्रसन्नता कायम राहील. आजचा शुभ रंग - हिरवा.
 7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: आनंदाची वार्ता मिळेल. जुन्या मित्रांच्या भेटीगाठी होतील. आत्मसन्मान वाढेल. शत्रू सक्रिय राहतील. व्यापार-व्यवसायात अनुकूल लाभ होतील. नोकरीमध्ये सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. उत्साह तसेच प्रसन्नतेने काम करू शकाल. वादविवाद नको. आजचा शुभ रंग - केशरी.
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today:  आधीच्या मेहनतीचे फळ आता मिळेल. धनप्राप्ती होण्याचे संकेत आहेत. कामाच्या ठिकाणी प्रसन्नता तसेच उत्साह असेल. मित्र तसेच नातेवाईकांकडून सहकार्य मिळेल. घरात तसेच बाहेर कामाचे कौतुक होईल. पैसा खेळता राहील. आजचा शुभ रंग - लाल.
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. वादविवादात सहभागी होऊ नका. आरोग्याचा पाया कमजोर असू शकतो. उतावळेपणा नको. देण्या-घेण्याच्या व्यवहारात सतर्कता ठेवा. दाम्पत्य जीवनात आनंदीआनंद राहील. आजचा शुभ रंग - पिवळा. 
 10. मकर / Capricorn Horoscope Today: कोणालाही पैसे देण्यापूर्वी विचार करा. धनलाभ होण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस चांगला आहे. रखडलेले काम मार्गी लागेल. प्रेमपूर्ण वैवाहिक जीवन आपल्याला आनंदी ठेवेल. आरोग्य चांगले असेल. व्यापारात मोठा नफा होण्याची शक्यता आहे. आजचा शुभ रंग - पांढरा.
 11. कुंभ / Aquarius Horoscope Today: नोकरीत प्रगती किंवा बदलच्या दिशेनं पुढे जाल. राजकारणात मिळालेल्या लाभामुळे आनंदी असाल. आज पैसाचं आगमन निश्चित आहे. जीवन साथीदाराच्या सहकार्याने आपल्याला नवीन ऊर्जा मिळेल. आजचा शुभ रंग - निळा.
 12. मीन / Pisces Horoscope Today: आज प्रलंबित कार्य पूर्ण झाल्यानं आनंद होईल. प्रवासाचा आज योग आहे. वादविवादापासून बचाव करण्याचा प्रयत्न करा. नोकरीत यश आणि प्रगतीची शक्यता आहे. लव्ह लाईफमध्ये तणाव असेल. वैवाहिक सुख मिळेल. आरोग्याच्या समस्या जाणवतील. आजचा शुभ रंग - लाल. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी