राशी भविष्य २२ जुलै: श्रावण महिन्यातील हा दिवस कसा असेल?

राशी भविष्य, २२ जुलै २०२० : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

Horoscope
राशी भविष्य  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

 • जाणून घ्या कसं असेल आपलं भविष्य 
 • नव्या दिवसाची सुरुवात करण्याआधी पाहा भविष्य
 • श्रावण महिन्यातील दिवसाचं भविष्य कसं असणार? 

राशी भविष्य  22 July 2020: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. दीर्घ आजारातून मुक्ती मिळेल. कर्जाची रक्कम फेडू शकाल. प्रेम संबंधांत जोडीदार तुमच्यावर नाराज होण्याची शक्यता आहे. आरोग्य उत्तम राहील. शुभ रंग लाल आहे.
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: व्यावसायिकांसाठी दिवस प्रगतीशील असेल. मीडिया आणि आयटीशी संबंधित लोक त्यांच्या कामावर समाधानी असतील. वैवाहिक जीवन उत्तम राहील. गायत्री मंत्र वाचा. शुभ रंग पिवळा आहे.
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: प्रेमाच्या बाबतीत मनातलं बोलण्याची ही उत्तम वेळ आहे. समोरच्या व्यक्तीसमोर लग्नाचा प्रस्ताव ठेवू शकता. आरोग्यासंबधी तक्रार जाणवेल. श्री विष्णू सहस्त्रनाम वाचा. गरिबांना अन्नदान करा. शुभ रंग निळा आहे.
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: मानसिक तणाव कमी होण्यास मदत होईल. कामाच्या ठिकाणी अनेक अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे. कुटुंबाचे सहकार्य लाभेल. मनोरंजनाच्या संधी प्राप्त होतील. आरोग्य उत्तम राहील. शुभ रंग पिवळा आहे.
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: चित्रपट आणि टीव्ही संबंधित लोकांना  यश प्राप्त होईल. पैसा खर्च होईल. वैवाहिक आयुष्य आनंददायी राहील. आरोग्य चांगलं राहील. तीळ दान करा. शुभ रंग लाल आहे.
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: व्यापारात वाढ होईल. गुंतवणूक करताना संयमानं निर्णय घ्या. नोकरीच्या ठिकाणी अनुकूल वातावरण असेल. दुसऱ्यांच्या कामात हस्तक्षेप करू नका. नवीन संधी मिळतील. व्यापाऱ्यात धोका पत्करू नका. शुभ रंगः नारंगी. 
 7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: उत्पन्नाचे नवे स्रोत उपलब्ध होतील. एखादं रखडलेलं काम पूर्ण होण्याची शक्यता आहे. खर्चावर नियंत्रण ठेवा. वैवाहिक जीवनात आनंद कायम राहील. आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. शुभ रंग लाल आहे.
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: आयटी आणि बँकिंग क्षेत्रातील लोकांना यश मिळेल. त्यामुळे आनंदी असाल. वैवाहिक आयुष्यात क्रोधाला स्थान देऊ नका. आरोग्य उत्तम असेल. गरिबांना अन्न दान केल्यास पुण्य मिळेल. शुभ रंग पांढरा आहे.
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: एखादी आनंदाची बातमी मिळाल्यानं खुश रहाल. विद्यार्थ्याची अभ्यासात एकाग्रता वाढेल. नोकरदारांच्या कामाची प्रशंसा झाल्याने तुमचा दिवस आनंदी राहील. शुभ रंग निळा आहे.
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: मनात दडवून ठेवलेल्या गोष्टी व्यक्त करण्यासाठी योग्य काळ आहे. धर्म आणि आध्यात्माची आवड लागल्याने वातावरण प्रसन्न राहील. कार्यक्षेत्राचा विस्तार होण्याची शक्यता आहे. जबाबदारी वाढण्याची शक्यता आहे. वैवाहिक जीवनात आनंद कायम राहील. शुभ रंग काळा आहे.
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: आर्थिक तसेच मानपानाचं नाट्य रंगेल. वाद विवादांमध्ये पडू नका. चिंता, ताण वाढेल. वेळेवर काम न झाल्याने उदासिनता कायम राहिल. शुभ रंगः पांढरा
 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: जीवलग व्यक्तिबरोबर वैयक्तिक पातळीवर भागीदारीसाठी संबंध वाढवण्याचा प्रयत्न करा. इतर लोकांबद्दल भावनात्मक प्रतिक्रिया आवश्यकतेपेक्षा अधिक असते. शुभ रंगः जांभळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी