राशी भविष्य २९ जुलै: पाहा हा दिवस कसा असेल

राशी भविष्य, २९ जुलै २०२० : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

Horoscope
राशीभविष्य  |  फोटो सौजन्य: Times Now

थोडं पण कामाचं

  • जाणून घ्या कसं असेल आपलं भविष्य 
  • नव्या दिवसाची सुरुवात करण्याआधी पाहा भविष्य
  • श्रावण महिन्यातील पहिला मंगळवार कसं असेल आपलं भविष्य 

राशी भविष्य  29 July 2020: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

  1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: आरोग्य उत्तम राहिल. लेखन कार्यात प्रगती होईल. कुटुंबातील व्यक्तीबरोबर वेळ आनंदात जाईल. व्यापारात स्पर्धा वाढण्याची शक्यता आहे. शुभ रंग निळा आहे.
  2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: कुटुंबातील व्यक्तींकडून चांगली बातमी मिळेल. दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. आरोग्याची काळजी घ्या. वायफळ खर्च करणं टाळा. शुभ रंग - पिवळा.
  3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: लेखन आणि साहित्यिक क्षेत्रातील गोडी अधिकपटीने वाढेल. विद्यार्थी, कलाकार आणि खेळाडूंसाठी दिवस चांगला आहे. आर्थिक नियोजन कराल. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग : नारंगी.
  4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today:  व्यापार आणि व्यावसायिक क्षेत्रात लाभ होईल. नवीन कार्याचा शुभारंभ करू शकता. नोकरीत पदोन्नती होईल. आरोग्याची काळजी घ्या. शुभ रंग - हिरवा.
  5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: श्री गणेशाची पूजा करा. त्यामुळे मन प्रसन्न होईल. आरोग्य निरोगी राहील. कुटुंबात आनदांचे वातावरण राहील. शुभ रंग : पांढरा.
  6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: आरोग्याची काळजी घ्या. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका. वायफळ खर्च होईल. कुटुंबात मतभेद  होण्याची शक्यता आहे. शुभ रंग : निळा.
  7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: आई-वडिलांकडून चांगला आशीर्वाद मिळेल. वैचारिकदृष्ट्या मन स्थिर राहील. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रीत होईल. सकारात्मक विचारांमुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. शुभ रंग : लाल.
  8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: घरात नवीन कार्यक्रमाची योजना कराल. लव लाईफ उत्तम राहील. मित्र-मैत्रिणींच्या भेटीमुळे तुमचे मन प्रसन्न होईल. वायफळ खर्च करू नका. शुभ रंग - लाल.
  9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: तुमची महत्वाची कार्य पूर्ण होतील तसेच जबाबदारी वाढण्याचीही शक्यता आहे. मित्रांकडून सहकार्य मिळू शकेल. राजकीय व्यक्तींसाठी दिवस आनंददायी ठरेल. शत्रूंचा त्रास कायम असेल पण तुम्ही त्यांना हरवू शकाल. शुभ रंग पिवळा आहे.
  10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: विद्यार्थी शिक्षणात मिळालेल्या यशामुळे आनंदी राहतील. वैवाहिक जीवनात आनंद कायम राहील. जोडीदाराच्या अपेक्षा समजावून घेण्याचा प्रयत्न करणे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. शुभ रंग नारंगी आहे.
  11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: इतरांना आपल्या विचारांपासून प्रभावित करालं. लोकांसमोरील प्रभाव वाढेल. सादरीकरणं प्रभावशाली होतील. समस्या निवारणासाठी तसेच आत्मविश्वासाच्या वृद्धीसाठी थोडा वेळ काढा. शुभ रंग लाल आहे.
  12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: आपण आपल्या कार्यात यश मिळवू शकाल. धावपळ कायम राहील. शेयर मार्केट व्यवहारात सावध रहा. दिवस आरोग्यदायी ठरेल. शुभ रंग पांढरा आहे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी