Numerology: खूपच शक्तिशाली आणि शुभ मानला जातो हा आकडा, तुमची जन्मतारीख देखील तीच आहे?

Numerology: अंकशास्त्रानुसार एकूण नऊ मूलांक आहेत आणि प्रत्येक मूलांकात काही ना काही स्वामी ग्रह असतो. येथे आम्ही तुम्हाला अशाच एका मूलांकाबद्दल सांगणार आहोत, ज्याचा संबंध देवगुरु बृहस्पतीशी आहे.

3 number is considered very powerful and auspicious is your birth date also the same
Numerology: खूपच शक्तिशाली आणि शुभ मानला जातो हा आकडा, तुमची जन्मतारीख देखील तीच आहे? (I-Stock) 
थोडं पण कामाचं
  • अंकशास्त्रानुसार एकूण नऊ मूलांक असतात
  • मूलांकावरून कोणत्याही व्यक्तीचा स्वभाव ओळखता येतो
  • प्रत्येक मूलांकावर कोणत्या ना कोणत्या ग्रहाचे राज्य असते

Numerology Astro: ज्योतिषशास्त्रात प्रत्येक अंकाला विशेष महत्त्व आहे. ही संख्या थेट आपल्या जीवनावर परिणाम करतात. प्रत्येक व्यक्तीसाठी कोणता ना कोणता आकडा हा खास असतो. ज्याप्रमाणे जन्मकुंडली पाहून भविष्याची माहिती मिळू शकते, त्याचप्रमाणे जन्मतारखेच्या संख्येवरूनही बरंच काही कळू शकतं. आज येथे आपण देवगुरु बृहस्पतीची संख्या मानली जाणारी मूलांक 3 बद्दल बोलणार आहोत. असे म्हणतात की, या संख्येच्या लोकांवर देवाची असीम कृपा असते. ज्या लोकांची जन्मतारीख 3, 12, 21 किंवा 30 आहे, त्यांचा जन्म मूलांक हा असतो. (3 number is considered very powerful and auspicious is your birth date also the same)

अंकशास्त्रानुसार मूलांक 3 असलेल्या लोकांवर देवाची भरपूर कृपा असते. ते मेहनती आणि हुशार असतात. तसेच त्यांचे नशीब देखील खूप चांगले मानले जाते. ते ज्ञानी, महत्त्वाकांक्षी, गोड बोलणारे, गंभीर आणि धार्मिक स्वभावाचे असतात.

अधिक वाचा: Shani Margi 2022: 'या' राशींच्या लोकांनी 17 जानेवारीपर्यंत टाका सावध पाऊल, प्रभाव टाळण्यासाठी करा हे उपाय

त्यांना समाजात खूप मान मिळतो. त्यांना त्यांच्यापेक्षा मोठ्या लोकांचा खूपच आदर करतात. ते नेहमीच सत्य आणि न्यायासाठी लढा देत असतात. ते त्यांच्या बौद्धिक क्षमतेच्या जोरावर  जीवनात प्रगती करण्यात यशस्वी ठरतात.

त्यांची इतरांबद्दल सहानुभूतीपूर्ण वृत्ती असते. तसेच त्यांची विचारसरणी ही खूप सकारात्मक असते. हे लोक चांगले समुपदेशकही असतात. ते त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना आणि त्यांच्या प्रियजनांना आयुष्यातील सर्व आनंद देऊ इच्छितात. ज्यासाठी ते अधिकाधिक पैसे मिळवण्याचा देखील प्रयत्न करतात. त्याची कारकीर्दही उत्तम असते. ते त्यांच्या कामाव्यतिरिक्त इतर गोष्टींमध्ये फारसा रस नसकतो. मात्र या लोकांचे शत्रूही फार लवकर होतात.

अधिक वाचा: Grah Gochar November 2022:  नोव्हेंबर महिन्यात एका राशीत शुक्र आणि बुध होणार गोचर, या चार राशीच्या लोकांना होणार धनलाभ

3 मूलांक असलेलली लोकं कोणत्याही क्षेत्रात राहून नाव कमावतात. त्यांच्यासाठी योग्य करिअर म्हणजे शिक्षक, वकील, पत्रकार, व्यवसाय, समुपदेशक हे असू शकतं. याशिवाय प्रशासकीय पदांवर देखील ही लोकं विराजमान होऊ शकतात. त्यांना जीवनात चांगले शिक्षण मिळते. याशिवाय त्यांना धर्म आणि कार्यक्षेत्रातही चांगली कामगिरी आणि प्रसिद्धी मिळू शकते.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी