राशी भविष्य ५ डिसेंबर : पाहा शनिवार तुमच्यासाठी कसा असेल

राशी भविष्य, ५ डिसेंबर २०२० : मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या १२ राशींसाठी कसा असेल दिवस? जाणून घ्या या राशींचे डेली भविष्य...

Horoscope
राशी भविष्य 

राशी भविष्य 5 December 2020: कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी कसा असेल दिवस आणि कुठल्या राशीच्या व्यक्तींसाठी शुभ रंग काय आहे या सर्वांची सविस्तर माहिती पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. जाणून घ्या मेष, वृषभ, मिथुन, कर्क, सिंह, कन्या, तूळ, वृश्चिक, धनु, मकर, कुंभ, मीन या 12 राशींसाठी कसा असेल दिवस?

 1. मेष राश‍ी भविष्य / Aries Horoscope Today: व्यापारात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. तुमची प्रलंबित कामं पूर्ण होतील. मित्रपरिवारांसोबत वेळ घालवाल. दाम्पत्यांमध्ये तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे. लव्ह लाईफ चांगली राहील. शुभ रंग : पांढरा.
 2. वृषभ राश‍ी भविष्य / Tauras Horoscope Today: वायफळ खर्च करणं टाळा. आयटी आणि मीडिया क्षेत्रातील लोकांना कार्यात यश येईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासात लक्ष केंद्रित होईल. जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी घ्या. नकारात्मक विचारांपासून दूर रहा. पोटाचे विकार संभावतील. शुभ रंग : हिरवा.
 3. मिथुन राश‍ी भविष्य / Gemini Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी शुभ आहे. इतरांशी व्यवहार करताना काळजी घ्या. कुटुंबात अनुकूल वातावरण राहील. भगवान श्री गणेशाची पूजा करा. विवाहीत जीवनात सुख-शांतता राहील. शुभ रंग : निळा.
 4. कर्क राश‍ी भविष्य / Cancer Horoscope Today: राजकीय क्षेत्रात यश येईल. आयटी आणि बॅंकिंग क्षेत्रात प्रगती होईल. धार्मिक कार्यात व्यस्त व्हाल. विद्यार्थ्यांना शिक्षणात नवीन संधी उपलब्ध होतील. आरोग्य बिघडण्याची शक्यता आहे. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकता. शुभ रंग : पिवळा.
 5. सिंह राश‍ी भविष्य / Leo Horoscope Today: भगवान श्री गणेशाची पूजा-अर्चना करा. मार्केटिंग क्षेत्रातील लोकांना नवनवीन संधी उपलब्ध होतील. प्रेमळ व्यक्तीच्या भेटीमुळे, मन प्रफुल्लित राहील. उच्चवर्गीय पदाधिकाऱ्यांकडून चांगलं सहकार्य मिळेल. आरोग्य निरोगी राहील. शुभ रंग : लाल.
 6. कन्या राश‍ी भविष्य / Virgo Horoscope Today: जुन्या मित्र-मैत्रिणींची भेट होईल. मनावर नियंत्रण ठेवा. समाजात मान-सन्मान मिळेल. मीडिया आणि आयटी क्षेत्रातील अनेक दिवसांपासूनची प्रलंबित कामं पूर्ण होतील. दाम्पत्यांमध्ये आनंदीत वातावरण राहील. गरीबांना दान करा. शुभ रंग : निळा.
 7. तूळ राश‍ी भविष्य / Libra Horoscope Today: वायफळ खर्च करणं टाळा. लव्ह लाईफ उत्तम राहील. मधुमेह असलेल्या व्यक्तींनी आपल्या आरोग्याची काळजी घ्या. कोर्ट-कचेरीच्या कामात यश येईल. मित्र-मैत्रिणींसोबत वेळ घालवाल. शुभ रंग : हिरवा.
 8. वृश्चिक राश‍ी भविष्य / Scorpio Horoscope Today: घरातील महत्त्वाच्या कामांमध्ये लक्ष द्या. शिक्षण आणि आध्यात्मिक गोष्टींमुळे, तुमचा आत्मविश्वास वाढेल. गृहस्थांच्या जीवनात सुख-शांतता राहील. बाहेरील खाद्यपदार्थ खाणे शक्यतो टाळा. भगवान श्री हनुमानाची पूजा करा. शुभ रंग : पांढरा.
 9. धनु राश‍ी भविष्य / Sagittarius Horoscope Today: एखादी वस्तू खरेदी करण्यासाठी, अधिकपटीने खर्च कराल. भाऊ-बहिणींकडून चांगला आशीर्वाद आणि पाठिंबा मिळेल. प्रतिस्पर्धींवर विजय मिळवू शकता. आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. शुभ रंग : निळा.
 10. मकर राश‍ी भविष्य / Capricorn Horoscope Today: दिवस तुमच्यासाठी संघर्षमय असेल. ऑफिसमधील कामात कठिण परिश्रम घेतल्यानंतर, तुमच्या कार्यात यश येईल. लव्ह लाईफ उत्तम राहील. कुटुंबातील व्यक्तींकडून चांगली बातमी मिळेल. धनलाभ होण्याची शक्यता आहे. शुभ रंग : पांढरा.
 11. कुंभ राश‍ी भविष्य / Aquarius Horoscope Today: नोकरी आणि व्यापारात धन आगमन होईल. आयटी आणि मीडिया क्षेत्रातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून उत्तम प्रतिसाद मिळेल. तुमची प्रत्येक कामं पूर्ण होतील. कोणत्याही नवीन कार्याची सुरूवात करू शकता. शुभ रंग : नारंगी.
 12. मीन राश‍ी भविष्य / Pisces Horoscope Today: विविध क्षेत्रातील लोकांसाठी दिवस चांगला जाईल. जीवनसाथीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. व्यवसायातील कामात यशप्राप्त होईल. कुटुंब आणि मित्रपरिवारांसोबत धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. शुभ रंग : पिवळा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी