Vastu Effect : नवी दिल्ली : घराच्या बांधकामापासून ते सजावटीपर्यंत अनेक गोष्टी वास्तुशास्त्रात सांगण्यात आल्या आहेत, ज्यांचा थेट संबंध माणसाच्या सुख-समृद्धीशी आहे. वास्तूनुसार अनेक वस्तू घरात ठेवणे अशुभ मानले जाते. घरात ठेवलेल्या या वस्तू व्यक्तीच्या अशुभशी जोडल्या जातात. ते घरात नकारात्मक ऊर्जा आणतात. आज आम्ही तुम्हाला अशाच काही गोष्टींबद्दल सांगत आहोत. (7 things that have negative effect on you as per Vastushastra)
अधिक वाचा : Astro Tips to get your money back : उधार दिलेले पैसे परत मिळविण्यासाठी करायचे उपाय
अधिक वाचा - झोपताना पाय पूर्वेकडे करू नये, जाणून घ्या कारणं
घरात अनेक मोठी माणसे काही गोष्टींसाठी मनाई करत असतात. या गोष्टी अनेक शतकांपासून चालत आल्या आहेत. यातीलच एक बाब म्हणजे गरम तव्यावर पाणी टाकणे. गरम तव्यावर कधीही पाणी टाकू नये. हे तुम्ही अनेक जणांकडून ऐकले असेल. मात्र त्यामागचे कारण तुम्हाला माहीत आहे का?वास्तुशास्त्रानुसार गरम तव्यावर पाणी टाकल्याने त्याचा येणारा आवाज छन हा चांगला नसतो. यामुळे घरात नकारात्मक वातावरण तयार होते. घरातील सदस्याला यामुळे आजार होऊ शकतो. असंही म्हटलं जातं की गरम तव्यावर पाणी टाकल्याने मुसळधार पाऊस पडतो. असा पाऊस विध्वंसेचे कारण बनू शकतो. यासाठी वडीलधारी मंडळी असे न करण्यास सांगतात. तव्याचा संबंध राहुशी जोडलेला असतो. यासाठी तव्याची योग्य ती साफ-सफाई न केल्यास मोठ्या समस्येचे कारण बनू शकते. वास्तुशास्त्रानुसार तवा किचनमध्ये अशा ठिकाणी ठेवला पाहिजे जो बाहेरच्या व्यक्तीला दिसणार नाही. तवा नेहमी लेटून ठेवावा. उभा करून ठेवणे योग्य नाही.
अधिक वाचा : पूर्व दिशेला घर असल्यास या वास्तु टिप्स देतील शुभ लाभ
(Disclaimer: येथे दिलेली माहिती सामान्य गृहीतके आणि माहितीवर आधारित आहे. याचा उद्देश केवळ माहिती देण्याचा आहे. टाईम्स नाऊ याच्याशी सहमत असेलच असे नाही.)