मुंबई: Aashadh Deep Amavasya 2022: राज्यात उद्यापासून म्हणजेच 29 जुलै 2022 पासून भगवान (God) शिव-शंकराच्या (Shiva-Sankara) उपासनेचा (Worship) महिना श्रावण सुरू होत आहे. श्रावणात मांस (meat) आणि मद्य सोडून सात्विक आहार (Sattvic diet) घेतला जातो. तर मराठी दिनदर्शिकेनुसार गटारी अमावस्या आषाढ महिन्यातील अमावास्येला साजरी केली जाते. तर उत्तर भारतात आजच्या दिवशी हरियाली अमावस्या म्हणून ओळखली जाते.
आषाढ महिन्यात येणारी अमावस्या म्हणजे आषाढी अमावस्या(Ashadhi Amavasya). याला दीप अमावस्या(deep amavasya) असे ही म्हणतात. या दिवशी दिवा लावण्याची परंपरा आहे. ही अमावस्या आषाढ महिन्यातील अखेरीस येते. आषाढ अमावस्या ही चातुर्मासातील पहिली अमावस्या असं मानलं जातं. श्रावण महिन्याला सुरुवात होण्याच्या आदल्या दिवशी अमावस्या येते. बुधवार 27 जुलैला अमावस्या प्रारंभ होणार आहे.
अधिक वाचा- नव्या सरकारच्या मंत्रिमंडळाचा विस्तार कधी?, खुद्द एकनाथ शिंदेंनी दिलं अचूक उत्तर
यंदा आषाढ अमावास्या गुरुवार, 28 जुलै 2022 रोजी साजरी केली जाणार आहे. या अमावास्येला गुरुपुष्यामृत योग देखील आहे. तर यंदा श्रावण महिना 29 जुलैपासून शनिवार 27 ॲागस्ट 2022 पर्यंत असणार आहे.
दिवे लावण्याची प्रथा
श्रावण महिना सुरु होण्याच्या एक दिवस आधी ही अमावस्या येत असते. त्यामुळे या दिवशी सर्व देवांची दिवे लावून पूजा केली जाते. भगवान शंकर, पार्वती, गणपती आणि कार्तिकेय यांची दीप अमावस्येदिवशी पूजा केली जाते. या दिवशी पूर्वजांचे स्मरण केले जाते आणि दिवा लावला जातो. दीप अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचेही विशेष महत्त्व आहे. या दिवशी स्नान, दान आणि पूजाविधीचे वेगळे महत्त्व आहे.
कुठल्या ना कुठल्या रुपात दिवा आपल्याला प्रकाश देत असतो. या दिव्याप्रती कृतज्ञता म्हणून दीप अमावस्या साजरी केले जाते. या दिवशी दिवे लावले जातात. दिव्यांच्या प्रकाशानी संपूर्ण परिसर उजळून निघतो. घरातील सर्व दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात. या दिव्यांची पुजा केली जाते. तसेच आपल्या घरातील लहान मुलगा जो कुलदीपक आहे अथवा मुलगी जिला घराची पणती मानली जाते त्यांनाही ओवाळले जाते. तसेच कणीक आणि गुळाचे दिवे केले जातात.
दीप अमावस्येनंतर श्रावण महिन्याला सुरूवात होत असते. श्रावण मास म्हणजे व्रत वैकल्यांचा महिना. या महिन्यात बरेच सण समारंभ साजरे केले जातात. नागपंचमी, रक्षाबंधन, गोपाळकाला, गौरी-गणपती हे सण येतात. श्रावण महिन्यानंतर सर्व सणांना सुरूवात होते.
दीप अमावस्या 2022 तारीख आणि तिथी वेळ
यंदा आषाढ महिन्यात अमावस्येची सुरूवात 27 जुलै दिवशी रात्री 9 वाजून 11 मिनिटांनी झाली आहे. तर अमावस्येची समाप्ती 28 जुलै दिवशी रात्री 11 वाजून 24 मिनिटांनी होणार आहे. त्यामुळे दीप अमावस्या 28 जुलै दिवशी म्हणजेच आज साजरी केली जाणार आहे.
अधिक वाचा- Alert..! 15 ऑगस्टला तीन प्रकारचे Attacks होणार?
अशी करा आजची पूजा (Pooja Vidhi)
या दिवशी घरातील सर्व दिवे घासून पुसून लख्ख करावेत. एका पाटावर हे सर्व दिवे मांडावेत. पाटाच्या सभोवताली रांगोळी काढावी. कणकेचे दिवे बनवावेत. या दिव्यांची हळद, कुंकू, फुले वाहून पुजा करावी. नैवेद्य दाखवावा.
हा मंत्र म्हणा
दीप सूर्याग्निरूपस्त्वं तेजस: तेज उत्तमम ।
गृहाणं मत्कृतां पूजा सर्व कामप्रदो भव:॥
हे दीपा तु अग्निरूप तसेच सूर्यरूप आहेत. तेजांमध्ये उत्तम तेज आहे. तुम्ही माझ्या पुजेचा स्वीकार करून माझ्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करा अशी मनोभावे प्रार्थना करावी.