आचार्य चाणक्य यांचे हे बोल ऐकणाऱ्यांना कधीही येणार नाही पैशाची कमतरता

धर्म-कर्म-भविष्य
Updated Apr 07, 2021 | 15:39 IST | टाइम्स नाऊ मराठी

आचार्य चाणक्य सांगतात की तुम्हाला वाटत असेल की तुमच्या जीवनात सुखसमृद्धी राहावी आणि कधीही पैशांची कमतरता येऊ नय तर चाणक्य नितीमध्ये लिहिलेल्या या गोष्टी नक्की लक्षात ठेवा.

chanakya
आचार्य चाणक्य यांचे बोल ऐकणाऱ्यांना येणार नाही पैशाची कमतरता 

थोडं पण कामाचं

  • जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात पैशाची कमतरता जाणवू नये तसेच सुख समृद्धी राहावी तर आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या गोष्टींचे जरूर पालन करावे.
  • आचार्य चाणक्य म्हणतात की नेहमी विद्वान व्यक्तींचा सन्मान करावा.
  • ज्या घरात क्लेश होत नाही. पती-पत्नीमध्ये भांडणे होत नाहीत. आपांपसात प्रेम कायम राहते त्या घरात लक्ष्मी टिकते.

मुंबई: आचार्य चाणक्य हे महान विद्वान होते ज्यांनी अर्थशास्त्र, समाजशास्त्र आणि नीतीशास्त्राचा गाढ अभ्यास केला होता. त्यांनी आपल्या ज्ञानाने मानवजातीचे कल्याण केले.चाणक्य यांनी चाणक्य नितीमध्ये मनुष्याच्या प्रत्येक समस्येचे समाधान सांगितले आहे. चाणक्य यांनी मनुष्याला प्रत्येक परिस्थितीत कसे टिकून राहायचे आणि त्यावर कशी मात करायची हेही सांगितले आहे. 

या ३चा सन्मान करा कधीच पैशाची कमतरता जाणवणार नाही

जर तुम्हाला वाटत असेल की तुमच्या आयुष्यात पैशाची कमतरता जाणवू नये तसेच सुख समृद्धी राहावी तर आचार्य चाणक्य यांनी सांगितलेल्या गोष्टींचे जरूर पालन करावे. चाणक्य नितीमधील तिसऱ्या अध्यायातील २१व्या श्लोकात ते म्हणतात, 

मूर्खा यत्र न पूज्यते धान्यं यत्र सुसंचितम् ।
दंपत्यो कलहो नास्ति तत्र श्रीः स्वयमागतः ॥

अर्थ - जेथे मूर्खांना सन्मान मिळत नाही, जेथे धान्य चांगल्या पद्धतीने सांभाळून ठेवले जात असेल आणि जेथे पती-पत्नीमध्ये भांडण होत नसेल तिथे लक्ष्मी स्वत:हून चालत येते आणि धनधान्याची कमतरता जाणवत नाही.  

विद्वान लोकांचा सन्मान करा - आचार्य चाणक्य म्हणतात की नेहमी विद्वान व्यक्तींचा सन्मान करावा. जे लोक ही गोष्ट कायम ध्यानात ठेवतात त्यांना जीवनात कोणतीही समस्या येत नाही तसेच त्यांच्याकडे पैशांचीही कमतरता नसते. 

धान्याचा मान राखा - धान्याला अन्नपूर्णा असे म्हटले जाते. कारण धान्य लक्ष्मीचे रूप आहे यामुळे हे धान्य वाया घालवल्यास देवी लक्ष्मी नाराज होते. यासाठी ज्या घरात धान्याचा सन्मान होतो ते वाया घालवले जात नाही, चांगल्या पद्धतीने साठवले जाते तेथे नेहमी लक्ष्मीचा वास राहतो. 

पती-पत्नी यांच्यात भांडण नको - ज्या घरात क्लेश होत नाही. पती-पत्नीमध्ये भांडणे होत नाहीत. आपांपसात प्रेम कायम राहते त्या घरात लक्ष्मी टिकते. कारण पत्नीला गृहलक्ष्मी म्हटले जाते. यासाठी पतीने नेहमी पत्नीचा सन्मान केला पाहिजे. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी