Akshaya Tritiya 2023 Date and Timing: कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व

धर्म-कर्म-भविष्य
Updated Apr 10, 2023 | 19:01 IST | टाइम्स नाऊ मराठी

Akshaya Tritiya 2023 Date and Timing: हिंदु धर्मात अक्षय्य तृतीयेला (Akshaya Tritiya 2023) अनन्यसाधारण महत्त्व आहे. अक्षय तृतीयेला साडेतीन मुहुर्तापैकी एक मानलं जातं. वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या अक्षय्य तृतीया सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. 

Akshaya Tritiya 2023 Date and Timing
कधी आहे अक्षय्य तृतीया? जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व  |  फोटो सौजन्य: Times Now
थोडं पण कामाचं
  • अक्षय्य तृतीयेला साडेतीन मुहर्तापैकी एक मानला जातो. अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्याची प्राचीन परंपरा आहे.
  • अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णुने परशुरामच्या अवतारात जन्म घेतला होता.
  • अक्षय्य तृतीयेच्या दिवशी रमझान ईद देखील साजरी करण्यात येणार आहे.

Akshaya Tritiya 2023 Date and Timing: हिंदू धर्मात अक्षय्य तृतीयेला (Akshaya Tritiya 2023) विशेष महत्तत्व आहे. या दिवशी घरात कोणतेही शुभ कार्य केल्यास व्यक्तीला कशाचीही कमी भासत नाही. 'अक्षय्य' या शब्दाचा मराठी अर्थ म्हणजे कधीही कमी न होणे, असा आहे. त्यामुळे अक्षय्य तृतीयेला दान-धर्म केल्यास त्याचं आपल्याला अक्षय्य फळ मिळतं, असं सांगितलं जातं.  (Akshaya Tritiya 2023 Date and Timing Know auspicious time and importance in marathi) 

अक्षय्य तृतीयेला साडेतीन मुहर्तापैकी एक मानला जातो. अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करण्याची प्राचीन परंपरा आहे. या दिवशी सोने खरेदी करणे खूप शुभ असतं. घरात सुख-समृद्धी नांदते. यंदा अक्षय्य तृतीयेला शुभ योग जुळून येत आहेत. त्यामुळे सोने खरेदीला अधिक महत्त्व प्राप्त होणार आहे.
 
धार्मिक कथेनुसार, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी भगवान विष्णुने परशुरामच्या अवतारात जन्म घेतला होता. परशुराम हा विष्णुचा सहावा अवतार होता. तर ज्योतिष शास्त्रानुसार, अक्षय्य तृतीयेला सूर्य आणि चंद्र उच्च राशीत प्रवेश करतात. त्यामुळे या दिवसाचं महत्त्व आणखी वाढत असतं. कोणतेही नवे काम सुरू करायचं झाल्यास अक्षय्य तृतीयेच्या मुहर्तावर करणं शुभ मानलं जातं. चला तर मग जाणून घेऊ या कधी आहे अक्षय्य तृतीया आणि शुभ मुहूर्त?

हिंदू पंचांगानुसार, वैशाख महिन्यातील शुक्ल पक्षातील तृतीयेया अक्षय्य तृतीया साजरी केली जाते. यंदा 22 एप्रिल 2023 अक्षय्य तृतीया साजरी केली जाणार आहे. विशेष म्हणजे याच दिवशी खास योग जुळून आला आहे. तो म्हणजे, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी रमझान ईद देखील साजरी करण्यात येणार आहे.  22 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7 वाजून 49 मिनिटांला तृतीयेस प्रारंभ होईल. तर 23 एप्रिल 2023 रोजी सकाळी 7 वाजून 47 मिनिटांला तृतीया समाप्त होईल. त्यामुळे उदयातिथी म्हणजेच 22 एप्रिलला अक्षय्य तृतीया साजरी करण्यात येईल.

अक्षय्य तृतीयेचे शुभ मुहूर्त

अक्षय्य तृतीयेला भगवान विष्णुने परशुरामाच्या अवतारात जन्म घेतला होता. त्यामुळे या दिवशी भगवान विष्णु आणि माता लक्ष्मीचं पूजन केलं जातं. या दिवशी सकाळी 7 वाजेपासून 49 मिनिटांपासून दुपारी 12 वाजून 20 मिनिटांपर्यंत शुभ मुहूर्त आहेत. 

अक्षय्य तृतीयेचं महत्त्व

अक्षय्य तृतीया हा सण महालक्ष्मीला समर्पित आहे. त्यामुळे या सणाला हिंदु धर्मात अनन्यसाधारण महत्त्व आहे. माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरात कशाचीही कमतरता भासत नाही. विशेष म्हणजे अक्षय्य तृतीयेला शुभ कार्य तसेच पूजेचा मुहूर्त पाहिला जात नाही. दिवस भरात तुम्ही केव्हाही शुभ कार्य करू शकतात. त्याचबरोबर नवं काम देखील सुरू करू शकतात. 

धार्मिक मान्यतेनुसार, अक्षय्य तृतीयेच्या दिवशी घरात शुभ कार्य, महालक्ष्मी पूजन केल्यास सौभाग्य आणि समृद्धी प्राप्त होते. कौटुंबीक कलह दूर होतात. तसेच नवे नातेसंबंध जोडण्यासाठी देखील हा दिवस खूप महत्त्वाचा मानला जातो. 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी