Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' उपाय, आर्थिक स्थिती होईल भक्कम अन् तिजोरीत येईल पैशांचा पूर

Akshaya Tritiya upay in marathi: वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितेय तिथीला अक्षय्य तृतीया असते. यंदाच्या वर्षी अक्षय्य तृतीया 22 एप्रिल रोजी आहे. या दिवशी तुम्ही काही उपाय केले तर तुम्हाला सुख-समृद्धी मिळेल अन् पैशांची कमीही भासणार नाही.

akshaya tritiya 2023 do these thing to get money prosperity happiness read astrology tips in marathi
Akshaya Tritiya: अक्षय्य तृतीयेला करा 'हे' उपाय, आर्थिक स्थिती होईल भक्कम अन् तिजोरीत येईल पैशांचा पूर 
थोडं पण कामाचं
  • यंदाच्या वर्षी 22 एप्रिल रोजी अक्षय्य तृतीया 
  • अक्षय्य तृतीयेला करा काही खास उपाय

Akshaya Tritiya 2023: वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या द्वितेय तिथीला अक्षय्य तृतीया असते. यंदाच्या वर्षी अक्षय्य तृतीया 22 एप्रिल रोजी आहे. या दिवशी अमृत सिद्धी योग, रवी योग, सर्वार्थ सिद्धी योग, सौभाग्य योग, त्रिपुष्कर योग आणि आयुष्मान योग सुद्धा आहे. अक्षय्य तृतीया हा हिंदू धर्मात सर्वात शुभ दिवसांपैकी एक आहे. साडेतीन मुहूर्तांपैकी एक असा अक्षय्य तृतीयेचा दिवस खूपच शुभ मानला जातो. त्यामुळेच या दिवशी कोणताही मुहूर्त न पाहता लग्नकार्य आणि इतर मंगलकार्य करण्यात येतात.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने खरेदी सुद्धा शुभ मानले जाते. या दिवशी धन आणि वैभव याच्या संबंधित काही उपाय करणे लाभदायक ठरते. तुमच्या घरातील तिजोरी पैशांनी भरलेली असावी असे तुम्हाला वाटत असेल तर अक्षय्य तृतीयेच्या शुभ दिवशी काही उपाय करावे लागतील. हे उपाय केल्यास तुम्हाला सुख-समृद्धी, संपत्तीची कमी भासणार नाही.

हे पण वाचा : गर्लफ्रेंडसमोर चुकूनही बोलू नका या 9 गोष्टी

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी करा हे उपाय

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी संपूर्ण घराची स्वच्छता करा आणि वास्तूनुसार, घरात काही बदल करावे. या दिवशी आपल्या तिजोरीत दक्षिण भिंतीकडे वळवा. ही दिशा संपत्ती वाढीसाठी आणि धनलाभासाठी उत्तम मानली जाते.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लक्ष्मीमातेला गुलाबाचे फूल अर्पण करा. गुलाबी रंगाचे कपडे घालून पूजा करा. मोती किंवा स्फटिकाच्या मण्यांनी 'हृीं क ए इ ल हृीं ह स क ह ल हृीं स क ल हृीं' मंत्राचा जप करणे लाभदायक ठरेल.

हे पण वाचा : हे गुण असलेली मुलगी मिळाली तर लग्नाला चुकूनही देऊ नका नकार

अक्षयय्य तृतीयेच्या दिवशी कांदा, लसूण, मांस इत्यादीचे सेवन चुकूनही करू नये.

कधी-कधी असे होते की, नोकरी-व्यापार योग्य चालत असेल तरी पैशांची कमतरता जाणवते. अशा परिस्थितीत घराच्या मुख्य दरवाजावर गणपती बाप्पाचा फोटो लावा. यामुळे नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होईल आणि पैशांच्या संबंधित समस्या दूर होतील.

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी दान करणे शुभ मानले जाते. 

हे पण वाचा : ...म्हणून विवाहबाह्य संबंध जास्त काळ टिकतात

चुकूनही करू नका हे काम

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी चुकूनही प्लास्टिक, अ‍ॅल्युमिनियम किंवा स्टीलची भांडी, उपकरणे खरेदी करू नका. या दिवशी चुकूनही कुणाला उधार देऊ नका. असे केल्याने लक्ष्मी माता तुमच्यावर नाराज होते अशी मान्यता आहे.

हे पण वाचा : ...म्हणून काही मुलींना बॉयफ्रेंड मिळत नाही

काय करावे?

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू यांची एकत्र पूजा केली जाते. अक्षय्य तृतीयेच्या दिवशी लक्ष्मी माता आणि विष्णूजींची पूजा वेगवेगळी नका करू तर एकत्रित पूजा करा. कारण, लक्ष्मी माता आणि भगवान विष्णू हे पती-पत्नी आहेत. त्यामुळे या दोघांचीही एकत्रित पूजा करा.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी