Astro Tips : गुळाचा छोटासा तुकडा बदलू शकतो आयुष्य, हे उपाय केल्यास कधीच भासणार पैशांची चणचण

jaggery tips for luck : ज्योतिष शास्त्रामध्ये सुख, समृद्धी आणि संपत्तीच्या वाढीसाठी अनेक उपाय सांगण्यात आले आहेत. तसेच गुळाशी संबंधित काही उपाय सांगितले आहेत. असे मानले जाते की या उपायांचे पालन केल्याने तुम्हाला कधीही आर्थिक संकटाचा सामना करावा लागणार नाही.

Astro Tips: A small piece of jaggery can change your life
Astro Tips : गुळाचा छोटासा तुकडा बदलू शकतो आयुष्य, हे उपाय केल्यास कधीच भासणार पैशांची चणचण ।   |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ज्योतिष शास्त्रानुसार गुळ फायदेशीर
  • गुळाचे काही उपाय केल्यास पैशी तंगी जाणवणार नाही
  • व्यवसायात प्रगतीसोबत मान-सन्मान मिळू शकतो.

मुंबई : गुळाचा वापर गोड चवीसाठी तर कधी औषध म्हणून केला जातो जो प्रत्येक डिशला वेगळी चव देतो पण माणसाच्या आयुष्यात गोडपणाही भरू शकतो. ज्योतिष शास्त्रानुसार गुळाचे काही उपाय केल्याने ती व्यक्ती पैशाच्या तंगीपासून मुक्त होऊ शकते. यासोबतच नोकरी, व्यवसायात प्रगतीसोबत मान-सन्मान मिळू शकतो. जाणून घ्या, ज्योतिष शास्त्रानुसार गुळाचे कोणते उपाय फायदेशीर ठरतील. (Astro Tips: A small piece of jaggery can change your life)

अधिक वाचा : Vastu Tips: घराच्या ' या' दिशेला अन्नपूर्णेचा फोटो लावल्यास धन आणि अन्नाची कधीही कमतरता भासणार नाही

पैशाच्या चणचणीपासून मुक्त होण्यासाठी

आर्थिक परिस्थिती कमकुवत होत असेल तर गुळाचा एक छोटासा तुकडा खाल्ल्याने पैशाची तंगी दूर होऊ शकते. यासाठी गुळाचा एक छोटा तुकडा घेऊन एका नाण्याने लाल कपड्यात बांधून ठेवा. यानंतर माता लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवा. रोज पूजा करावी. पाचव्या दिवशी दुर्गादेवीची पूजा केल्यानंतर हे कापड उचलून कपाट, तिजोरी किंवा पैसे ठेवण्याच्या जागी ठेवा.

कर्जातून बाहेर पडण्यासाठी

जर तुम्ही सतत कर्जाच्या ओझ्याखाली दबत असाल तर एका पिवळ्या कपड्यात हळद आणि थोडासा गुळ टाकून ७ गाठी बांधा. यानंतर, ज्या ठिकाणी तुम्ही पैसे ठेवता त्या ठिकाणी ठेवा. 21 दिवस ठेवल्यानंतर या पिवळ्या कपड्यात बांधलेल्या सर्व वस्तू वाहत्या पाण्यात फेकून द्या. असे केल्याने कर्जातून मुक्ती मिळेल.

अधिक वाचा : ज्योतिष: हळदीसह या तीन गोष्टी कोणालाही देऊ नका उधार, नाहीतर होणार नाही घराची प्रगती

संपत्ती वाढवण्यासाठी

लक्ष्मीच्या कृपेने धन, अन्न, सुख-समृद्धी हवी असेल तर गुरुवारी गायीला हरभरा डाळ खाऊ घाला.

नोकरी प्रमोशन

नवीन नोकरीच्या शोधात असाल, पण वारंवार अपयश येत असेल किंवा सध्याच्या नोकरीत प्रमोशनची इच्छा असेल तर रोजची पहिली भाकरी गाईसाठी काढा आणि थोडा गूळ खाऊ घाला. रोज असे केल्याने तुम्हाला काही दिवसात चांगली बातमी मिळेल.

अधिक वाचा : Vastu Tips: गरोदर महिलांनी चुकूनही आपल्या खोलीत वस्तू ठेवू नयेत

जेव्हा वैवाहिक जीवनात अडचण येते

विवाह योग होत नसेल तर गुळाचा वापर करू शकतो. यासाठी प्रत्येक गुरुवारी पिठात थोडा गूळ, तूप आणि हळद घालून गायीला खाऊ घाला. सुमारे 7 गुरुवारी असे केल्याने व्यक्तीचे लवकरच लग्न होईल.


 

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी