Horoscope in marathi | नवी दिल्ली : ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा एखादा ग्रह आपली हालचाल बदलतो तेव्हा त्याचा थेट परिणाम व्यक्तीच्या जीवनावर होतो. नऊ ग्रहांमध्ये राजा म्हटला म्हणून ओळखला जाणारा सूर्य आता राशी बदलणार आहे. १३ फेब्रुवारीला सूर्याचे राशी परिवर्तन होणार आहे. या संक्रमणादरम्यान सूर्य कुंभ राशीत प्रवेश करेल, यामुळे काही राशींना शुभ परिणाम मिळतील. तर त्यामुळे काही राशीतील व्यक्तींना त्याचा अधिक लाभ मिळू शकतो. (Astrology Gemini Cancer and Aquarius will benefit these 3 zodiac signs will also progress in job-business).
अधिक वाचा : महाराष्ट्रातील बार आणि वाईन शॉप मालकांना मोठा झटका...
१३ फेब्रुवारीला सूर्याचे राशी परिवर्तन मिथुन राशीच्या लोकांसाठी शुभ आहे. भाग्य स्थानात सूर्याचे संक्रमण भाग्याची पूर्ण साथ देईल. वास्तविक या राशीचा स्वामी बुध आहे. बुध आणि सूर्य अनुकूल राहतील. अशा परिस्थितीत संक्रमण काळात उत्पन्न वाढण्याची शक्यता असेल. याशिवाय नोकरीत देखील प्रगतीची संधीही मिळेल. व्यवसायात आर्थिक प्रगती होईल.
अधिक वाचा : शिक्षणमंत्र्यांच्या घराला घेराव घालणारा हिंदुस्थानी भाऊ
सूर्याचा हा राशी परिवर्तन बदल कर्क राशीच्या लोकांसाठी फायदेशीर ठरू शकतो. संक्रमण काळात नवीन या राशीतील लोकांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. यासोबतच प्रमोशनमध्ये देखील लाभ मिळणार आहे. व्यवसायात उत्पन्न वाढेल. याशिवाय परदेशात व्यवसाय करणाऱ्यांनाही लाभ मिळेल.
सूर्याचे संक्रमण कुंभ राशीतच होईल. यामुळे या राशीच्या लोकांसाठी हे संक्रमण खूप फायदेशीर ठरेल. धन गृहात सूर्याच्या भ्रमणामुळे प्रचंड आर्थिक लाभाचे योग निर्माण होतील. कुंभ राशीच्या लोकांना संक्रमण काळात जे काही काम सुरू होईल त्यात नक्कीच यश मिळेल. व्यवसायात अचानक आर्थिक लाभाचे योग येतील. कामाच्या ठिकाणी अधिकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य राहील.