Astrology : या राशीच्या लोकांना या वर्षी व्यवसायात खूप लाभ होणार; आई लक्ष्मीची कृपा राहणार

धर्म-कर्म-भविष्य
Updated Jan 10, 2022 | 17:19 IST | टाइम्स नाऊ मराठी

Astrology For 2022 | ज्योतिष शास्त्रामध्ये अंकशास्त्राचा आणि माणसाच्या जन्मतारखेचा (Birth Date) अगदी जवळचा संबंध आहे. कोणत्याही व्यक्तीची जन्मतारीख जोडल्यास एक अंक तयार होतो, ज्याला राशी संबोधले जाते. त्याचप्रमाणे महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ तारखेला जन्मलेल्या मूळ राशीचा अंक हा १ असतो. कारण त्या सर्वांना जोडल्याने १० गुण तयार होतात.

Astrology People of this zodiac sign will benefit a lot in business this year Mother Lakshmi's grace will remain
या राशीच्या लोकांना या वर्षी व्यवसायात खूप लाभ होणार  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • ज्योतिष शास्त्रामध्ये अंकशास्त्राचा आणि माणसाच्या जन्मतारखेचा अगदी जवळचा संबंध आहे.
  • मूलांक १ असणार्‍या व्यक्तींना २०२२ वर्षात नोकरीत प्राधान्य मिळेल.
  • मूलांक १ असलेल्यांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. त्यांच्या जोडीदाराशी त्यांचे नाते अधिक चांगले होईल. जर ते अविवाहित असतीस तर त्यांच्या मते या वर्षी त्यांना जीवनसाथी नक्कीच मिळेल.

Astrology For 2022 | नवी दिल्ली : ज्योतिष शास्त्रामध्ये अंकशास्त्राचा आणि माणसाच्या जन्मतारखेचा (Birth Date) अगदी जवळचा संबंध आहे. कोणत्याही व्यक्तीची जन्मतारीख जोडल्यास एक अंक तयार होतो, ज्याला राशी संबोधले जाते. त्याचप्रमाणे महिन्याच्या १, १०, १९ आणि २८ तारखेला जन्मलेल्या मूळ राशीचा अंक हा १ असतो. कारण त्या सर्वांना जोडल्याने १० गुण तयार होतात. अंकशास्त्रानुसार या राशीतील व्यक्तींचा स्वामी सूर्य आहे. तसेच २०२२ मध्ये राशीतील अंक १ असणाऱ्या व्यक्तींचे भविष्य देखील काही खास असणार आहे. ज्योतिषांच्या म्हणण्यानुसार राशीतील अंक १ असणाऱ्या व्यक्तींसाठी हे चालू वर्ष शानदार असणार आहे. या वर्षामध्ये खूप लाभ होणार असल्याचे वर्तवण्यात आले आहे. (Astrology People of this zodiac sign will benefit a lot in business this year Mother Lakshmi's grace will remain). 

Also Read : केरळमध्ये सुरू होता पत्नी अदला-बदलीचा खेळ

दरम्यान, मूलांक १ असलेल्या विद्यार्थ्यांबद्दल भाष्य करायचे झाले तर त्यांना चालू वर्षात थोडे कष्ट करावे लागणार आहेत. त्याचा लाभ त्यांना खूप चांगला मिळेल. विद्यार्थ्यांसाठी हे वर्ष खूप चांगले आहे. मूलांक १ असलेल्या लोकांच्या करिअरबद्दल बोलायचे तर ते सध्या सरकारी नोकरीसाठी तयारी करत आहेत त्यांना या वर्षात त्यांच्या मेहनतीचे फळ नक्कीच मिळेल. एवढेच नाही तर जे बेरोजगार आहेत त्यांना नोकरी मिळण्याची शक्यता स्पष्ट दिसत आहे. त्याच वेळी त्यांच्या कामावर आनंदी राहून बॉस त्यांचे प्रमोशन देखील करू शकतात. 

Also Read : अवघ्या अडीच वर्षांच्या मुलानं दाखवलं भन्नाट स्कीइंग स्किल

 
मूलांक १ असलेल्यांचे वैवाहिक जीवन आनंदी राहील. त्यांच्या जोडीदाराशी त्यांचे नाते अधिक चांगले होईल. जर ते अविवाहित असतीस तर त्यांच्या मते या वर्षी त्यांना जीवनसाथी नक्कीच मिळेल. मूलांक १ मधील व्यक्तींना आरोग्याबाबत थोडे जागरूक रहावे लागणार आहे. थोडासा निष्काळजीपणा त्यांना खूप धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे आहार आणि दिनचर्येची पूर्ण काळजी घेणे आवश्यक आहे. 

Also Read : या पेनीस्टॉकने एका वर्षात १ लाखाचे केले ८३ लाख, कमाईच कमाई

लक्षणीय बाब म्हणजे १ मूलांक असणाऱ्या व्यक्तींचे २०२२ मधील व्यवसायाच्या सुरुवातीचे काही महिने चढ-उतारांनी भरलेले असतील. परंतु वर्षाच्या अखेरीस त्यांना भरपूर नफा मिळेल आणि ते एक यशस्वी व्यापारीही होतील. मूलांक १ असणार्‍यांसाठी हे वर्ष संपत्ती, सुख आणि समृद्धी घेऊन येणार आहे.

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी