Astrology: रंगांचाही पडतो आयुष्यावर प्रभाव, जाणून घ्या कुठल्या दिवशी घालायचे कुठल्या रंगाचे कपडे

काही जण आपल्या कपड्यांच्या बाबतीत जागरुक असतात. कुठला रंग आपल्याला सुट होईल, कुठल्या रंगात आपले सौंदर्य उठून दिसेल यासाठी काही लोक विशेष लक्षही देतात. परंतु आपण कुठल्या रंगाचे कपडे वापरतो, त्यावरूनही आपले भविष्य ठरत असतं.

colorful clothes
कपड्यांचे रंग आणि ज्योतिषशास्त्र  |  फोटो सौजन्य: BCCL
थोडं पण कामाचं
  • काही जण आपल्या कपड्यांच्या बाबतीत जागरुक असतात.
  • परंतु आपण कुठल्या रंगाचे कपडे वापरतो, त्यावरूनही आपले भविष्य ठरत असतं.
  • जाणून घेऊया कुठल्या रंगाचे कपडे घातल्यास आपले भविष्य चांगले होईल. 

Astro Tips: मुंबई : काही जण आपल्या कपड्यांच्या बाबतीत जागरुक असतात. कुठला रंग आपल्याला सुट होईल, कुठल्या रंगात आपले सौंदर्य उठून दिसेल यासाठी काही लोक विशेष लक्षही देतात. परंतु आपण कुठल्या रंगाचे कपडे वापरतो, त्यावरूनही आपले भविष्य ठरव असतं. ज्योतिषशास्त्रात काही रंगाचे वर्णनही करण्यात आले आहेत. काही रंग उर्जा देतात, काही रंग मन प्रसन्न करतात. जाणून घेऊया कुठल्या रंगाचे कपडे घातल्यास आपले भविष्य चांगले होईल. 


रविवार- Sunday : रविवारच्या दिवशी क्रीम रंगाचे कपडे घालणे फायदेशीर आहे. क्रीम रंगासह गुलाबी, सोनेरी, नारिंगी रंगाचेही कपडे घालू शकता. परंतु रविवारच्या दिवशी निळा, काळा, राखाडी आणि पांढर्‍या रंगाचे कपडे घालणे टाळा.

सोमवार- Monday : सोमवारी तुम्ही सफेद रंगाचे कपडे घातले पाहिजे. तसेच हल्के रंग आणि हल्के शेडचे कपडे घालणे गरजेचे आहे. या दिवशी काळ्या रंगाचे आणि लाल रंगाचे कपडे घालू नका. 


मंगळवार-  Tuesday : या दिवशी आपण लाल रंगाचे कपडे घाला,. शक्यतो भडक लाल रंगाचे कपडे टाळा. गुलाबी आणि लाल शेडमधील कपडे परिधान करा. लाल रंगाच्या शेडसह क्रीम आणि लिंबू रंगाचे कपडेही ट्राय करा. या 

बुधवार-   Wednesday : दिवशी हल्क्या हिरव्या रंगाच्या कपड्यांना प्राधान्य द्या. जर सकाळी तुम्ही धावण्यासाठी किंवा व्यायाम करण्यासाठी जात असाल तर हिरव्या रंगाचे कपडे घाला. कामाला जाताना पिस्ता कलरचे कपडे घाला. 


गुरुवार-  Thursday :  गुरूवारी नारिंगी आणि पिवळ्या रंगाचे कपडे घाला. या रंगांना कॉम्बिनेशन म्हणजे क्रीम, सफेद आणि गुलाबी रंगाचे कपडे चालतील. या दिवशी पारंपारिक कपडे घालणे अपेक्षित आहे. 

शुक्रवार- Friday : शुक्रवारी पार्टी वियर कपड्यांना प्राधान्य द्या. त्यात राखाडी, काळा, निळा आणि हलका हिरव्या रंघाचे कपडे घाला. फक्त या दिवशी पिवळ्या रंगाचे कपडे घालणे टाळा. 

शनिवार- Saturday : शनिवारी काळा, निळा, राखाडी आणि हिरव्या रंगाचे कपडे चालतील. या दिवशी लाल रंगाचे कपडे टाळा. तसेच लाल रंगाशी कॉम्बिनेशनही नसावे


या गोष्टी ठेवा लक्षात

शुक्रवारी नवीन कपडे घालणे शुभ असतं. तर बुधवारी आणि गुरूवारीही नवीन कपडे घालू शकता. मंगळवारी आणि रविवारी नवीन कपडे घालू नये, इतकेच नाही तर नवीन कपडे विकतही घेता कामा नये. कारण कपडे घेताना आपण ट्रायल रुपमध्ये हे कपडे घालून बघतो. 

(Disclaimer:  सदर माहिती इंटरनेटवरील माहितीवरून संकलित करण्यात आली आहे. टाइम्स नाऊ मराठी या माहितीला दुजोरा देत नाही)

ताज्या बातम्यांच्या अपडेटसाठी Times Now मराठीच्या फेसबुक पेजला लाइक करा.

पुढची बातमी