मुंबई: सध्या कासवाच्या अंगठीचा ट्रेंड खूप वाढला आहे. बरेच लोकं कासवाची अंगठी वापरताना दिसतात. बहुतांश लोकांच्या हातात ही अंगठी बघायला मिळते. दरम्यान या अंगठीशी संबंधित अनेक फायदे वास्तुशास्त्रात सांगितले गेले आहेत. असं म्हटलं जातं की, कासवाची अंगठी परिधान केल्यानं भाग्याचा मार्ग खुला होतो. ही अंगठी देवी लक्ष्मीशी थेट संबंधित असल्याचंही मानलं जातं. (Turtle Ring Silver Benefits)
जो व्यक्ती ही कासवाची अंगठी घालतो त्याच्यावर देवी लक्ष्मीची कृपा असते, असं म्हटलं जातं. फेंगशुईमध्ये कासवांना भाग्यवान आणि श्रीमंत देखील मानलं जातं. जाणून घ्या कासवाची अंगठी घालताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात.
कासवाची अंगठी घालण्याचे फायदे
ज्या लोकांच्या आयुष्यात सुख सुविधांची कमतरता आहे किंवा पैशाची कमतरता असते अशी लोकांनी कासवाची अंगठी परिधान केल्यास विशेष फायदा होतो. शास्त्रानुसार कासव हे भगवान विष्णूच्या कच्छप अवताराचे रूप मानलं जातं. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान विष्णूंनी समुद्रमंथनादरम्यान हा अवतार घेतला होता. ही अंगठी धारण केल्यानं सकारात्मक ऊर्जा मिळते. आत्मविश्वास देखील वाढतो.
या राशीच्या लोकांनी ज्योतिषाच्या सल्ल्याशिवाय अंगठी घालू नये
मेष, कर्क, वृश्चिक आणि मीन राशीच्या लोकांनी ज्योतिषाच्या सल्ल्याशिवाय कासवाची अंगठी घालू नये. कारण असं म्हटलं जातं की, या राशीच्या लोकांनी कोणत्याही सल्ल्याशिवाय कासवाची अंगठी घातली तर ग्रह दोषाच्या समस्येला सामोरं जावं लागतं. त्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागू शकतो.
कशी घालावी कासवाची अंगठी
शुक्रवार हा दिवस ही अंगठी खरेदी करण्यासाठी सर्वात शुभ मानला जातो. त्यामुळे ही शुक्रवारी ही अंगठी खरेदी करा आणि घरी आणल्यानंतर देवी लक्ष्मीच्या फोटोसमोर ठेवा. त्यानंतर ही अंगठी दूध आणि पाण्यानं धुवा किंवा गंगाजलानं अभिषेक करा. शेवटी उदबत्ती दाखवून ही परिधान करा. ही अंगठी घालण्यापूर्वी लक्ष्मी देवीच्या मंत्राचा 108 वेळा जप करा.
या बोटात घालावी कासवाची अंगठी
कासवाची अंगठी घालताना त्याचा चेहरा नेहमी तुमच्या बाजूला असावा हे लक्षात ठेवा. ती बाजू पैसे आकर्षित करते. जर त्याचा चेहरा बाहेर असेल तर पैसे येण्याऐवजी पैसे जाण्याची शक्यता जास्त असते. ही अंगठी नेहमी उजव्या हाताच्या मधल्या बोटात किंवा अंगठीजवळच्या तर्जनीमध्ये घालावी. ते घालण्यासाठी शुक्रवार हा सर्वात शुभ दिवस मानला जातो.
कोणत्या धातूमध्ये असावी ही अंगठी?
ही अंगठी चांदीची किंवा चांदीच्या धातूची असावी. कारण त्याचा थेट परिणाम आपल्या मेंदूवर होत असतो. अंगठी घातल्यानंतर लक्षात ठेवा की, ही अंगठी हातात फिरवत राहू नये. कारण यामुळे कासवाच्या चेहऱ्याची दिशा बदलेल. अशा स्थितीत संपत्तीचा मार्ग बंद होतो.