Vastu Shastra Pooja rules in marathi: हिंदू धर्मात पूजा-अर्चा करण्याला विशेष महत्त्व आहे. प्रत्येकजण हा देवदेवतांची विधिवत पूजा करत असतो. इतकेच नाही तर संकष्टी, एकादशी, गणेशोत्सव, नवरात्रोत्सव या काळात भाविक विधिवत पूजा करुन उपवास सुद्धा ठेवतात. मात्र, वास्तूशास्त्रात पूजा करण्याच्या संदर्भात काही नियम आहेत हे तुम्हाला माहिती आहे का?
हे पण वाचा : गरोदर असताना उपवास करावा की नाही?
वास्तूशास्त्रानुसार, पूजा करताना आपले तोंड पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवावे. यापैकी पूर्व दिशेला तोंड करुन पूजा-अर्चना करणं श्रेष्ठ मानलं जातं. कारण, पूर्व दिशा ही शक्ती आणि शौर्य यांचे प्रतिक आहे. वास्तूशास्त्रात पूजेसाठी पश्चिमेकडे तोंड करून बसणे म्हणजे पूर्वेकडे तोंड करुन बसल्याने ज्ञान प्राप्तीसाठी चांगले मानले जाते.
हे पण वाचा : दगाबाज रे.... या कारणांमुळे पार्टनरला फसवतात मुलं-मुली
या दिशेला बसून पूजा केल्याने आपल्यात क्षमता आणि शक्तीचा संचार होतो. यामुळे आपल्याला आपले ध्येय साध्य करणे सोपे जाते. या दिशेला पूजास्थळ असल्यास घरात राहणाऱ्या लोकांना सुख, शांती, ऐश्वर्य, आरोग्य लाभते.
हे पण वाचा : या पत्त्यावर तिसरा 8 अंक तुम्हाला दिसला का? शोधा बरं
घरात पूजेचं ठिकाण, पूजा स्थळ हे नेहमी उत्तर-पूर्व दिशेला बनवावे. वास्तूनुसार, ही दिशा शुभ मानली जाते. त्याचवेळी घराच्या आत ठेवलेल्या मंदिराची उंची त्याच्या रुंदीच्या दुप्पट असावी. घराच्या आत पूजाघर बांधताना लक्षात ठेवा की, त्याच्या खाली किंवा पुढे शौचालय नसावे. यासोबतच चुकूनही घराच्या जिन्याखाली पूजाघर बनवू नका.